Bastarche maovadi (बस्तरचे माओवादी)
दहशतवादाप्रमाणेच देशात नक्षलवादी कारवायांच्या बातम्या वारंवार वाचायला मिळतात. छत्तीसगड, महाराष्ट, बिहार, मध्यप्रदेश अशा अनेक राज्यांमध्ये नक्षलवादाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. भारतात जाणवणारी सामाजिक विषमता, जोडीला दुष्काळ यामुळे गरीब, आदिवासी माओवादाकडे झुकले. हिंसाचारणे क्रांती होते, असे मानणाऱ्या नक्षलवादी नेत्यांना ही ही चळवळ रुजविली. मुळात माओवाद म्हणजे काय, त्याचा इतिहास, त्यात सहभागी लोक, त्यांची भूमिका, ते कुठून व का येतात, त्यांची जीवन पद्धती, त्यांचे बंड संपुष्टात येण्यासाठी सरकार करीत असलेले उपाय, राहुल पंडिता यांनी 'बस्तरचे माओवादी' मधून मीमांसा केली आहे. बस्तर मधील नक्षलवादी भागात त्यांच्याबरोबर राहून, जाणकारांशी चर्चा करून एक पत्रकाराने लिहिलेल्या या पुस्तकातून एका वेगळ्या भारताचे दर्शन होते. याचा मराठी अनुवाद चिन्मय दामले यांनी केला आहे..