Valli Aani Valli (वल्ली आणि वल्ली)
हे पुस्तक म्हणजे, काही वल्लींवरच्या पूर्वप्रकाशित लेखांचा संग्रह आहे. मी माणसात रमणारा माणूस आहे. माझी एखाद्याशी मैत्री पटकन होते आणि टिकते. तुम्ही मला एकट्याला क्वचित पहाल. मी घोळक्यातला माणूस आहे. खरं तर घोळका जमवून गप्पा मारणे हा माझा सर्वात आवडता छंद आहे. त्यामुळे अस्सल वल्लींवर लिहायला मला आवडतं. क्रिकेट आणि इतर लिखाणातून जेव्हां मला संधी मिळाली तेव्हा मी विविध वल्लींवर लिहिलंय.