-
Durchi Mati Jawalchi Mati (दूरची माती जवळची नाती)
राष्ट्रकुल शिष्यवृत्ती मिळवून ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अॅन्ड पॉलिटिकल सायन्स,’ म्हणजेच एलएसई या विख्यात संस्थेतील ‘आंतरराष्ट्रीय कायद्याचा पदव्युत्तर अभ्यासक्रम’ इथून सुरू झालेला दूरचा प्रवास हा, प्रत्यक्ष ओळखीतून अथवा कुणा दुसऱ्यामार्फत झालेल्या ओळखीतून कसा जवळच्या नात्यामाध्ये परावर्तित होत गेला याचा अनुभव यातून मिळतो. ‘सॅम’सारख्या पसिस्थितीने स्थलांतरीत झालेल्या व्यक्तीची कथा असेल- वृद्धत्व आलं तरी स्वकष्टाने कमाई करून मुलांच्या पाठीशी उभी राहणारी ‘रोझमेरी’ असेल- भारतीय वंशाच्या मुलाच्या प्रेमात पडून, त्याच्या बाहिणीमुळे सुखी संसारास दुरावलेली आणि ३५वर्षं त्याच्या नावचं मंगळसुत्र घालून एकटी जगणारी ‘अॅलिस’ असेल किंवा अगदी ‘कोरियन किमची आणि सोजू’ यांच्याशी जडलेलं गहिरं नातं असेल; या सर्वांमधून लेखकाची सुटका कधीही होणार नाही किंबहुना लेखकाची तशी इच्छाही नाही असेच या संपूर्ण पुस्तकातून दिसून येते.
-
Samee (सामी)
लहानपणी ऐकलेली ‘आजीची गोष्ट’ आठवते? व्यक्तिरेखांसह तो काळ, स्वभाव, सवयी, जीवनपद्धती, आचरण, शिकवण यांचे कळत-नकळत संस्कार करण्याची क्षमता त्या गोष्टींमध्ये होती. पेरुमल मुरुगन यांच्या ‘सामी’ मध्ये अशीच क्षमता आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या एका दक्षिण भारतीय शेतकऱ्याच्या कौटुंबिक आणि सामाजिक संघर्षाची ही गोष्ट. तामिळ संस्कृतीच्या गोडव्यासह लोकरीची गुंडाळी सोडवावी तशी मुरुगन यांच्या लेखणीतून कथा हळुवार उलगडत जाते. एखाद्याच्या पायाखालची जमीन सरकण्याइतकी रक्ताची नाती, पोटच्या पोरांशी जोडलेली नाळ कमकुवत असते का? प्रस्थापित समाजव्यवस्था आणि एकत्र कुटुंबसंस्थेला मुरुगन यांच्या ‘सामी’ या कादंबरीने असेच काही प्रश्न विचारले आहेत. तामिळ भाषेत सामी म्हणजे श्रेष्ठ मालक. कादंबरीतल्या मुथ्थूसामीसोबत वाचक एका नव्या जमिनीच्या शोधात निघतो. सेतूर आणि कोरडूसारखी गावं ओलांडून पलीकडे जाताना नाचणीची शेतं, कडुलिंबाचे वृक्ष आणि चिंचेची झाडं दाट छाया धरतात. पंगुणी महिन्यातली रिमझिम आणि सित्तिरईचा कडक उन्हाळा सोसत बाजरी नाहीतर नाचणीच्या ‘कळी’मध्ये कुस्करलेल्या वालपापडीच्या बियांची झणझणीत चव चाखत हा प्रवास रंजक होतो. कादंबरीचा काळ जुना असला तरी मनुष्यस्वभाव आजही तसाच आहे, त्यामुळे संदर्भ कालबाह्य ठरत नाही. पहिल्या पानावरचा वाचक शेवटचं पान पलटताना एक विद्यार्थी होऊन जीवनानुभवाचं गाठोडं सोबत घेऊन जातो. पण मुथ्थूचं काय? स्वतः सह त्याच्या कुटुंबियांचं आयुष्य पणाला लागलंय. आपण ‘सामी’ असल्याचं तो कसं सिद्ध करेल?
-
Turn A Blind Eye (टर्न अ ब्लाइंड आय)
"टर्न अ ब्लाइंड आय ही गुप्तहेर अधिकारी विल्यम वॉरविक यांच्या रोमांचक मालिकेतील तिसरी कादंबरी आहे. रहस्यकथांचे दिग्गज लेखक जेफ्री आर्चर यांच्या प्रभावी कथनशैलीमुळे ही कथा वाचकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते. आता डिटेक्टिव्ह इन्स्पेक्टर बनलेला विल्यम वॉरविक एका अत्यंत धोकादायक मोहिमेवर नियुक्त होतो. त्याला गुप्तपणे काम करत महानगर पोलिस दलाच्या अंतर्गत रुजलेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करायचा असतो. त्याची टीम तरुण पोलीस अधिकारी जेरी समर्स याच्यावर लक्ष ठेवते, कारण त्याची ऐषआरामी जीवनशैली त्याच्या उत्पन्नाशी जुळत नाही. मात्र तपास सुरू असतानाच विल्यमच्या टीममधील एका सदस्यासोबत निर्माण झालेलं वैयक्तिक नातं संपूर्ण मोहिमेलाच धोक्यात आणण्याची शक्यता निर्माण करते. दरम्यान, एका कुख्यात अमली पदार्थांच्या तस्करावर खटला सुरू होतो. या खटल्यात सरकारी पक्षाची बाजू विल्यमचे वडील आणि बहीण मांडत असतात. दुसरीकडे, जुळ्या मुलांची आई झालेली विल्यमची पत्नी बेथ एका जुन्या परिचित व्यक्तीच्या पुन्हा संपर्कात येते. ती व्यक्ती खरोखरच सुधारली आहे की केवळ तसं भासवत आहे, हा प्रश्न निर्माण होतो. गुप्त तपास जसजसा पुढे सरकतो, तसतसा विल्यमला भ्रष्टाचाराची मुळे त्याने कल्पना केली होती त्यापेक्षाही अधिक खोलवर रुजलेली असल्याचे जाणवते. त्याच्या अपेक्षेपेक्षा अधिक सहकारी या गैरप्रकारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यास तयार आहेत, हेही उघड होत जाते. रहस्य, थरार, विश्वासघात आणि सत्तेच्या खेळांची गुंफण असलेली ही कादंबरी वाचकांना शेवटपर्यंत उत्कंठावर्धक प्रवास घडवते."
-
Eat That Frog Vidyarthyansathi (इट दॅट फ्रॉग विद्यार्थ्यांसाठी)
आपल्या 'टू-डू लिस्ट' मधली सगळीच कामं पूर्ण करण्याठी वेळ कधीच पुरेसा नसतो, आणि तो कधीच असणारही नाही. यशस्वी लोक सगळ्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न करत नाहीत. ते सर्वात महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करतात आणि ती कामं पूर्ण कशी होतील हे पाहतात. ते आधी "फ्रॉग खातात". एक जुनी म्हण आहे, जर आपण सकाळी सर्वात आधी जिवंत फ्रॉग खाल्ला, तर दिवसभराच्या सर्वात वाईट कामातून आपण मोकळे झालात, ही समाधानाची भावना आपल्याला मिळते. "फ्रॉग" म्हणजे तुमचं सर्वात आव्हानात्मक काम, पण हेच काम तुमच्या आयुष्यावर सर्वाधिक सकारात्मक परिणाम करणारं असतं. या पुस्तकात, दिवसाचे वेळापत्रक कसे आखायचे? प्राधान्यक्रम कसा ठरवावा ? कामे प्रभावी व कार्यक्षम पद्धतीने कशी पूर्ण करावीत? अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करून घ्यायचा? लक्ष विचलित करणाऱ्या डिजिटल अडथळ्यांच्या काळात आपली एकाग्रता कशी टिकवून ठेवावी? निर्णयक्षमता, शिस्त आणि दृढनिश्चय अंगी कसा बाणवावा? हे आयुष्य बदलणारे पुस्तक तुम्हाला आजपासूनच तुमची महत्त्वाची कामं पूर्ण करण्यात मदत करेल ! लेखकाबद्दल ब्रायन ट्रेसी हे Brian Tracy International चे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. प्रेरणादायक वक्ते आणि सेमिनार लीडर म्हणून ते दरवर्षी 2,50,000 हून अधिक लोकांना संबोधित करतात. ते 80 पेक्षा अधिक पुस्तकांचे बेस्टसेलिंग लेखक आहेत, जी अनेक भाषांमध्ये अनुवादित झाली आहेत. त्यांनी 1,000 हून अधिक कंपन्यांसाठी सल्लागार व प्रशिक्षक म्हणून काम केलं असून, 70 पेक्षा जास्त देशांतील 10,000 पेक्षा अधिक उद्योगांसाठी मार्गदर्शन करत आहेत.
-
Crypto Currency (क्रिप्टो करन्सी)
आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिप्टोकरन्सीचा वापर वाढत चालला आहे. क्रिप्टोकरन्सीने भारतामध्येही भक्कमपणे पाय रोवायला सुरुवात केली आहे. म्हणूनच क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय आणि ती कशी काम करते हे समजून घेणं ही काळाची गरज आहे. या विषयावर सखोल आणि सर्वांगीण माहिती देणारे पुस्तक... या पुस्तकात * क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? * क्रिप्टोकरन्सीचे प्रकार * क्रिप्टोकरन्सी कशी काम करते? * ब्लॉकचेन म्हणजे काय आणि त्याचे सर्व आयाम * क्रिप्टोकरन्सीची उत्पत्ती, उत्क्रांती आणि भविष्यात होणारा उत्कर्ष. * क्रिप्टोकरन्सीचे अर्थशास्त्र आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील वाढतं महत्त्व * आर्थिक प्रगतीच्या उपलब्ध झालेल्या नवनवीन संधी * क्रिप्टोकरन्सीच्या अवैध वापराच्या शक्यता आणि त्यावर उपाययोजना * क्रिप्टोकरन्सीमध्ये सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणूकीचे मार्ग
-
15 Minute Method (15 मिनिट मेथड)
आधुनिक आयुष्यामुळे आपल्याला सतत गोंधळलेलं आणि दबावाखाली असल्यासारखं वाटतं. स्वप्नं आणि उद्दिष्टांच्या दिशेने पुढे कसं जायचं आणि त्याचवेळी रोजची कामं कशी सांभाळायची, हेच समजेनासं होतं. कारण यादीत कितीतरी गोष्टी बाकी असतात आणि कामांची यादी सतत वाढतच जात असते. यावर उपाय म्हणून सॅम बेनेट एक अत्यंत सोपी पण प्रभावी कल्पना मांडतात : फक्त १५ मिनिटांची छोटी कृतीदेखील तुमच्या आनंदात, समाधानात आणि अखेरीस संपूर्ण आयुष्यात मोठा बदल घडवू शकते. या पुस्तकात परफेक्शनिझम, स्वतःवर शंका घेणं, इम्पोस्टर सिंड्रोम आणि स्वतःलाच मागे खेचणाऱ्या सवयींपासून मुक्त कसं व्हायचं आरोग्य किंवा इतर समस्यांमुळे आयुष्य विस्कळीत वाटत असताना स्वतःला कसं सांभाळायचं अवघड आणि मोठी वाटणारी कामं छोट्या, सहज हाताळता येतील अशा टप्प्यांत कशी विभागायची गरजेच्या वेळी ठामपणे आणि नम्रपणे "नाही" कसं म्हणायचं दिवसातील फक्त पंधरा मिनिटं स्वतःसाठी काढून संतुलित आयुष्यासाठी नवीन सवयी कशा तयार करायच्या सॅम बेनेट या लेखिका, वक्त्या आणि सर्जनशीलता-उत्पादकता विषयातील तज्ज्ञ आहेत. व्यावसायिक अभिनेत्री आणि इम्प्रोव्हायझर म्हणून काम करताना त्यांनी आपल्या कामात विनोदबुद्धी, उत्साह आणि हजरजबाबीपणा यांची खास छाप निर्माण केली. सहज, व्यवहार्य आणि प्रेरणादायी शिकवणीमुळे त्या आज लिंक्डइन लर्निंगवरील जागतिक स्तरावरील लोकप्रिय प्रशिक्षकांपैकी एक असून, त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ दहा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आहे.
-
Brave New Words (ब्रेव्ह न्यू वर्ड्स)
आपल्याला आवडो वा न आवडो, शिक्षण क्षेत्रात एआयची क्रांती दार ठोठावत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि GPT तंत्रज्ञानामुळे शिकण्याची प्रक्रिया बदलणार आहे. ती कशी, हे या पुस्तकात खान अॅकॅडमीचे संस्थापक सलमान खान सांगतात. एआयच्या या रोमांचक नव्या जगात पुढे जाण्यासाठी हे पुस्तक शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल. शिक्षण क्षेत्रातील अग्रणी या नात्याने लेखक सलमान खान या अत्याधुनिक साधनांतील सूक्ष्म गोष्टी समजावून सांगतात. त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात शिकण्याची व शिकवण्याची पद्धत कायमची कशी बदलणार आहे, हेही सांगतात. या ChatGPT क्रांतीकडे भीतीने पाहण्याऐवजी, पालक आणि शिक्षकांनी एआयला स्वीकारावे आणि त्याच्याशी जुळवून घ्यावे असे ते सुचवतात. खान सर यावर भर देतात की, शिक्षणात एआयचा वापर मानवी संवाद संपवण्यासाठी नव्हे, तर तो अधिक समृद्ध करण्यासाठी आहे. यामुळे पुढील गोष्टी घडतीलः प्रत्येक विद्यार्थी आपल्या सध्याच्या कामाला पूर्णपणे नवीन आणि सर्जनशील पद्धतींनी पूर्ण करू शकेल. शिकण्याची प्रक्रिया अधिक वैयक्तिक (Personalized) करता येईल. विद्यार्थ्यांचं मूल्यांकन अधिक अचूकपणे करता येईल. झपाट्याने डिजिटल होत असलेल्या भविष्याकरिता विद्यार्थ्यांना तयार करता येईल.
-
How To Control the Uncontrollable (हाऊ टू कंट्रोल अनकन्ट्रोलेबल)
“आपल्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टींना आपण जितकं जास्त महत्त्व देतो, तितकं आपलं नियंत्रण कमी होतं.” – एपिक्टेटस आयुष्यात कठीण प्रसंग येणार, हेच माणूस असण्याचं वास्तव आहे. पण त्यांना अधिक मजबूतपणे सामोरं जाण्याचा काही मार्ग असेल तर? तो मार्ग आहे, स्टोईक तत्त्वज्ञान ही प्राचीन ग्रीक विचारसरणी आजही तितकीच उपयुक्त आहे, जितकी ती दोन हजार वर्षांपूर्वी होती. याचा मूलभूत उद्देश एकच आहे तो म्हणजे, आपल्याला अधिक चांगलं आयुष्य जगायला मदत करणं. स्टोईक तत्त्वज्ञानाचं सूत्रमंत्र सांगतो: “आपण बाह्य घटनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही, पण त्यांना कसा प्रतिसाद द्यायचा हे मात्र आपण ठरवू शकतो.” व्यावहारिक तत्त्वज्ञ आणि सल्लागार व्यक्तिमत्त्व बेन ऑल्ड्रिज स्टोईक विचारांतील १० महत्त्वाच्या तत्त्वांद्वारे तुम्हाला अधिक लवचिक, संतुलित आणि समृद्ध जीवन कसं घडवायचं हे शिकवतील. हे पुस्तक केवळ विचार करण्यासाठी नाही, तर कृती करण्यासाठी आहे. बेन तुम्हाला काही आव्हानात्मक पण उपयुक्त सरावही सुचवतात, ज्यामुळे तुम्ही स्टोईक तत्त्वज्ञान प्रत्यक्षात उतरवू शकता. जसे की, • स्वतःची अँटी-बकेट लिस्ट तयार करणं • जाणूनबुजून थोडंसं अस्वस्थ अनुभव घेणं • निःस्वार्थी दृष्टीकोन विकसित करणं • स्वतःच्या मृत्यूचा विचार करणं (मेमेंटो मोरी) “तुमचं नियंत्रण तुमच्या मनावर आहे-बाह्य घटनांवर नाही. हे ओळखा, आणि तुम्हाला तुमच्यातील खरी ताकद सापडेल. – मार्कस ऑरेलियस”
-
Dnyanendriyantun Jivan (ज्ञानेंद्रियातून जीवन)
हे पुस्तक केवळ वाचण्यासाठी नाही, ते अनुभवण्यासाठी आहे. दैनंदिन धावपळीत आपण आपल्या विचारांमध्ये आणि इतर कामांमध्ये इतके गुंतून जातो की, आजूबाजूच्या सुंदर जगाकडे आपलं लक्षच जात नाही. लेखिका ग्रेचेन रुबिन यांच्या बाबतीतही असंच झालं. इंद्रियाच्या बाबतीतील एका धक्कादायक घटनेमुळे त्यांना अचानक लक्षात आलं की, त्या आसपासचं जग अनुभवतच नव्हत्या. त्या म्हणतात, गंध, चव, स्पर्श, दृष्टी आणि श्रवण या इंद्रियांना जाणीवपूर्वक अनुभवायला शिकलं, तर आयुष्य समृद्ध आणि आनंदी होऊ शकतं. मग त्यांनी या पंचेंद्रियांकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आणि त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. कसं, ते या पुस्तकात वाचायला मिळेल. या पुस्तकात, पंचेंद्रियांचं महत्त्व दैनंदिन छोट्या गोष्टींत (जसे आवडते अन्न, गाणी) आनंद शोधण्याची कला छोट्या सवयी आणि प्रयोगांमधून स्वतःला नव्याने ओळखण्याचा अनुभव वर्तमान क्षणात पूर्णपणे कसं जगायचं अधिक ऊर्जा, उत्साह आणि प्रेमाने जगण्याचा मार्ग "वर्तमान क्षणात जगण्याची प्रेरणा देणारं आणि प्रत्यक्षात उपयोगी पडणारं मार्गदर्शक" - सुसन केन, क्वाएटच्या लेखिका
-
12 Varsh Mazi Viskalit Premkatha (12 वर्षं माझी विस्कळीत प्रेमकथा)
तो ३३ वर्षांचा. ती २१ची. तो एक स्ट्रगलिंग स्टैंड-अप कॉमेडियन, ती खाजगी कंपनीमधील प्रतिभावान अधिकारी. तो पंजाबी. ती रूढीपरंपरा जपणाऱ्या जैन कुटुंबातील. तो घटस्फोटित. तिच्या आयुष्यात कधी बॉयफ्रेंडही आला नाही. खरंतर त्यांनी एकत्र यायलाच नको होतं. पण ते वेगळे राहूच शकत नव्हते. '१२ वर्षः माझी विस्कळीत प्रेमकथा' साकेत आणि पायल; वय, राहणीमान, संगोपन, विचारसरणी यापैकी कशातच साम्य नाही, तरीही ते एकमेकांकडे का आकर्षित झाले? याचं उत्तर त्यांच्याकडेही नाही. ही फक्त केमिस्ट्री आहे की मनाच्या अंतरंगातील वेगळं काही... हा निव्वळ वेडेपणा आहे, की नुसतीच वासना, की निखळ प्रेम ? वाचकांना गुंतवून ठेवणारी आणि मनोरंजक अशी ही कादंबरी. एखादी व्यक्ती तुमच्यासाठी योग्य आहे हे कसं ओळखायचं, या मूलभूत आणि महत्त्वपूर्ण प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न ही कादंबरी करते, विशेषतः तेव्हा, जेव्हा आजूबाजूचे सगळेच लोक आणि परिस्थितीही ती व्यक्ती तुमच्यासाठी योग्य नाही असं जोरजोरात सांगत असेल. भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या पुस्तकांचे लेखक चेतन भगत यांची एक नवीन, शक्तिशाली प्रेमकथा जी तुम्हाला हसवेल, कधी कधी रडवेलही आणि प्रेमाबद्दल तुम्हाला माहीत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर पुनर्विचार करायला लावेल.
-
Yesterday Night I Killed My Husband (यस्टरडे नाईट आय किल्ड माय हजबंड)
कबुली दिली गेली आहे.... पण रहस्याची खरी सुरुवात तर आत्ता होत आहे. एका वादळी रात्री, एका दुर्गम गावात मोनिका एक धक्कादायक कबुली देतेः "काल रात्री मी माझ्या नवऱ्याचा खून केला." पण इन्स्पेक्टर तिथे पोहोचतो तेव्हा तिचा नवरा तिच्या शेजारी अगदी जिवंत उभा असतो. मग खरे काय?, मोनिका भ्रमात आहे?, खोटं बोलतेय? की या सगळ्यामागे अजूनच भयंकर सत्य दडलंय ? इन्स्पेक्टर एका अशा रहस्याच्या जाळ्यात ओढला जातो, ज्याचा सामना त्याने याआधी कधीच केलेला नसतो एक काळोखाने भरलेला प्रवास... जो भीषण रहस्यांनी व्यापलेला आहे. तुम्ही हे रहस्य उलगडू शकता का ? एक स्त्री खुनाची कबुली देते. पण ज्याचा खून झाल्याचं ती म्हणते, तो अजूनही जिवंत आहे. आणि एक सिरीयल किलर मोकाट फिरत आहे. पण सत्य तुमच्या कल्पनेपेक्षाही अधिक भयानक आहे. कोण खोटं बोलतंय?, गुन्हेगार कोण आहे? आणि खरा राक्षस कोण? गडद अंधारात लपलेली रहस्यं, थरारक वळणं आणि असा एक खुनी, ज्याला तुम्ही कधीच विसरू शकणार नाही - अशी ही कथा तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. सायकोलॉजिकल सस्पेन्स आणि रहस्याचा अप्रतिम संगम असलेली यस्टरडे नाईट आय किल्ड माय हजबंड ही कादंबरी शेवटच्या हादरवून टाकणाऱ्या द्विस्टपर्यंत तुम्हाला सतत अंदाज बांधायला लावेल.
-
Krodhagni Rajendra Choal Cha(क्रोधाग्नी राजेंद्र चोल चा)
इ.स. १००१. वयाच्या ३०व्या वर्षी महमूद गझनवी साम्राज्याची सूत्रे हाती घेतो आणि आपली नजर पूर्वेकडे वळवतो. मज़हबी उन्मादाने प्रेरित होऊन, तो भारतवर्षावर (ज्याला त्या वेळी भिन्नधर्मीयांची आणि काळ्या जादूची भूमी, तसेच अमाप संपत्ती आणि कीर्तीचे स्थान मानले जात होते) अराजकता आणि हत्याकांडांची एक भयानक मालिका सुरू करतो. असा अत्याचाराचा कहर जगाने यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. इ.स. १०२५. चेरा आणि पांड्यांना पराभूत केलेला, गंगा जिंकलेला, आणि वंग प्रदेशाचा अधिपती असलेला राजेंद्र चोल आपली समुद्री मोहीम श्रीविजय साम्राज्याकडे सुरू करायला तयार असतो. तेव्हाच सोमनाथ मंदिराच्या विध्वंसाची बातमी त्याच्यापर्यंत पोहोचते. याच दरम्यान, अनाकलनीय लिपीतील एक प्राचीन पुस्तक त्यात दडलेली रहस्यं उलगण्यासाठी त्याच्या पालनकर्त्याला साद घालत असते. तर इकडे क्रोधाने भरलेला एक युवक युद्धासाठी अतिशय आतूर असतो. त्याचे प्रारब्ध अजून पूर्ण झालेले नाही. तो जिथे जातो, तिथे विध्वंस माजवतो आणि विनाशाच्या खुणा मागे सोडत पुढे जातो. आदिम परंपरेतील एक घातक योद्धा स्त्री, आपल्या सुलतानाच्या लालसेने भरलेल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि त्याची कृपा मिळवण्यासाठी आपल्या कौशल्यांचा उपयोग करते. या वैकल्पिक कालरेषेत, सोमनाथ मंदिराच्या विध्वंसामुळे चोल राजा प्रचंड क्रोधित होतो, आणि तो अचानक आपली योजना बदलतो. तो महमूदला थेट सामोरे जाण्याचा निर्णय घेतो. राजेंद्र चोलच्या या एका निर्णयामुळे भविष्य बदलेल का, भविष्यातील घौरी, खिलजी, बाबर यांना रोखता येईल का आणि वारंवार होणाऱ्या हत्याकांडांना आळा बसेल का? की भारतवर्षच अस्तित्वात राहणार नाही? ही पूर्वपक्ष, स्वयंबोध आणि शत्रुबोध यांची कथा आहे... धर्म आणि अधर्म यांच्या युद्धाची कहाणी. हे युद्ध प्रत्यक्षात कधी झाले नाही, पण झाले असते तर इतिहासाची दिशा पूर्णपणे बदलण्याची क्षमता त्यात होती.
-
Bruhad Stotra Ratnakar 464 Stotra (बृहद् स्तोत्र रत्नाकर ४६४ स्तोत्र)
बृहत् स्तोत्र रत्नाकर हा हिंदू देवतांना समर्पित ४६४ सामर्थ्यशाली आणि पवित्र स्तोत्रांचा एक व्यापक संग्रह आहे.
-
Msanvata (मसणवटा)
घकादायक शेवट हे या कादंबरीचे खास वैशिष्ठा. अनपेक्षितपणे शेवट आपल्यासमोर येतो. विजय-चंदा पाच भुयारांमधून जातानाची घटना वाचताना अंगावर काटा येतो. तसेच प्रत्येक वेळेस हाँसाका आणि तिचा संवाद आला, की अंगातून भीतीची एक लहर जाते. मातीतल्या माणसांची ही कथा, काही तरी सांगू पाहणारी, ऐकवणारी आहे. आपण नीट लक्ष देऊन ऐकले तर बरेच काही ऐकू येईल. तसे झाले तर लेखकाचा हेतू सफल होईल. कोयना धरणाच्या परिसरात या कादंबरीतली पात्रे राहतात. साहजिकच तिथली बोली. भाषा ते बोलतात. ही भाषा या कादंबरीत लेखकाने एकदम नेमकी पकडली आहे. या पात्रांचे एकमेकांशी संवाद इतके जिवंत झाले आहेत की, ती घटना आपल्यासमोर घडत आहे असे वाटते. साधी सोपी; पण खास गावरान, ठसकेबाज भाषा हे या कादंबरीचे आणखी एक वैशिष्ट्य. त्यामुळे त्या प्रवाहात आपणही अलगद उतरतो. हा एक नक्कीच वेगळा प्रयत्न आहे आणि तो वाचकांना नक्की आवडेल यात शंका नाही
-
Aadi Sanatan (आदी सनातन)
'आदि सनातन' हा उज्ज्वला लुकतुके यांचा कथासंग्रह मानवी जीवनातील नातेसंबंध, संस्कार, परंपरा, बदलती सामाजिक मूल्ये आणि काळानुरूप घडणाऱ्या मानसिक संघर्षांचा संवेदनशील वेध घेणारा आहे. परंपरेशी नाळ जोडूनही आधुनिक जीवनातील प्रश्नांना सामोरे जाणाऱ्या व्यक्तिरेखांमधून लेखिकेने मानवी मनाचे विविध पैलू प्रभावीपणे उलगडले आहेत. या संग्रहातील कथा कुटुंबव्यवस्था, सामाजिक मूल्ये, प्रेम, संघर्ष, आशा, संवेदना आणि जीवनातील सकारात्मकतेचा शोध घेतात. प्रत्येक कथा वाचकाला आत्मपरीक्षण करायला भाग पाडते आणि बदलत्या काळातही माणुसकी, सहजीवन व संस्कारांचे महत्त्व अधोरेखित करते. सहज, सरळ आणि ओघवत्या शैलीत लिहिलेल्या या कथा वास्तवाशी घट्ट जोडलेल्या असून, वाचकाच्या मनात दीर्घकाळ रेंगाळणारा विचारांचा ठसा उमटवतात. 'आदि सनातन' हा केवळ कथासंग्रह नसून, सनातन मानवी मूल्यांचा आणि जीवनदृष्टीचा अर्थ नव्याने उलगडून दाखवणारा संवेदनशील साहित्यप्रवास आहे.
-
Immediate Action (इमिडीएट ॲक्शन)
७ किंवा त्याहून कमी दिवसात चालढकलीवर मात कशी करायची ते शिका कधीही न येणाऱ्या उद्यावर तुम्ही गोष्टी ढकलत आहात का? तुमची अतिशय अवघड कामे टाळण्यासाठी तुम्ही महत्त्वाची नसलेली कामे अगोदर हाती घेता का? जर असे असेल, तर इमिडीएट अॅक्शन, हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. जगातील सर्वात उत्पादक लोक देखील कामे लांबणीवर टाकतात. आपण सर्वजण ते करतो, पण जर असे आढळले की कामे लांबणीवर टाकल्याने तुमचे चांगले होण्याऐवजी नुकसानंच होत आहे, तर त्यासाठी काहीतरी करण्याची ही वेळ असू शकते. खास करून, इमिडीएट अॅक्शन मध्ये तुम्ही खालील बाबी जाणून घ्याल:; तुम्ही चालढकल करत असल्याची नेमकी कारणे ओळखणे ( नेहमी तुम्ही जो विचार करता तसे नसते); तुमच्या चालढकल करण्याच्या नैसर्गिक सवयीवर मात करण्यासाठी एक साधी कृती योजना; तुम्ही तुमच्या मनातील गोंधळ कसा दूर करावा, ज्यामुळे तुमच्या हालचालीस, तुमच्या कामात वेग मिळेल आणि तुमच्या उद्दिष्टांकडे सहजपणे पुढे जाऊ शकाल; विचलने दूर करणे आणि एकाग्रता निर्माण करणे , आणि बरेच काही.
-
Adnyat Mumbai Bhag 2 (अज्ञात मुंबई २)
“मुबई आता पहिल्यासारखी राहिली नाही - आज साठी-सत्तरीत असलेल्या मुंबईकराच्या तोंडून अशी खंत वारंवार ऐकायला मिळत असते. परंतु मुंबई ही प्रवाही नगरी आहे. ती सतत बदलत आली आहे. मुंबईकराची प्रत्येक नवी पिढी त्या बदलांबरोबर कधी आपखुशीने, कधी नाइलाजाने मुंबईला उराशी बाळगून असते आणि मुंबई त्याला। मुंबई आणि मुंबईकराच्या या प्रेमसंबंधातूनच तर रोजच्या वावरातल्या मुंबईची कालची एखादी खूण सापडते तेव्हा तो हरखून जातो. मुंबईकराच्या मनाच्या तळाशी दडलेल्या या कुतूहलाला जागे करण्याचा प्रयत्न म्हणजेच नितिन साळुंखे यांचे 'अज्ञात मुंबई' हे पुस्तक आणि एकदा चाळवलेले ते कुतूहल पुरवणारे त्यांचे नवे पुस्तक म्हणजे प्रस्तुत 'अज्ञात मुंबई - २'. मनोविकास प्रकाशनचा पत्ता पुण्याचा असला तरी प्रकाशक अरविंद पाटकर हे अगदी गाभ्यातून मुंबईकर आहेत, याचाही हा पुरावाच. हा प्रयत्न जितका अभ्यासपूर्ण आहे तितकाच लोभस आणि कुतूहल-भूक वाढवणारा आहे. मुंबईबाहेरच्या माणसाला असलेलं मुंबईविषयीचं आकर्षण लपून राहिलेलं नाही. त्याचं रूपांतर प्रेमात होतानाही प्रत्ययाला येतच असतं... प्रस्तुत पुस्तकामुळे त्या प्रेमाला मुंबईच्या जपणुकीचंही अस्तर लावलं पाहिजे अशी भावना झाली तर मुंबई आणखी 'बाका नगरी' ठरेल... - रेखा देशपांडे