-
Mavaltichi Unhe (मावळतीची उन्हे)
जयश्री थत्ते-भट ह्या पाश्चात्य देशात – कॅनडात स्थायिक झाल्या आहेत. तेथील समाजात भावनांपेक्षा विचारांना महत्त्व अधिक. साहजिकच लेखिकेच्या लेखणीची बैठक वैचारिक आहे. परिणामी कथांमध्ये भावविवशता कमी आहे. त्याचबरोबर पाश्चात्य व पौवार्त्य समाजातील वैचारिक आणि सांस्कृतिक तफावत दिग्दर्शित करण्याची, त्यावर मार्मिक प्रहार करण्याची आणि हंसक्षीरन्यायाने त्यातील भलेपणा टिपण्याची अचूक हातोटी लेखिकेने हस्तगत केली आहे. सारांश, भारतीय व पाश्चात्य समाजाच्या सीमारेषा उकलून सांगणार्या या सर्व कथा नावीन्यपूर्ण असल्याने त्या स्वागतार्ह आहेत.
-
Dr.Aanandibai Joshi-Kaal Ani Kartutva (डॉ.आनंदीबाई
‘ डॉ. आनंदीबाई जोशी काळ आणि कर्तृत्व’ हे डॉ. अंजली कीर्तने लिखित चरित्र म्हणजे आनंदीबाईंच्या जीवनाचा नवा अन्वयार्थ आहे. एकोणिसाव्या शतकातील भारतीय समाज आणि जागतिक स्त्री-लढा यांच्या पार्श्वभूमीवर याचं लेखन केलं गेलं आहे. आनंदीबाई आणि त्यांच्या जीवनातील अन्य व्यक्ती यांच्या नातेसंबंधीचा सखोल शोध, वादग्रस्त प्रकरणांचा उलगडा, त्यांच्या कॉलेज-जीवनासंबंधीची नवी माहिती आणि आनंदीबाईंना वलयांकित विभूती न करता, गुणदोषयुक्त व्यक्ती म्हणून केलेलं त्यांच्या मनोधर्माचं विश्लेषण ही या ग्रंथाची काही ठळक वैशिष्ट्यं. आनंदीबाईंमधील पारंपरिक आर्य स्त्री आणि बंडखोर तरुणी यांतील अंतर्गत द्वंद्व, त्यातील सूक्ष्मतरल छटांसह चित्रित केलं आहे. या चरित्राद्वारे प्रथमच, आनंदीबाईंनी एम्. डी. च्या पदवीसाठी लिहिलेला प्रबंध, काही दुर्मिळ पत्रं, छायाचित्रं, आनंदीबाईंच्या अमेरिकेतील समाधीचा अंजली कीर्तने यांना कसा शोध लागला याचा वृत्तांत आणि आनंदीबाईंच्या ‘कार्पेंटर मावशी’ची एकमेव वारसदार पणती नॅन्सी कॉब-स्टोन यांच्या भेटीची उत्कट कहाणी प्रकाशात येत आहे. याच विषयावर अंजली कीर्तने यांनी एक लघुपटही तयार केला असून त्या लघुपटाला 1992-93चा सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून राज्यशासनाचा पुरस्कारही मिळालेला आहे.
-
Shrutividnyan Va Ragsaundarya (श्रुतीविज्ञान व राग
डॉ.विद्याधर ओक हे ज्येष्ठ हार्मोनियमवादक,तसेच रागसंगीताचे व्यासंगी अभ्यासक. संगीताच्या ध्यासापोटी औषधविज्ञानक्षेत्रातील करियर सोडून संगीतसंशोधनात रमलेले संशोधक कलावंत. आपल्या कल्पक संशोधनातून श्रुतींची संख्या आणि स्थाने त्यांनी निश्चित केली. जगभरात मान्यताप्राप्त या संशोधनाचे फलित म्हणजेच २२ श्रुती हार्मोनियम. जिद्द,चिकाटी अन अथक परिश्रमाने भरलेली त्यांची हि शोधगाथा सांगत आहेत प्रख्यात संगीतसमीक्षक आणि पत्रकार सदाशिव बाक्रे.
-
Dakshinrang (दक्षिणरंग)
विदेशी पर्यटनाची आपली व्याख्या युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर, मालेशियासारखे बजेटमध्ये बसणारे देश यापुरतीच मर्यादित असते. मात्र मीना प्रभू यांचं हे पुस्तक वाचलं, तर पर्यटनाचा नकाशा किती मोठा आणि आगळावेगळा असू शकतो, हे आपल्या लक्षात येतं. कारण प्रभू यांनी या पुस्तकातून दक्षिण अमरिकेतील पेरू, चिले, इक्वाडोर, कोलंबिया या देशांची सफर घडविली आहे. आपल्याला फारशी अथवा काहीही माहिती नसलेल्या या देशांचं वेगळेपण, तेथील संस्कृती, तेथील जीवन, माणसं, त्यांच्या चालीरीत, परंपरा, संस्कृती आदींची माहिती या पुस्तकात मिळते. प्रभू यांनी दक्षिण अमेरिकेत पावणेतीन महिने राहून तिथलं जीवन अनुभवलं आहे. त्यामुळे प्रत्यक्ष अनुभवांचं सच्चेपण लेखनाला लाभलं आहे.