Chaitanycha Zara ( चैतन्याचा झरा)
पुलंनी असे म्हटले कि, आपल्या समाजाची स्थिती मोठी चमत्कारीक झाली आहे. आपल सोवळ सुटलंय आणि ओवळ सापडत नाहीये... एका वाक्यात केवढा तरी आशय! आपण विचारमग्न!…।प्रस्थापित समाजव्यस्थेला विरुद्ध करणारी पुरोगामी, परिवर्तनवादी लेखन वाचताना त्यातली तर्कसंगत भूमिका लगेचच मान्य करतो...तथापि कधी अन्य वैचारिक वाड्मय संतानी सोपा करून सांगितलेला वेन्दांत, माणसात वेद्नात,सत्भाव जागा करणारी कीर्तन,प्रवंचन ऐकताना पुन्हा संभ्रमात पडतो. 'हे खरे कि ते खरे कि ते खरे कि ते खरे!'हि काव्यपंक्ती आठवू लागते.विलास राजे याचा हा लेखसंग्रह वाचताना त्याचा युक्तिवाद,बिनतोड आहे, असच म्हणावस वाटेत.त्यांनी दिलेले साहित्यातील,पुराणातले,इतिहासातले संदर्भ खूप काही बोलतात.विलास राजे एख्यादा क्षणी तरल,हळवं आणि हृदयस्पर्शी लेखन करतात.अतिशय जमून आलेला हा लेखसंग्रह आहे. वाचक मनोमन खुश होईल.राजेच्या या वैचारिक,ललित,संदर्भसमृद्ध लेखनाची सर्वत्र उत्त्तम लेखन घेतली जाईल.या पुस्तकाचे स्वागत होईल याची खात्री वाटते.