-
Gallibol (गल्लीबोळ)
या देशात भ्रष्टाचाराविरूध्द बोलण सुध्दा पुन्हा आहे. बदलत्या काळात गुन्ह्याची व्याख्या बदलली आहे.अपराधी वाघासारखे छाती काढून फिरायला मोकळे आहेत. त्यांच्या विरुध्द बोट दाखवणाऱ्याला ते आपली शिखर समजतात . हे स्वातंत्र्य त्यांना सरकारने दिलं आहे कारण त्यांचा संबंध सतेच्या गल्ली -बोळापर्यंत आहे . सता जनतेच्या मतांवर मिळते . मतांसाठी ते कसा नोटांचा खेळ खेळवतात ते आता सर्वविदित आहे .
-
Sursawalya (सूरसावल्या)
भारतीय संगीत क्षेत्रातल्या अनेक दिग्गज कलावंतांशी गाजेद्रगडकरांची झालेली ओळख , त्यांतल्या काहींशी त्यांचा झालेला दाट परिचय , काही गुरुतुल्य कलावंत ,अनेक कलावंतांच्या त्यांनी ऐकलेल्या मैफिली इ . विविध गोष्टींचे यथार्थ वर्णन या पुस्तकामधल्या पानापानावर वाचकांना आढळेल . त्यांच्या लिखाणामध्ये 'मी लिहिले- तुम्ही वाचले ' अशी गघप्राय शैली मुळीच नाही . उलट ' वाचताय ना तुम्ही ? मजा येतेय ना वाचताना ? ' अशी नम्र चौकशीपण वाचकाला ठायीठायी जाणवते . एक प्रकारे हे लिखाण म्हणजे बोली भाषेतला मोकाळाढोकळा शब्दाप्रवाहच म्हणायला हवा .
-
Bhas Abhas (भास आभास)
आकाश दिसतं पण असत नाही .वारा असतो पण दिसत नाही . ज़गताना काही अनुभव येतात ,प्रीतीचे -भीतीचे . अनुभवांना रंग असतात ,गंध असतात ,स्पर्श असतात . रंग दिसतात , गंध जाणवतात , स्पर्श जीवघेणे असतात . अनुभवांना आभा असते ;म्हणून त्यांचे आकाश असते . अनुभवांना आभास असतात ;म्हणून शब्दांना प्रकाश असतो . असेच काही भासमान, काही आभासमान अनुभव ....
-
The Happy man (द हॅपी मॅन)
पाश्चिमात्य साहित्याचे श्रेष्ठ लेखक म्हणून सॉमरसेट मॉम विश्वप्रसिध्द आहेत . कथाकार म्हणून त्यांच्या लेखणीचा प्रभाव समकालीन साहित्यावर होता, तो आजही आहे. प्रत्येक शब्दा -शब्दातून त्यांची कथा उलगडत जातो आणि वाचकाला चकित करते . नवसाहीत्यातील आधुनिकता आणि सैदर्यावाद यांचा समन्वय साधणारी मॉमची कथा ,मानवी संवेदना आणि जीवनानुभव यांचे कलात्मक प्रदर्शन करते. क़थातील पात्रांची रचना आणि भावना यांचे समर्थ चित्रण करणाऱ्या ह्या कथा वाचकांना केवळ भावूक करत नाहीत तर अंतर्मुखही करतात. मॉम यांनी कथा, कादंबरी, नाटक, अशा विविध वाड्मयप्रकारांत विपुल लेखन केले आहे .वैश्विक साहित्यातील ह्या महान कलाकाराच्या कथांचा मराठी अनुवाद वाचकांना नक्की आवडेल ,त्यांचा वाडमयीन आकलन अधिक विस्तूत समृध्द करतानाच उत्तम साहित्य वाचल्याचा आनंदही त्यांना प्राप्त होईल.
-
Floriston Bangla (फ्लॉरिस्टन बंगला)
'फ़्लॉरिस्टन बंगला' हि सत्य घटनेचा आधार असलेली कथा अभूतपूर्व आणि रोमांचकारी आहे . मरणोतर जीवनाच्या अस्तित्ववर जगाच्या प्रत्येक काना -कोपऱ्यातून काही ना काही मांडलं गेल आहे. त्यातील सत्य असत्येचा इथे शोध नाही ;परंतु प्रस्तुत कादंबरीतील अनुभव स्वत :अनुभवला आहे . सदेह नायक ,त्याची विदेही -प्रेयसी आणि त्या दोघांचा मित्र या तिघांमधील हृदय नात्याचा मोह वाचकांनाहि पडेल यात शंका नाही. श्रद्धा -अंधश्रद्धेच्या भोवऱ्यात न अडकता या कृतीतील कलात्मकतेचा आस्वाद वाचकांनी घ्यावा हि अपेक्षा .