Shree Swami Raja(श्री स्वामी राजा)
श्री अक्कलकोट स्वामी म्हणजे प्रत्यक्ष अवतारी विभुती. त्यांच्या कृपाप्रसादाचा अनुभव आजही कित्येकांना येतो. मनःशांती लाभणे हा फार दुर्मिळ लाभ. श्री स्वामींच्या नुसत्या स्मरणानेही दुर्मिळ मनःशांती प्राप्त होते, असे सांगणारी सर्व थरातील माणसे जेव्हा भेटतात, तेव्हा वाटते की ही नुसती अंधश्रद्धा नाही तर प्रत्यक्ष अनुभव आहे. आणि मग अवतारी पुरुषाच्या जीवनात डोकावण्याचा मोह होतो. ते जीवन पहिले की मन थक्क होते. ही अशी लेखनसेवा त्यामुळेच घडते. 'श्री स्वामी राजा' ही कादंबरी म्हणजे स्वामींच्या भव्यदिव्य साक्षात्कारी स्वरूपाला अर्पण केलेली भक्तिसेवाच आहे.