-
Platform Number Zero
रेल्वे स्टेशनच्या परिसरात प्लॅटफॉर्मवर किंवा कुठेतरी वळचणीवर आपलं बेवारस आयुष्य जगू पाहणा-या मुलांचं जीवन रुळावरून पुरतं घसरलेलं असतं. कोणत्या ना कोणत्या कारणाने घर सोडून आलेली ही मुलं स्टेशनच्या आस-याने आपलं आयुष्य सावरण्याचा प्रयत्न करत असतात. पण तिथल्या उघड्यावाघड्या जगण्यामुळे त्यांना आयुष्यभराच्या सर्व ब-यावाईट प्रसंगांना बालपणीच सामोरं जावं लागतं. त्यात त्यांचं बालपण करपून जातं. अशाही परिस्थितीत ही मुलं सन्मानाने जगण्याचा प्लॅटफॉर्म शोधत राहतात, पण या मुलांची परवड काही केल्या थांबत नाही. किशोर, जग्गू, अँथनी, बिल्लू, झहीर, मुन्ना अशा कितीतरी मुलांच्या अस्वस्थ करून सोडणा-या कहाण्या...
-
Jag Badal Ghaluni Ghaav
एखाद्या गरीब पोतराजाच्या पोराकडून कुणाच्या काय अपेक्षा असणार? बापासारखं पोतराज व्हावं किंवा जातीची पारंपरिक काम करत लाचारीन जगत रहाव. पण एकनाथ आवाड यांनी ही मळलेली वाट धूडकावली. घर सोडलं, गाव सोडलं, कष्ट करत शिक्षण घेतलं. जगण्याशी लढत आपली वाट आपण शोधली. पण स्वत : च्या सुखात समाधान मानलं नाही. आदिवासी नि दलितांना वेठबिगारीतुं बाहर काढलं. अस्पृश्यता आणि जातिभेद या विरोधात गावोगाव संघर्ष मांडला. हजारो भूमिहीनांना गायरान जामिनी मिळवून दिल्या. त्यांना संद्रिय शेती शिकवली. बचत करूँ छोटे मोठे व्यवसाय करायचा मंत्रं दिला. अन्यायावर घाला घालत नवं घडवण्याचा नवा पॅटर्न उभा केला.
-
Muktanganchi Goshta
मुक्तांगणची गोष्ट:’ ‘मुक्तांगण’ला देणगी देतेवेळी पु.ल. म्हणाले होते, ‘एका जरी घरात व्यसनमुक्तीचा दिवा लागला, तर माझ्या देणगीचे सार्थक झाले, असे मी समजेन.’ पु.ल. तसे माझे वडीलच. त्यांचे अनुकरण करून म्हणावेसे वाटते, की हे पुस्तक वाचून व्यसनाच्या अंधारात चाचपडणारया एका जरी व्यसनीला बाहेर यायचा प्रकाशाचा ठिपका दिसेल, तर सार्थक झाले समजेन.व्यसनी नवऱ्याच्या एका जरी पत्नीला पूर्वीच्या जखमा विसरून चांगले आणि आत्मविश्वासाने जगावेसे वाटले, की त्याहून काय हवे? एका जरी व्यसनी बापाच्या लहानग्या पोराच्या मनावरचे काळेकुट्ट मळभ दूर होऊन छानसे कोवळे उन्ह पसरेल, आणि त्यात ते पोर मस्त, अनिर्बंध नाचेल...त्यापेक्षा अधिक काय मिळवायचे असते?
-
Ardhi Mumbai
मुंबईतल्या गरीब, कष्टकरी आणि जगण्याशी रोज झगडा करणा-या वस्त्यांचे नि तिथल्या माणसांच्या जगण्याचे कंगोरे शोधणारं 'युनिक फिचर्स'चं 'हटके' पुस्तक.
-
II
समाजाच्या भल्यासाठी धडपडणा-या ख-याखु-या आयडॉल्सना संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर शेती-पाणी-शिक्षण-आरोग्-र्पावरण-ग्रामविकास-विज्ञान-तंत्रज्ञान आदि क्षेत्रात पथदर्शक कार्य उभारणा-या आणखी काही कार्यरतांची ओळख करून देणारं पुस्तक.
-
Makeup Utarvalyavar
काळ बद्दला! स्त्री ची अनेक नवी रूप जागासमोर आली परि स्थितीला टक्कर दे ण्याची तिची क्षमता चकित करू लागली. कुटुंबाच्या जवाबदारया पेलत. ती अवघं आकाश कवेत घेऊ लागली. तिच्या हळूवारपणाला कणखर तेची जोड लाभली. आणि तिच्या ठायी पारंपरिकतेचा अधुनिकतेचा अपूर्व संगम घडून आला.