-
Tirthatan (तीर्थाटन)
एकीकडे डोंगर ,दुसरीकडे दर्या ,एकीकडे जंगल -समुद्र तर दुसरीकडे मैलोनमैल पसरलेलं वाळवांट... भैगोलिक विविधतेबरोबरच भारताला आणखी एक वरदान लाभलं आणि ते म्हणजे सर्वाधर्मासमभावाच धार्मिक वैविध्याच त्यामुळेच हा देश मंदिरांसाठी जसा ओळखला जातो.तसाच मासिदिंसाठीसुध्द जातो इथली चर्चेस जशी पर्यटकांना खुणावतात तसेच इथले स्तूप,अग्यारी, ,सिनेगॉग्स आदीही आपल्याला एक वेगळीच अनुभूती देतात भारताच्या या सांस्कृतिक संचिताची हि धावती सफर याचं आणखी एक वेगळे पण म्हणजे मातृभाषा तमिल असलेल्या आणि फ्रेंच भाषेवर प्रभुत्व असलेल्या उषा हर्डीकर यांनी घडवलीय... अगदी परीपूर्णतेचा ध्यास घेऊन हा ठेवा आपल्या हाती ठेवलाय
-
Lokshahichi Aishi Taishi (लोकशाहीची ऐशी तैशी )
देशसेवेच्या,समाजसेवेच्या नावाखाली काही स्वार्थी आणि बेमुर्वत राजकारणी आपले अस्तित्व अबाधित राहावे म्हणून गुन्हेगारी वृतीच्या व्यक्तींशी हातमिळवणी करून त्यांच्याशी युती करतात ;आणि तिथेच राजकारणाचे गुन्हेगारीकरण सुरु होते .त्या साऱ्या वातावरणाला अधिक पुष्ट करणारे , पोलीस ,कोर्ट, कायदा धाब्यावर कसा बसवायचा याची जाण असलेले आणि अक्षरश :प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे ,त्यांचे राजकीय सल्लागार ,धूर्त पत्रकार, नेत्याच्या आजूबाजूला असणारे खुशमस्करे यांच्यामुळे वाढत जाणारे राजकारणाचे गुन्हेगारीकरण हा साराच सध्या चिंतेचा विषय बनला आहे . कारण त्यामुळे सचोटीचे राजकारण आणि प्रशासन हळूहळू दुर्मिला होत चालले आहे हे भेदक वास्तव मांडणारी हि कादंबरी अक्षरश :खिळवून ठेवणारी....
-
Kateri Keniyachi Mulayam Safar (काटेरी केनियाची मु
केनिया आणि संपूर्ण पूर्व आफ्रिकेची भूमी हि वन्यजीव संपत्तीने नटलेली... सर्वच निसर्गप्रेमींना तेथे पुन्हा पुन्हा जायला आवडतं... छायाचीत्रणासाठी तर हा गवताळ प्रदेश म्हणजे स्वर्गच! त्याच प्रदेशाच्या प्रेमात पडलेले डॉ.संदीप श्रोत्री यांच्या नजरेतून टिपलेली आणि लेखणीतून उतरलेली हि केनियाची स्वर्गभूमी! हे निव्वळ प्रवासवर्णन नाही,केवळ वन्यप्राण्यांचे अनुभव नाहीत... तर त्याहीपलीकडे जाऊन तेथील समृद्ध परिसंस्था आणि मसाई-स्वाहिली संस्कृती,उत्क्रांतीशास्त्र,मानववंशशास्त्र,पुरातत्व संशोधन या दृष्टीने त्याचं महत्व,तिथली राजकीय,भौगोलिक आणि भूगर्भशास्त्रीय मीमांसा,तेथील वन्यजीव सृष्टीला असलेले मानव आणि निसर्गनिर्मित धोके,ते वेळीच ओळखून त्यांच्या संवर्धनासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या व्यक्ती,केवळ सफारीवर अवलंबून असलेलं केनियाचं अर्थकारण,निसर्ग पर्यटन आणि शाश्वत विकासाचा दाखवलेला नवा आदर्श,या सर्वांचा हे मुक्तचिंतन वाचकाला स्तिमित परंतु अस्वस्थ करेल हे नक्की.