Musalmani Riyasat Khand-2(मुसलमानी रियासत-२)
मुसलमानी रियासतीच्या दोन खंडांतील इतिहासाचा कालखंड इ.स. १००० पासून इ.स. १७०७ पर्यंत सुमारे सातशे वर्षांचा आहे. महंमद गझनीच्या भारतावरील पहिल्या स्वारीने मुसलमानी इतिहासाचा आरंभ होतो आणि मोगल बादशहा औरंगजेबाच्या मृत्यूबरोबर या इतिहासाचा शेवट होतो. या इतिहासाबरोबरच इ.स. १००० पासून सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत गुजरातचा इतिहास, विजयनगरच्या साम्राज्याचा उदय, उत्कर्ष आणि अस्त, स्वतंत्र रजपूत राज्ये यांचा संक्षिप्त इतिहासही मुसलमानी रियासतीमध्ये वाचायला मिळतो. मुसलमान कोण होते? त्यांच्या पूर्वेतिहास कोणता? हे सांगत असतानाच रियासतकारांनी त्यांचा धर्म, संस्कृती, राजकीय धोरण, धर्मप्रसाराचे सूत्र, त्यांनी अरबस्तानापासून भारताच्या वायव्य सीमेपर्यंत पोहोचण्यासाठी स्वीकारलेले मार्ग यांचीही माहिती दिली आहे.