Karunashtak (करुणाष्टक )

ही आहे एक कुटुंबकहाणी- दादा, आई, सहा मुलं आणि दोन मुली यांची. आईचा कडक स्वभाव आणि फाड फाड बोलणं यामुळं दादा तिला म्हणायचे, ‘फौजदार’, पण सगळ्या कुटुंबाला सावली देणारं घर जळलं, दादा खचले, वारले. आणि आई अबोल झाली. स्वत:च्या संसारात अलिप्तासारखी वागू लागली. मुलं मोठी होत होती. या मुलांच्या रुपानं आईपुढं आठ समस्या उभ्या राहिल्या. जणू ही आठ मुलं म्हणजे नियतीनं आईला घालून ‌ठेवलेली आठ कोडी. हेच तिचं करुणाष्टक. खरं म्हणजे, कोण्याही आईचं. कारण, वाट चालताना ओझं वागवणं हे स्त्रीच्या भाळी अगदी इतिहासपूर्व काळापासून आलेलं आहे. तेव्हापासून, आपल्या स्त्रीत्वाला आलेलं फळ-मूल हेसुद्धा आईला ओझंच होऊन राहिलं असलं पाहिजे.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category