Muktanganchi Goshta
मुक्तांगणची गोष्ट:’ ‘मुक्तांगण’ला देणगी देतेवेळी पु.ल. म्हणाले होते, ‘एका जरी घरात व्यसनमुक्तीचा दिवा लागला, तर माझ्या देणगीचे सार्थक झाले, असे मी समजेन.’ पु.ल. तसे माझे वडीलच. त्यांचे अनुकरण करून म्हणावेसे वाटते, की हे पुस्तक वाचून व्यसनाच्या अंधारात चाचपडणारया एका जरी व्यसनीला बाहेर यायचा प्रकाशाचा ठिपका दिसेल, तर सार्थक झाले समजेन.व्यसनी नवऱ्याच्या एका जरी पत्नीला पूर्वीच्या जखमा विसरून चांगले आणि आत्मविश्वासाने जगावेसे वाटले, की त्याहून काय हवे? एका जरी व्यसनी बापाच्या लहानग्या पोराच्या मनावरचे काळेकुट्ट मळभ दूर होऊन छानसे कोवळे उन्ह पसरेल, आणि त्यात ते पोर मस्त, अनिर्बंध नाचेल...त्यापेक्षा अधिक काय मिळवायचे असते?