-
IIT BIT-Eka iitianchi Anbhavgatha (आयआयटी बीआयटी-ए
‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ अर्थात आयआयटी या संस्थेबद्दल अनेकांना कुतूहल वाटतं, आकर्षण वाटतं. आपल्याला या संस्थेत शिकायला मिळावं किंवा आपला पाल्य या संस्थेत शिकून उच्चस्थानी जावा, असं अनेक विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांना वाटतं. याचं कारण तंत्रशिक्षण देणार्या जगभरातल्या नामवंत संस्थांमध्ये आपल्या देशातील आयआयटीजचा समावेश होतो. अर्थात प्रत्येक इच्छुकाला या संस्थेत प्रवेश मिळणं आणि तिथल्या शैक्षणिक वातावरणाचा अनुभव प्रत्यक्षात घेता येणं शक्य नाही. मात्र सुकन्या पाटील या एका आयआयटीअनने लिहिलेलं ‘आयआयटी-बीआयटी’ हे पुस्तक तुम्हाला हा अनुभव नक्कीच देईल. इतकंच नाही, तर आयआयटीत प्रवेश का घ्यायचा? तो मिळवण्यासाठी काय तयारी करायची? अशा प्रश्नांच्या उत्तरांपासून तिथलं शैक्षणिक वातावरण, शिक्षण देण्याची आणि घेण्याची पद्धत, त्या पद्धतीचा भाग म्हणून राबवले जाणारे विविध उपक्रम, त्या उपक्रमातून व्यापक होत जाणारा विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन आणि त्यातून पुढे सरकणारी इंजिनिअर होण्याची आणि माणूस म्हणून घडण्याची प्रक्रिया या साऱ्या बाबीचं समग्र दर्शन आपल्याला या पुस्तकातून घडेल. आयआयटी बॉम्बेमधील उत्साह वाढवणारे मूड इंडिगो, टेक फेस्टसारखे विविध उपक्रम, होस्टेल लाईफ, शिक्षक-विद्यार्थी यांच्यामधील खेळीमेळीचं वातावरण यांच्या बारीक-सारीक नोंदी घेत सुकन्याने हे पुस्तक अत्यंत रंजक पद्धतीनं लिहिलं आहे. त्यामुळे आयआयटीत जाऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि इतरांनीही हे पुस्तक आवर्जून वाचावं असं आहे. मनोविकास प्रकाशनाने असं पुस्तक प्रसिद्ध केल्याबद्दल त्याचं विशेष अभिनंदन. -अच्युत गोडबोले
-
To kill A Mockingbird (टु किल अ मॉकिंगबर्ड)
हार्पर ली या अमेरिकन लेखिकेची मुख्य ओळख एकाच रचनेमुळे जगप्रसिद्ध झालेली लेखिका अशी आहे. टु किल अ मॉकिंगबर्ड हीच ती अजरामर कलाकृती होय. ली यांच्या या कादंबरीचा विद्यागौरी खरे यांनी केलेला प्रस्तूत अनुवाद प्रकाशित करून मनोविकास प्रकाशनाने मराठी साहित्यविश्वाच्या समृद्धीत मोलाची भर घातली आहे. वसाहतवादावर पोसलेल्या सर्व युरोपियन राष्ट्रांना मागे टाकून अमेरिकेने विसाव्या शतकात पहिल्या क्रमांकावर झेप घेतली यात वाद नाही. परंतु या घोडदौडीत अफ्रिकन कृष्णवर्णीय गुलामांचे फार मोठ्या प्रमाणावर शोषण झाले ही वस्तुस्थिती आहे. असे असले तरी, अमेरिकेतीलच एक समूह निग्रोंच्या न्याय्य हक्कांसाठी कार्यरत राहिला आणि त्याने त्यासाठी गृहयुद्धाचाही धोका पत्करला. ही एक प्रकारची रुपेरी कडा होय. महात्मा जोतीराव फुले यांनी आपली ‘गुलामगिरी’ ही कृती या समूहातील न्यायप्रिय योद्ध्यांना अर्पण केली. ...तरीही वंशश्रेष्ठत्त्वाचा हा गंड अमेरिकन मानसिकतेचा जणू हिस्सा बनला. गेल्या शतकातील साठच्या दशकात हा प्रश्न परत एकदा ऐरणीवर आला होता. मार्टिन ल्यूथर किंगसारखे नेते यातूनच पुढे आले. याच रणधुमाळीत केनेडी बंधूंची कसोटी लागली. हार्पर ली यांची ही कादंबरी याच वातावरणात प्रसिद्ध झाली आणि गाजली. ऑटिकस फिंच या वकिलाच्या कुटुंबाला केंद्रस्थानी ठेऊन लिहिलेली ही कादंबरी ऑटिकसच्या स्काऊट या निरागस पण स्मार्ट मुलीच्या निवेदनातून ती आकाराला येते. यातील वंशवाद तसा खास अमेरिकन असला, तरी विद्यागौरी खरे यांनी म्हटल्याप्रमाणे आपला समाज, आपले शेजारी ह्यांचा विचार करायला शिकवणारे हे पुस्तक एकमेकांपासून तुटत चाललेल्या आत्मकेंद्री आणि स्वार्थी वृत्तीने पछाडलेल्या आपल्या समाजाकरता फार आवश्यक आहे. आपल्याच भाऊबंदांनी चालवलेल्या कृष्णवर्णीयांच्या शोषणाविरूद्ध उभ्या ठाकलेल्या वकिलाची ही कहाणी असली तरी हा वकील एक आदर्श पालक आहे. आपल्या कृत्यांचे नैतिक परिणाम विशेषत: आपल्या मुलांवर काय होतील याचा विचार करूनच पुढे पाऊल टाकणारा तो एक जबाबदार व प्रगल्भ नागरिक आहे. कादंबरीतील किशोरवयीन व प्रौढ पात्रांचा समतोल लेखिकेने खूप कौशल्याने सांभाळला आहे. अलीकडे मूल्यशिक्षणाची चर्चा नेहमी ऐकू येत असते. या दृष्टीने पाहिले तर ही कृती मूल्यशिक्षणासाठी एक उत्कृष्ट पाठ्यपुस्तक ठरावी. - सदानंद मोरे 1961 मध्ये पुलित्झर पुरस्कार प्राप्त कादंबरी आणि त्यानंतर या पुस्तकावर आधारित चित्रपटाला अकॅडमी अवॉर्डने गौरविण्यात आले. हा चित्रपट पुस्तकाप्रमाणेच देखील अभिजात कलाकृती म्हणून गणला जातो.
-
One Arranged Murder (वन अरेन्ज्ड मर्डर)
केशवने त्याचा बेस्ट फ्रेंड सौरभसोबत एक इन्व्हेस्टिगेशन एजन्सी सुरू केली आहे. हे दोन हौशी डिटेक्टिव्ह त्यांच्या आयुष्यावर परिणाम करणारी आणखी एक केस यशस्वीपणे सोडवतील का? मग त्यांच्या मैत्रीचं काय होईल? ‘तुला प्रेरणा भेटली, तेव्हापासून माझा बेस्ट फ्रेंड हरवलाय,’ मी सौरभला सांगितलं. हाय, मी केशव, आणि माझा बेस्ट फ्रेंड, फ्लॅटमेट, सहकारी आणि बिझनेस पार्टनर सौरभ माझ्याशी बोलायला तयार नाहीये. कारण, मी त्याची आणि त्याच्या होणाऱ्या बायकोची थट्टा केली. सौरभ आणि प्रेरणा लवकरच लग्न करणार आहेत. हे अरेन्ज्ड मॅरेज आहे. मात्र, लव्ह-मॅरेज केलेल्या जोडप्यांपेक्षाही जास्त गोडगोड रोमान्स त्यांच्यात सुरू असतो. करवा चौथच्या दिवशी तिने त्याच्यासाठी उपवास केला. दिवसभर तिने काही खाल्लं नाही. संध्याकाळी, तिने त्याला कॉल केला आणि उपवास सोडण्यासाठी ती गच्चीवर चंद्राची आणि सौरभची वाट पाहात थांबली. एक्साइट झालेला सौरभ तिच्या तिमजली घराच्या जिन्यावरून धावतच वर गेला. पण जेव्हा तो पोचला, तेव्हा… वेलकम टुवन अरेन्ज्ड मर्डर, भारतातील सर्वाधिक खपाच्या लेखकाची एक विलक्षण वेधक थरारकथा. प्रेम, मैत्री, परिवार आणि गुन्हा यांची ही कथा तुमचं मनोरंजन करेल आणि तुम्हाला खिळवून ठेवेल.