Kateri Keniyachi Mulayam Safar (काटेरी केनियाची मु
केनिया आणि संपूर्ण पूर्व आफ्रिकेची भूमी हि वन्यजीव संपत्तीने नटलेली... सर्वच निसर्गप्रेमींना तेथे पुन्हा पुन्हा जायला आवडतं... छायाचीत्रणासाठी तर हा गवताळ प्रदेश म्हणजे स्वर्गच! त्याच प्रदेशाच्या प्रेमात पडलेले डॉ.संदीप श्रोत्री यांच्या नजरेतून टिपलेली आणि लेखणीतून उतरलेली हि केनियाची स्वर्गभूमी! हे निव्वळ प्रवासवर्णन नाही,केवळ वन्यप्राण्यांचे अनुभव नाहीत... तर त्याहीपलीकडे जाऊन तेथील समृद्ध परिसंस्था आणि मसाई-स्वाहिली संस्कृती,उत्क्रांतीशास्त्र,मानववंशशास्त्र,पुरातत्व संशोधन या दृष्टीने त्याचं महत्व,तिथली राजकीय,भौगोलिक आणि भूगर्भशास्त्रीय मीमांसा,तेथील वन्यजीव सृष्टीला असलेले मानव आणि निसर्गनिर्मित धोके,ते वेळीच ओळखून त्यांच्या संवर्धनासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या व्यक्ती,केवळ सफारीवर अवलंबून असलेलं केनियाचं अर्थकारण,निसर्ग पर्यटन आणि शाश्वत विकासाचा दाखवलेला नवा आदर्श,या सर्वांचा हे मुक्तचिंतन वाचकाला स्तिमित परंतु अस्वस्थ करेल हे नक्की.