-
Shine Bright (शाइन ब्राइट )
प्रत्येकाला उद्योजक बनण्याची इच्छा असते. पण, केवळ याच मार्गानं तुम्ही प्रभाव टाकू शकता का? एखादा उद्योजक ज्या गोष्टी करू शकतो त्याच तुम्ही नोकरीच्या कक्षेत राहूनही करू शकत असाल तर? ‘शाइन ब्राइट’ अशाच काही प्रेरणादायी प्रवासांचा लेखाजोखा सादर करतं, जे एकाचवेळी कष्टसाध्यही आहेत आणि समाधान देणारेही आहेत. कोणत्याही नोकरीत तुम्ही ‘अडकलेले’ नसता, तुम्हीही बदल घडवू शकता– एक ‘उद्योजक’ बनू शकता...हा विश्वास हे पुस्तक रूजवतं.
-
Bhartiya Sainik (भारतीयसैनिक)
पालकांच्या इच्छेखातर आयआयटीची परीक्षा दिलेला अर्जुन मनातून भारतीय नौदलात जाण्याचं स्वप्न बाळगतो आहे. एनडीए की आयआयटी या गोंधळात पडलेल्या अर्जुनला शेवटी त्याचं कुटुंबच पाठिंबा देतं. त्याच्या स्वप्नांची वाट मोकळी होते. आणि अर्जुन एनडीएत दाखल होतो. एनडीएच्या प्रशिक्षणानंतर तो सैन्यातील एका गुप्त आणि महत्त्वपूर्ण मिशनचा भाग होतो. त्याच्यासाठी देशसेवा बजावण्याची ही नामी संधी असते. पण तिथल्या वातावरणाने आणि काही घडामोडींनी त्याच्या पुढे अनेक नवी आव्हानं उभी राहतात. आणि देशसेवेत राहण्याच्या त्याच्या इच्छाशक्तीवरच परिणाम होतो. या वैचारिक दुविधेतून तो तिथून बाहेर पडायचा निर्णय घेत असतानाच दोनशे प्रवाशांना घेऊन जाणार एक विमान अपहृत होतं...आणि अर्जुनपुढे पुन्हा नवा पेच निर्माण होतो.
-
Where Egles Dare (व्हेअर ईगल्स डेअर)
कडाक्याची, गोठवून टाकेल अशी थंडी... अशा थंडीत एका रात्री ब्रिटिश स्पेशल फोर्सेसच्या सात पुरुषांबरोबर एका स्त्रीचा समावेश असलेली टीम जर्मनीतल्या उंच पर्वतराजीच्या प्रदेशात पॅराशूटनं उतरवली जाते... या टीमसमोरचं टार्गेट असतं - ` कॅसल ऑफ द ईगल’ नावाचा, शिरकाव करण्याच्या दृष्टीनं अतिशय दुर्गम, कठीण, अशक्यप्राय आव्हान वाटावं असा एक किल्ला आणि त्यातलं जर्मन सीक्रेट साQव्र्हसचं मुख्यालय... त्यातही या टीमसमोर एक मिशन असतं ते म्हणजे विमान कोसळल्यामुळे नाझींच्या तावडीत सापडलेल्या एका अमेरिकन जनरलची या किल्ल्यातल्या कैदेतून सुटका करणं... त्याची चौकशी करणाऱ्या नाझी अधिकाऱ्यांच्या हातात एक फार महत्त्वपूर्ण अशी गुप्त योजना पडू नये म्हणून... मात्र, ब्रिटिश स्पेशल फोर्सेसचं हे मिशन सुरू झालं नाही तोच या टीमचे सदस्य बळी पडत जातात आणि मिशन गुंतागुंतीचं होत जातं... रहस्यमय, उत्कंठापूर्ण अशा गाजलेल्या चित्रपटाचं उगमस्थान असलेली, दुसऱ्या महायुद्धाच्या काळातली अॅलिस्टर मॅक्लिनची एक रोमांचकारक साहसकथा...
-
Karunecha Swar (करुणेचा स्वर)
22 मे 2016, या दिवशी डॉ.किरण बेदी यांची पॉंडिचेरीच्या राज्यपालपदी निवड झाली. राज्यपालपदाची सुत्रे हाती घेत असताना त्यांचं ध्येय पक्कं ठरलं होतं. पॉंडिचेरीला संपन्न राज्यात परिवर्तित करणं आणि तिथल्या जनतेची सेवा करणं. हे ध्येय साध्य करताना राज्यपाल हा नामधारी असतो, हा आजवरचा रबर स्टॅम्प त्यांनी मिटवून टाकला आणि नवा इतिहास घडविला. सामान्य जनतेसाठी राजभवनचे दरवाजे खुले केले. त्यांच्यातील करुणेनं जनतेचं मन जिंकलं. करुणेला दुबळेपणाचं लक्षण मानणाऱ्यांना करुणेचं महत्त्व पटवून दिलं. डॉ.किरण बेदी यांच्या करुणामयी कारकिर्दीचा परिपाक म्हणजेच हे पुस्तक.
-
Aaji Ajobanchya Potaditlya Goshti (आजी आजोबांच्या
2020 सालात कोरोना व्हायरसनं साऱ्या जगाची दारं बंद केली. राष्ट्रीय टाळेबंदी जाहीर झाली. इकडे शिगावला आजी-आजोबांच्या घरी नातवंडांसह कमलु आजीचा प्रवेश झाला. नातवंडांनी या काळात आजीआजोबांना अनेक कामांमध्ये हातभार लावला. पण त्याचसोबत त्यांच्यासाठी गोष्टींचं एक अफलातून जग खुलं झालं. राजा-राणी, जादुमंतर, प्राण्यांचं गमतीदार जग या गोष्टींच्या रूपाने मुलांनी अनुभवलं. आणि त्यांची टाळेबंदीतील सुट्टी खऱ्या अर्थानं समृद्ध करणारी ठरली. एकदा हाती घेतल्यावर संपवूनच खाली ठेवावं, असं दमदार, खुसखुशीत पुस्तक.