Pavhna (पाव्हणा)

By (author) Mahadev More Publisher Mehta Publishing House

भिमू हा मामाच्या गावी म्हाईसाठी आलेला तरुण...इनामदारांचा शहरात शिकणारा मुलगा जैसिंगही म्हाईसाठी गावात आलेला... बाजीराव भोसल्या, सिरपा आत्याळ्या, येश्या शेवाळ्या आणि जानु उपाळ्या ही गावातली चांडाळ चौकडी... गावठी दारू तयार करणे, गावातील लोकांच्या शेळ्या-मेंढ्या पळवणे, गावातल्या पोरीबाळींवर नजर ठेवून, संधी साधून त्यांच्यावर बळजबरी करणे, त्याबाबत जर कुणी विचारायला आलं तर त्याला बेदम मारणे, प्रसंगी जीव घेणे, असले त्यांचे उद्योग...त्यांना विरोध करू पाहणार्‍या जैसिंगला एकदा ही चांडाळ चौकडी बेदम मारून बेशुद्ध करते...भिमूचा ज्या मुलीवर जीव जडलेला असतो तिची अब्रू हे चौघं लुटतात...जैसिंग आणि भिमू म्हाईच्या दुसर्‍या दिवशी या चौघांना गाठतात...हे दोघं आणि ते चौघं, अशी जोरदार मारामारी होते...त्या चौघांना गंभीर जखमी करून जैसिंग आणि भिमू सटकतात...भिमू रात्रीच्या अंधारात एस. टी. स्टॅन्डच्या दिशेन धावत सुटतो...अस्सल ग्रामीण वातावरणातील कादंबरी

Book Details

ADD TO BAG