-
Pathlag (पाठलाग)
चंद्रलेखा बेलसरे यांनी मराठी कथेच्या प्रांतात आपला स्वतंत्र ठसा उमटविला आहे. ‘सत्यापितम’ आणि ‘सत्याभास’ या दोन महत्त्वाच्या गूढ कथासंग्रहानंतर त्यांचा ‘पाठलाग’ हा दमदार कथासंग्रह आलाय. त्यांनी लोकनायक महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे चरित्र, आर्यमा, अनुभूती, अरूणिमा, अंतहीन, अभिजात अशा कवितासंग्रहांनी मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले आहे. नजिकच्या काळात त्यांची आणखी काही पुस्तके वाचकांच्या भेटीस येत आहेत.
-
Madhurav (मधुरव)
Madhurav (मधुरव) by Madhura Velanakar या पुस्तकात मधुरा वेलणकर-साटम या अभिनेत्रीचे वैयक्तीक आयुष्यातले अनेक अनुभव यात आहेत. मधुरा वेलणकर - साटम या सुप्रसिध्द अभिनेत्रीचं हे पहिलंच पुस्तक. कलाजीवानातले आणि वैयक्तिक आयुष्यातले अनेक अनुभव तिच्या संवेदनशील मनानं टिपले आहेत आणि अगदी समोरासमोर गप्पा व्हाव्यात अशा साधेपणानं, अकृत्रिम शैलीत ते आपल्यापुढे मांडले आहेत. व्यक्ती, प्रसंग, घटना, स्मरणरंजन अशा अनेक गोष्टींचा धांडोळा घेणारं हे स्वभावगत स्वनिष्ठ लेखन आहे. अभिनेत्री या वालयामागील तुमच्या-आमच्यासारखीच सुख-दुःख बाळगणारी-जपणारी व्यक्ती यातून जाणवत राहते, आपली वाटते ! या पुस्तकालाही लोक आपलंसं करतील असा विश्वास आहे !!
-
Overtake(ओव्हरटेक)
सौ. चंद्रलेखा बेलसरे यांच्या कथा वाचताना मला नेहमी वाटतं की, भूतं जर एवढी चांगली असती, तर आमच्या नशिबात अशी चांगली भूतं येण्याऐवजी अनेक रडगाणी गाणारी माणसंच का येतात? मृत्यू आणि त्यानंतरचे जग हा अनेकांसाठी औत्सुक्याचा विषय असतो. माणूस मेला की संपला, त्याची राख झाली असं माझ्यासारख्या विज्ञाननिष्ठ माणसाला वाटतं. तरीही या गूढ जगाविषयी जगभर अनेकांचे अनेक अनुभव असतात. मराठी साहित्यात सलगपणे पाचवा गूढकथासंग्रह प्रकाशित झाल्याने चंद्रलेखा बेलसरे यांचे गूढकथासंग्रहाच्या प्रांतातील वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध झाले आहे. प्रस्तुत पुस्तकातील नऊ कथा वाचकांना वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. प्रत्येकाचा वेगवेगळ्या कारणाने मृत्यू झालेला असला तरी हे प्रेतात्मे सूडाने पेटलेले नाहीत. मृत्यूनंतरही संबंधितांचे भलेच व्हावे असा नेक विचार ते करतात. कोविडच्या काळात असंख्य लोकांची सेवा करताना आपले संपूर्ण कुटुंब गमावून स्वतःही मृत्युला सामोरे जाणाऱ्या एका डॉक्टरची कथा आहे. मृत्यूनंतरही तो आपल्या डॉक्टर प्रेयसीला साथ देत तिच्या भवितव्याचा विचार करून तिला एका होतकरू अभियंत्यासोबत लग्नासाठी प्रेरित करतो. हे तर्कबुद्धीला न पटणारे असले तरी त्यांच्या भाव-भावनांची गुंफण बेलसरे यांनी अतिशय समर्पक शब्दांत केली आहे. 'पुनर्जन्म' कथेतील गायत्रीसुद्धा मनाची अशीच पकड घेते. थोडक्यात सांगायचे तर, भुते ही वाईट, खुनशी, सूडबुद्धीने वागणारी आणि जिवंत माणसांना त्रास देणारीच असतात ही 'अंधश्रद्धा' खोडून काढण्याचे काम चंद्रलेखा बेलसरे त्यांच्या कथांच्या माध्यमातून प्रभावीपणे करतात. आपल्याला एका वेगळ्या विश्वाचे दर्शन घडविणाऱ्या या कथा वाचायलाच हव्यात. घनश्याम पाटील
-
Alagad (अलगद)
एखादा छोटासाच विचार... त्या विचाराची ठिणगी उडते आणि मन एकदम उजळून निघतं. मग तो विचार आणखी पुढे न्यावासा वाटतो. 'पुढे न्यावासा वाटतो' असं म्हणण्यापेक्षा त्याचं बोट धरून आपणच पुढे पुढे जाऊ लागतो. म्हणजे जपाच्या माळेतला मणी कसा... जपाची सुरुवात आपण करावी लागते पण नंतर मात्र तो माळेतला मणी कसा आपसूक पुढे जाऊ लागतो... अगदी तसंच ह्या विचारांचं होतं. मनातल्या मनात विचारांचे मणी अलगद पुढे पुढे जाऊ लागतात. काही वाचलेलं, काही साचलेलं, काही टाचलेलं, काही डाचलेलं असं सगळं आठवत जातं... आणि बघता बघता एखाद्या ललितलेखाचा आराखडाच तयार होऊन जातो. म्हणजे चित्रकाराला कसं... कधीतरी निळ्याशार निरभ्र आकाशाकडे बघताना एखादं सुंदरसं चित्र सुचतं. पण जोपर्यंत तो ते कागदावर रेखाटत नाही तोपर्यंत त्याला लौकिकात 'चित्र' म्हणता येत नाही. लेखनाचं सुद्धा तसंच होतं. म्हणजे तसं प्रत्येक मन, प्रत्येक माणूस हा आपापल्या जगात ललितकारच असतो. कितीतरी ललित आराखडे मनात तयार असतात. हा आराखडा छान पायरी पायरीने कागदावर उतरवला की त्याचा होतो एक 'ललितबंध'. ह्या पुस्तकातल्या विषयांचे ललित आराखडे आपल्या प्रत्येकाच्या मनात तयार असतीलच! इथे फक्त ते 'अलगद' कागदावर उतरवले आहेत इतकंच! -- धनश्री लेले
-
Reshatan Athavanincha Pravas (रेषाटन आठवणींचा प्रवास)
प्रख्यात व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांची वाटचाल सांगणारं आत्मकथन. आजपर्यंत फडणीस यांच्या चित्रांनी वाचकांना मनसोक्त हसवलं. आता या चित्रांचा आणि चित्रकर्त्यांचा प्रवास या पुस्तकातून कळणार आहे. या आत्मचरित्रामुळे व्यंगचित्रकारांचा संघर्ष आणि त्यांचे कष्ट लोकांसमोर येणारे आहेत. मुळात आपल्याकडे चित्रकार आणि चित्रकलेसंबंधीची पुस्तके कमी आहेत. फडणीस यांचे आत्मकथन नव्या चित्रकारांना प्रेरणा देणारे ठरेल, यात शंका नाही.