-
Zunj Niyatishi (झुंज नियतीशी)
१७व्या शतकात भारतीय उपखंडात जणू अंधकारांचं साम्राज्य होंत.. क्रूर लढाया, अमानुष अत्याचार आणि धर्माच्या नावाखाली होणार संस्कृतीचा आणि अध्यात्माचा ऱ्हास यामुळे स्वाभिमान लयाला गेला होता, पण छत्रपती शिवाजी ह्या दृष्टाच्या लढवय्यांन हाच हरवलेला स्वाभिमान नव्यानं संपादित केला. आर्थिक समतेची आणि दुर्बलांच्या सक्षमीकरणाची मुहूर्तमेढ रोवली, नियतीनं छत्रपती शिवाजीची सत्वपरीक्षा पदोपदी घेतली. एकीकडे पराभूत झालेला, खचलेला बहुजन समाज; तर दुसरीकडे मुघलांचं शक्तिशाली साम्राज्य आणि त्यात पाश्चात्य शक्तींनी नौदलावर मिळवलेले सर्वाधिक अशा सर्व अंगांनी शिवाजी महाराजांपुढे आव्हानं आ वासून उभी होती, मग युगानुयुगे सर्वांत प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभलेल्या भारतात परस्पर विरोधी विचारधारांचा, श्रद्धांचा आणि विभिन्न दृष्टिकोणाचा जणू संघर्षच पेटला. चला तर मग, या संघर्षमय गडद अंधारात लख्ख चकाकणाऱ्यां त्या विद्युल्लतेचा अनुभव घेऊ. आजही ती भारतीय उपखंडाला प्रकाशमान करत आहे.. तिचे प्रतिध्वनी इथल्या कानाकोपऱ्यांत आजही निनादताहेत!
-
Fidel Castro (फिडेल कॅस्ट्रो)
शेतमजुराचा मुलगा असलेल्या कॅस्ट्रो ते क्युबाचा राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो हा प्रवास अत्यंत रोमांचकारी असाच म्हटला पाहिजे. कॅस्ट्रोच्या या झंझावाती आयुष्याचा वेध कहाते यांनी अत्यंत संयतपणे घेतला आहे. कॅस्ट्रो यांच्यासारख्या वादळी व्यक्तिमत्त्वाच्या आयुष्याचा पट मांडणं हे खरं तर खूप कठीण काम. कॅस्ट्रो यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे, त्याने विद्यार्थिदशेत केलेला संघर्ष, त्यानंतर राजकारणात त्यांनी स्वत:चं निर्माण केलेलं स्थान, हे करत असताना अमेरिकेविरोधात त्यांनी दिलेला लढा, त्यांना ठार मारण्यासाठी त्यांच्यावर झालेले भीषण हल्ले या सगळ्याची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. कॅस्ट्रो यांची ही जीवनकथा ओघवत्या भाषाशैलीमुळे वाचनीय झाली आहे.