Share Bazaar (शेअर बाजार)
शेअर बाजाराविषयी सर्वांगीण माहिती देणारं हे पुस्तक आहे. चांगला गुंतवणूकदार होण्यासाठीचं तसंच शेअर बाजाराच्या उगमाविषयीचं विवेचन सुरुवातीला केलं आहे. नंतर शेअर बाजाराच्या संदर्भात महत्त्वपूर्ण कामगिरी करणार्या तसेच सट्टेबाजी करणार्या व्यक्तींच्या अनुषंगाने शेअरबाजार हा विषय विस्तृतपणे मांडला आहे. त्या त्या व्यक्तीचं काय वैशिष्ट्य होतं, हे सांगताना त्याचे स्वभावविशेष आणि त्याचं खासगी जीवन याकडेही लक्ष वेधलं आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदारांना शेअरबाजाराकडे आकृष्ट करणं, शेअरदलालांना प्रशिक्षण देणं, ही होती चार्ल्स मेरिलची वैशिष्ट्यं. अभ्यासाच्या जोरावर शेअरबाजाराविषयी अचूक भाकितं करणं, ही होती एडसन गोल्डची खासीयत. तर, अशा व्यक्तींच्या माहितीमधून शेअर बाजाराचे विविध पैलू, विविध देशांची चलनं, शेअर बाजाराचा अर्थकारणाशी असलेला संबंध इ. बाबी उलगडतात. आवश्यकतेनुसार कोष्टकं दिली आहेत. शेवटी संदर्भसूची जोडली आहे. शेअर बाजाराविषयीचं साध्या-सोप्या भाषेतील रोचक पुस्तक.