Hasat Khelat Dhyandharana (हसत खेळत हसत-खेळत ध्य
हे ओशोंचे ध्यानविषयक विचार प्रकट करणारे पुस्तक आहे. ध्यान ही एक गंभीर अध्यात्मिक गोष्ट आहे, असा समज पूर्वीपासून रूढ झालेला आहे. जगापासून दूर कोठेतरी एकांतात देवाचे ध्यान करत बसणे किंवा त्याच्या प्रतिमेची कल्पना करत बसणे म्हणजे ध्यान अशीच समजूत आहे. ओशोंच्या मते ध्यान ही कला आहे. मनाला हलके फुलके करण्याची निर्मळ , निर्विचार करण्याची. आणि कोमल, निर्मळ अवस्थेच्या आनंदात डुंबून जाण्याची. ध्यानाबद्दलचे ओशोंचे विचार वेगवेगळ्या दृष्टीकोनातून या पुस्तकात प्रश्नोत्तर रूपात मांडले आहेत. ध्यान आत, अंतरंगात आहे. आनंद आत आहे. त्याचे एक विज्ञान आहे. ओशोंचे हे पुस्तक त्या विज्ञान आणि कलेचा व्यवस्थित बोध देते. दिशा दाखवते. यातूनच ओशोंच्या व्यक्तीमत्वाचे मनोज्ञ, कधी गूढ तर कधी प्रक्षोभक दर्शन घडते. आपल्या मानसिक, वैचारिक, अध्यात्मिक प्रेरणांचा विकास घडवण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचायला हवं.