Ek Manus Ek Divas:2 (एक माणूस एक दिवस भाग : २)
एखाद्या प्रसिद्ध, नामवंत व्यक्तीबरोबर एखादा दिवस घालवून त्याबद्दल लेख लिहिण्याची ह. मो. मराठे यांची कल्पना एकदम अभिनवच ठरली. `घरदार’ मासिकातून ही कल्पना त्यांनी राबवली. हे लेख प्रसिद्ध होऊ लागले आणि वाचक अत्यंत उत्सुकतेने आणि चवीने ते वाचू लागले. एक लेख वाचून झाला की पुढल्या महिन्यात हमो कोणत्या प्रसिद्ध व्यक्तीच्या भेटीला आपणाला नेताहेत याची वाटच वाचक बघू लागले. कारण, या लेखातून आपणच त्या व्यक्तीच्या सहवासात एखादा दिवस घालवतो आहोत असा अनुभव वाचकांना येऊ लागला. या लेखांच्या रूपाने `पर्सनॉलिटी रिपोर्ट’ चा एक नवा फॉर्म हमोंनी पत्रकारितेला दिलाच, पण त्यांनी शैलीही अशी सिद्ध केली की हे लेख `वृत्तपत्रीय लेखना’च्या पातळीवरून वर उचलेले गेले आणि त्यांना व्यक्तिदर्शनात्मक वाङ्मयीन लेखांचे मूल्य प्राप्त झाले! हमो मराठे यांनी `किर्लोस्कर’मध्ये लिहिलेल्या त्याच लेखमालेतील लेखांचा हा दुसरा भाग! या भागात वाचाः मुख्यमंत्री मनोहर जोशी, प्रमोद नवलकर, जयंत नारळीकर, बाबा आढाव, विक्रम गोखले, प्रभाकर पणशीकर, शरद जोशी इत्यादी व्यक्तींबरोबर एक दिवस घालवून लिहिलेले लेख.