Bhatkanti Leh Laddakhchi...
लेह लडाख हा अतिशय दुर्गम प्रदेश असून येथील सौंदर्य अवर्णनीय आहे. या पुस्तकात लेखक प्र. के. घाणेकर, यांनी इथल्या निसर्गाबरोबरच प्राणी, पक्षी, नद्या, एवढेच नाही तर येथील माणसांचेही वर्णन केले आहे. या दूरच्या प्रदेशात कसे जावे, तेथे काय पहावे या महत्वाच्या प्रश्नांबरोबरच तेथे कशासाठी जावे याचेही उत्तर या पुस्तकातून आपल्याला मिळू शकते. अनेक रंगीत चित्रांद्वारेही आपल्याला तेथील परिस्थितीची ओळख होण्यास मदत होते.