Brahmashrichi Smaran Yatra (ब्रह्मर्षीची स्मरण यात
समाधीमध्ये मंगळ, गुरु, शनि या ग्रहांवर विज्ञानमय कोषाने जाऊन तेथील स्थिती अगोदर प्रसिध्द केली व ती अवकाश यानांनी मानल्यामुळे जागतिक कीर्ति लाभलेले, दिव्य दृष्टी असलेले साक्षात्कारी संत. प्राचीन भारतीय विद्यांचे संशोधक म्हणून भारतात मान्यता पावलेले. "स्वयंभू" ग्रंथाने धूर्त, मुत्सद्दी भीम व महाभारताची ऎतिहासिकता सिध्द करणारे व ज्योतिर्गणिताने तारखा ठरविणारे. "वास्तव रामायण" ग्रंथात पंधरा सहस्त्र वर्षांचा इतिहास मांडून रामाच्या जीवनातील तारखा ज्योतिर्गणिताने सिध्द करणारे. उपनिषदे, पातंजल योग व गीता यावरील विज्ञाननिष्ठ निरुपणे प्रकाशून अध्यात्मिक अधिकार सिध्द करणारे. "पुनर्जन्म"- या ग्रंथातून त्या सिध्दान्ताची वैज्ञानिक मांडणी करणारे. ख्रिस्ताचे हिंदुत्व, प्रतापसूर्य थोरले बाजीराव पेशवे, ‘स्वा. सावरकर - मूर्तिमंत गीता, पहिले नि एकमेव’, ‘दास मारूती ? नव्हे; वीर हनुमान !’ वैदिक विज्ञान व वेदकालनिर्णय, संगीत दमयंती परित्याग, युगपुरूष श्रीकृष्ण, तेजस्विनी द्रौपदी अशी सुरस १६ पुस्तके लिहून जगापुढे सत्य मांडणारे. पुण्यातील प्रथितयश सर्जन डॉ. प. वि. वर्तक यांच्या सिध्दहस्त लेखणीतून ५२ वर्षांच्या अध्यात्मसाधनेचे अनुभव अक्षरबध्द झालेले आत्मचरित्र ‘ब्रम्हर्षीची स्मरणयात्रा’.