Line (लाइन)

By (author) Mahadev More Publisher Mehta Publishing House

मरणाची टांगती तलवार डोक्यावर घेऊनही बेडरपणे जगणारा तरुण युवक - आई-वडिलांच्या छत्राविना वाढल्यामुळे आयुष्याची होणारी परवड - हॉटेलमध्ये कप-बश्या व खानावळीत ताटं धुणे - आइसकांडीचे जड डबे पोटावर लादून गारेगार विकणे, अशी कामे करूनही होणारा अपमान-अवहेलना - अखेर कंटाळून तो ट्रकलाइनकडे वळताच मरणाच्या दारातून एकदा तो परत कसा येतो - तरी पुन्हा तेच काम का करत राहतो - एका ड्रायव्हरच्या सैतानीवृत्तीने तो भलत्याच संकटात कसा अडकतो - ट्रकमधील सिटं भरताना पिसाटलेला ड्रायव्हर एका स्त्रीला खाली उतरू देत नाही आणि वाईट विचारांच्या अमलाखाली येऊन ड्रायव्हर ट्रक भरधाव पळवतो; परंतु हे सर्व बघणारा तरुण नुसता बघत राहतो? का, त्या स्त्रीला वाचवण्यासाठी काही ठोस पावलं उचलतो? तिच्या घरी ती सुरक्षित पोहचते का? तिची व तिच्या नवर्‍याची भेट होते का? आणि या सगळ्यात हा क्लीनर ड्रायव्हर होतो; पण कसा? या सर्वाची उकल ‘लाइन’ या कादंबरीतून होते.

Book Details

ADD TO BAG