-
-
Superhero-Dr.Prakash Aamte (सुपरहिरो- डॉ. प्रकाश आ
जिथे रस्ते नव्हते,वीज नव्हती,एव्हडंच काय,पण रोजच्या जगण्यासाठी लागणाऱ्या साध्या सुविधाही नव्हत्या, अशा हेमलकशासारख्या अतिशय दुर्गम आदिवासी भागात जाण्याचा निर्णय डॉ. प्रकाश आमटे यांनी आपल्या वडिलांना -बाबा आमटे यांना- दिलेल्या शब्दाखातर, आयुष्याचं ध्येय म्हणून घेतला. हेमलकशाच्या आजूबाजूला असलेलं जंगल,जंगलातले विंचू, साप,अस्वल आणि जंगली प्राणी ,आदिवासींच भीषण दारिद्र्य आणि कुपोषण,भाषेचे प्रश्न अशा अनेक अडचणींची मालिकाच डॉ. प्रकाश आमटे यांच्यापुढे होती. तरीही हि दुर्गम वाट स्वीकारत पुढे जाणाऱ्या डॉ. प्रकाश आमटे यांच्या अथक प्रयत्नांमधून आज हेमल कशात शाळा सुरु झाली. हॉस्पिटल उभारलं गेलं,शेती पिकू लागली आणि जे आज जगाच्या नकाशावर ठळकपणे आपली ओळख दाखवू लागलं आहे. डॉ. प्रकाश आमटे यांच्या कार्याची दखल राष्ट्रीयत्व नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आणि त्यांच्यावर 'मगसेसे' सह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांचा वर्षाव झाला. मानवतेचा ध्यास घेतलेले डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या प्रत्येक पावलावर साथ देणाऱ्या डॉ. मंदा आमटे यांनी हेमलकशातले आदिवासी आणि तिथले वन्य प्राणी यांच्या आयुष्यात नंदनवन फुलवलं. म्हणूनच तर ते ठरतात सर्वार्थानं 'तुमचे आमचे सुपरहिरो!'
-
Officemadhye Raha Fit !
मिटीग्ज...कामानिमित्त प्रवास...सतत बाहेरचं खाणं...डेडलाइन्स... आणि या सगळ्यामुळे येणारा मानसिक व शारीरिक ताण-तणाव! …ऑफीस म्हटलं की,हे सर्व आलंच आणि त्यापाठोपाठ आले त्यांचे सखे-सोबती म्हणजे,मधुमेह, उच्च रक्तदाब,स्थूलपणा,हृदयविकार आणि पाठदुखी यांसारखे विकार! या सगळ्या समस्यांच्या मुळाशी गेल्यास,त्याचं मुख्य कारण असतं-बैठं काम, व्यायामाचा अभाव आणि असंतुलित आहार-अशी अनियमित जीवनशैली. या पुस्तकात सुप्रसिद्ध आहारतज्ञ नमिता जैन यांनी कामाच्या वेळेत आणि कामाच्या जागी व्यायाम कसा करावा,हे उदाहरणांसह सांगितलं आहे. तसंच 'फास्ट लाइफ स्टील'मुळे उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांवर मत करण्यासाठी 'प्रक्टिकल' व सहज शक्य असे उपायही समजावून सांगितले आहेत.
-
Karyalayin Dehaboli (कार्यालयीन देहबोली)
व्यवहार आणि मुलाखतीत यश मिळवा उत्कृष्ट सादरीकरण करा आंतरराष्ट्रीय देहबोली समजून घ्या आणि तिचा उपयोग करा नजरेला नजर देण्याचा अर्थ जाणून घ्या स्त्री-पुरुषांच्या भिन्न देहाबोलींमुळे होणारा संभ्रम टाळा कार्यालयातील कार्यक्रम आयोजित करण्यापासून कार्यालयातील फर्निचरच्या सर्वोत्कृष्ट राच्नेपर्यंत , तुम्हाला आणणारी देहबोली ओळखायला आणि सुधरायला 'कार्यालयीन देहबोली' तुम्हाला मदत करेल.
-
Rich Dadche The Business School (रिच डॅडचे द बिझन
ज्यांना इतरांना मदत करायला आवडतं अशांसाठी! या पुस्तकात लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी नेटवर्क मार्केटिंग व्यवसायाच्या सर्वसामान्यांना न दिसणाऱ्या आठ मूल्यांबाबत विस्तारानं माहिती दिली आहे. त्याशिवाय किम कियोसाकी आणि डी एन केनडी यांनी दोन मूल्यांची भर घातली आहे, ती वेगळीच! रॉबर्ट यांच्या मते नेटवर्क मार्केटिंग व्यवसाय उभारणी हा... ... संपत्ती मिळवण्याचा क्रांतिकारी मार्ग आहे. ... संपत्ती मिळवण्यासाठीचा कोणालाही चोखाळता येणारा मार्ग आहे. ... इच्छा, कष्टांची तयारी आणि जिद्द असलेल्या प्रत्येकासाठी खुला मार्ग आहे. ' मी स्वतः नेटवर्क मार्केटिंग व्यवसायामुळे श्रीमंत झालेलो नाही, त्यामुळेच मी या व्यवसायाकडे अधिक तटस्थतेने पाहू शकलो. नेटवर्क मार्केटिंग व्यवसायामध्ये मला निव्वळ पैसा कमावणे, या पलीकडे जाणारी, त्यापेक्षाही काहीतरी अधिक असणारी मूल्यं जाणवली, ती मी या पुस्तकातून मांडली आहेत. मला स्वतःचं मन आणि हृदय असलेला व्यवसाय अखेरीस सापडलाच!'
-
Laxmanresha (लक्ष्मणरेषा)
व्यंगचित्रात भारतीय माणसं दाखवायची म्हणजे आर. के. लक्ष्मण यांना मोठा जमावच काढावा लागे. गुजराती, मराठी, केरळी, बंगाली, मद्रासी, पंजाबी अशी वेगवेगळ्या चेहरेपट्ट्यांची, पोशाखांची माणसं काढायला वेळ लागे. व्यंगचित्र सादर करण्याची वेळ गाठण्यासाठी हळूहळू या जमावातील एकेका मंडळींना लक्ष्मण चाट देऊ लागले. अखेर एकच जण उरला. टक्कल असलेला, फुगीर नाकाचा, आखूड मिश्यांचा, धोतर व चौकडीचा कोट घातलेला आणि सदोदित चेहर्यावर भांबावून गेल्याचे भाव असलेला ’सामान्य माणूस’ (कॉमन मॅन). या देशातील कोट्यवधी मूक जनतेचं प्रतिनिधित्व तो करू लागला. लक्ष्मण यांच्या या आत्मकथेत त्यांचीही अवस्था कधी कधी या ’सामान्य माणसा’सारखी होते. कधी त्यांच्या व्यंगचित्रात आकडे लपले आहेत, असं समजून सट्टा खेळणारा व्यापारी त्यांना येऊन भेटतो, कधी न्यूयॉर्कमधील पार्क अॅव्हेन्यू भागात ते रेनकोट घेऊन गेल्यानं त्यांना चुकून मेक्सिकन समजलं जातं, तर एकदा मद्य पार्टीनंतर एवढी गाढ झोप त्यांना लागते की, आयुष्यातला एक दिवस ’कोरा दिवस’ ठरतो! जीवनाच्या कॅनव्हासवर लक्ष्मण यांनी रेखाटलेली शब्दचित्रं, टिपलेल्या घटना त्यांच्या व्यंगचित्रांइतक्याच मिश्कील, खट्याळ, खुसखुशीत आहेत.