Eklavya(एकलव्य)

By (author) Sharad Dalvi Publisher Mehta Publishing House

श्री दासबोध' ह्या लोकोत्तर ग्रंथात सच्छिष्याची लक्षणं विस्तारानं विशद करताना श्रीसमर्थ रामदास म्हणतात : ऐसे सच्छिष्यांचें वैभव । सद्गुरुवचनीं दृढभाव । तेणें गुणें देवराव । स्वयेंचि होती॥ (दशक पाचवा, समास तिसरा) ... असं सच्छिष्याचं वैभव असतं. सद्गुरुस्वरूप प्राप्त करून घेतलेला पहिला सर्वोत्तम शिष्य एकलव्य. त्याची ही चरितकहाणी आद्य एकलव्याच्या कापल्या अंगठ्यातून गळणार्‍या रक्ताच्या कणाकणांतून कधी जात, कधी धर्म, कुठं रक्तशुद्धी, कुठ वर्ण अशा कोणत्या ना कोणत्या कारणानं रोज नवनवे एकलव्य जन्माला येत आहेत; आणि आयुष्यातील छोट्या-मोठ्या संघर्षाला भिणारे, पोटासाठी लाचार झालेले द्रोणाचार्यही पावलोपावली भेटत आहेत. महाभारत-काळापासूनच ज्ञान आणि पोटभरू विद्या यांची गत सुरू झाली. ज्ञानोपासक आत्मकेंद्रित, अहंमन्य, लाचार व पोटार्थी बनले. त्यामुळं ज्ञान व समाजाची नैतिक घसरगुंडी झाली. स्वार्थप्रेरक, पक्षपाती आणि उच्च जीवननिष्ठा न देणारं ज्ञान हेच व्यक्तीच्या आणि समीच्या र्‍हासाचं व अपकर्षाचं मुख्य कारण होत गेले. या चरितकहाणीचा मूलस्त्रोतच हा आहे. प्रत्येक ज्ञानपिपासूनं वाचायला हवीच, अशी ही कथावस्तू आहे.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category