Pahila Varkari Aani Itar Lekh (पहिला वारकरी आणि इत
अंतकरण सुधारण्याचा मार्ग पुढ आला म्हणजे प्रायचित्ताचे मार्ग आपोआपचा निरुपयोगी ठरतात. नामयज्ञ, जपयज्ञ हाच खरा मार्ग. अंतकरण शुद्धीचा ध्यास म्हणजेच जपयज्ञ. ईश्वराचा नाव अंतकरण शुद्धीसाठी घेण म्हणजे चा खरी मूलगामी शुद्धी होय. रोगाचं मूळ नष्ट करणारा हाच खरा उपाय आहे. म्हणून श्री ज्ञानेश्वर माउली म्हणतात; 'किर्तनचेनी नटनाचे! नशिले व्यवसाय प्रायश्विताचे!!