-
Lokmanya Te Mahatma (लोकमान्य ते महात्मा)
मान्यवरांचे काही अभिप्राय या ग्रंथाद्वारे डॉ. मोरे यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाचा आणि लोकव्यवहाराचा सर्वांगीण आंतरविद्याशाखीय वेध घेतला आहे. अनेक अभ्यासकांनी एकत्र येऊन करायचे कार्य त्यांनी एकटयाने पार पाडले, ही बाब खचितच गौरवास्पद आहे. - य. दि. फडके राजकीय इतिहासचित्रणाचा एक नवा आदर्श निर्माण करणाऱ्या या ग्रंथाचे महत्त्वाचे वैशिष्टय आहे ते पुराव्यांच्या बहुसंदर्भीय पध्दतीच्या मांडणीत! - दिलीप पुरुषोत्तम चित्रे भारतीय इतिहासातील एका तेजस्वी पण तणावग्रस्त कालखंडावर प्रकाशझोत टाकताना एक पूर्णपणे नवा 'पॅरेडाइम' देणारा हा महाग्रंथ फक्त प्रबोधनच करीत नाही, तर विचारी वाचकाला अंतर्मुखही व्हायला लावतो. - कुमार केतकर मानवी जीवनाप्रमाणेच बहुमिती असणाऱ्या इतिहासाचे सर्वांगीण दर्शन घडवणाऱ्या या विशाल ग्रंथाचा आवाका थक्क करून सोडणारा आहे. प्रा. सदानंद मोरे यांनी स्वातंत्र्यलढयातील निर्णायक कालखंडाची मौलिक चिकित्सा करून विलक्षण कामगिरी पार पाडली आहे. - प्रा. जे. व्ही. नाईक 'लोकमान्य ते महात्मा' हा समग्रलक्षी महाग्रंथ म्हणजे सर्वंकष सांस्कृतिक महाचर्चा असून तिला पुराव्यांची भक्कम चौकट लाभली आहे. महाराष्ट्राच्या प्रज्ञेला आणि प्रतिभेला अभिमान वाटावा, अशी ही महान साहित्यकृती आहे. - रा. ग. जाधव महाराष्ट्राच्या आधुनिक राजकीय इतिहासाची लखलखीत सप्रमाण मीमांसा करताना डॉ. सदानंद मोरे यांनी गुंतागुंतीच्या आंतरप्रवाहांची उकल व त्यांचा अनुबंध यांचा सूक्ष्म वेध घेतला आहे आणि महाराष्ट्रात गांधी हेच टिळकांचे राजकीय वारसदार ठरले, ही गोष्ट महाराष्ट्रधर्माला साजेशी व कालसुसंगत झाली, असा निष्कर्ष काढला आहे. - सदा डुम्बरे
-
Brainwaves (ब्रेनवेव्ह्ज)
एक प्रतिभावान शास्त्रज्ञ. त्याने पाहिले एक स्वप्न सर्व विश्वाच्या कल्याणाचे, मानवजातीच्या मंगलाचे, जगातील दुरिताच्या नाशाचे.या स्वप्नपूर्तीसाठी त्याने विज्ञानाची मदत घेतली आणि एक अद्भुत शोध लावला - विचारलहरींवरील नियंत्रणाचा! पण -हा शोध ताब्यात घेतला एका महत्त्वाकांक्षी, स्वार्थी, पाताळयंत्री व्यक्तीने. आणि मग काय घडले? विज्ञानाच्या सामर्थ्याच्या वापराबद्दल विचार करायला प्रवृत्त करणारी कादंबरी.
-
Udyog Tumcha Paisa Dusryacha (उद्योग तुमचा पैसा दु
आपल्या समाजात उद्योजकांविषयी एक प्रकारचं कुतूहल आणि अनेक प्रकारचे समज-गैरसमज असतात. उद्योगाशी निगडीत अशा अनेक समजुतींचा तसंच तरुणांना व्यवसाय सुरु करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या घटनांचा उहापोह या पुस्तकात लेखकाने अतिशय रंजकपणे केला आहे. केवळ पैशाचंच पाठबळ असल्यास समजुतीलाच हावरे यांनी छेद दिला आहे. भांडवलासाठी पैसा बाहेरूनही उभा करता येतो, किंबहुना तो बाहेरूनच उभा करायचा असतो. मात्र व्यवसाय करण्यासाठी मुख्य भांडवल तुमच्यापाशी आवर्जून हवं असतं ते दुर्दम्य इच्छाशक्तीचं, आत्मविश्वासाचं व व्यवसायिक वृत्तीचं! हा मुलभुत मंत्र आत्मसात करण्यासाठी आणि पुढे प्रत्यक्षात व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी लागणाऱ्या घटकांची चर्चा ते विस्तृतपणे पुस्तकातून करतात. उद्योगाची उभारणी कशी करावी, आखणी व अंमलबजावणी, ब्रांडींग,प्लनिंग व ग्रोथ कशी करावी असे महत्वाचे विषय त्यांनी यात हाताळले आहेत. जो स्वतःच्या अनुभवातून शिकतो,तो हुशार माणूस समजला जातो पण जो इतरांच्या अनुभवातून शिकतो तो खरा चाणाक्ष माणूस. त्यामुळे नवउद्योजकासाठी किंवा उद्योगात प्रगती साधायची इच्छा असणारया तरुणांसाठी हे अनुभवाचे बोल अत्यंत उपयोगी पडतील. 'उद्योजक हा राष्ट्राची संपत्ती निर्माण करणारा मुख्य घटक असतो' असं मत हावरे आत्मविश्वासपूर्वक व्यक्त करतात. अनेक वर्ष यशस्वीपणे बांधकाम क्षेत्रातील उद्योगधुरा सांभाळणाऱ्या हावरे यांचे अनुभवाचे बोल नव उद्योजकांसाठी नक्कीच प्रेरक व मार्गदर्शक ठरतील.
-
Asahi Pakistan (असाही पाकिस्तान)
साहित्य,संस्कृती व कलाक्षेत्रातील आगळावेगळा पाकिस्तान... पाकिस्तानसारख्या शेजारी समजायला संवेदना हवी आणि राजकीय जाणही. पाकिस्तानला जाऊन, विविध क्षेत्रांमध्ये फिरून घेतलेला अनुभव हवा आणि अभ्यासही हवा. प्रत्यक्ष भेटी-गाठींमधून वेध घेण्याची उच्च पदस्थ वर्तुळातील लोकांबरोबर चर्चाही व्हायला हवी.. पाकिस्तानी साहित्याची ओळख हवी आणि भारत-पाकिस्तानमधील सांस्कृतिक साम्य स्थळांबद्दल आस्था हवी. अरविंद गोखलेंकडे या सर्व गोष्टींबरोबर आहे पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव. त्यातून कसदार झालेली लेखनशैली. पाकिस्तानच्या रस्त्यांवरून केलेली भटकंती-कधी संशयाच्या छायेत तर कधी अनोळखी माणसांनी केलेल्या आदरतिथ्याच्या मायेत. अनेकांच्या परिचयातून समजलेला पाकिस्तान आणि कितीही वाचन-चिंतन केलं तरी गूढ राहिलेला पाकिस्तान. एकाच वेळेस मित्र असूनही शत्रूच्या रुपात भासणारा आणि तरीही नेहमी अनाकलनीय कारणांसाठी आकर्षित करणारा -असा आहे गोखलेंचा पाकिस्तान अर्थात 'असाही पाकिस्तान!'
-
Raranga Dhang Nantar (रारंग ढांग नंतर)
वास्तवाचे चित्रमय दर्शन घडवणारे एक नामांकित लेखक म्हणजे प्रभाकर पेंढारकर, 'रारंगढांग' ही त्यांची गाजलेली कादंबरी. या कादंबरीची उत्तरकथा (सिक्वल) लिहिण्याचं आव्हान 'चंद्रकांत' मासिकानं दिलं, ते स्वीकारलं अन पेललं प्रा. श्रीकृष्ण शामराव सवदी यांनी. सवदी हे मुळात इंग्रजीचे प्राध्यापक. पण त्यांनी प्रदीर्घ सेवा बजावली ती डिफेन्स अकाऊन्ट्स डिपार्टमेंटमध्ये अत्यंत उच्च पदावर. वाड्मयीन व व्यावसायिक अनुभवातून मिळालेल्या बळाच्या जोरावर ते 'रारंगढंग' चं आव्हान स्वीकारू अन- पेलू शकले. पेंढारकरांपेक्षा सवदींची शैली वेगळी असली तरी 'रारंगढंग'चं प्राणतत्व त्यांना सापडलं आहे. मूळ कथेचा पोतही या उत्तरकथेत बरोबर उतरला आहे. उत्तरकथेची कल्पना पेंढारकरांना आवडली होती. सवदी लिखित या उत्तरकथेला त्यांनी नक्कीच दाद दिली असती. आता कसोटी आहे ती वाचकांच्या रसिकतेची ! मात्र ती विद्वत्तेच्या बेडीत अडकू नये !
-
Yugmudra (युगमुद्रा)
आमचे कुटुंबीयांचे नाव आज घराघरांत पोचले आहे. बाबा आमटे यांनी अंगीकारलेले सेवाव्रत त्यांच्या पुढील पिढीनेही समर्थपणे चालविले आहे. कुष्टरोग्यांची सेवा करण्यासाठी बाबांनी 'महारोगी सेवा समिती'च्या माध्यमातून जे काम केले आहे, त्याने कुष्टरोग्यांना नवे जीवन दिले. समाजालाही नवा दृष्टीकोन दिला. बाबा आमटे यांच्या सामाजिक जीवनाचे अनेकांना अप्रूप होते. त्यातील काहींनी त्यांच्याबद्दलचे विचार विविध ठिकाणी व्यक्त केले आहेत. ते 'युगमुद्रा बाबा आमटे' : साधना, वारसा, प्रेरणा'मधून एकत्र दिले आहे. यात बाबांच्या सहचारिणी साधना आमटे, चिरंजीव विकास आमटे, प्रकाश आमटे, सुना भारती आमटे, मंदा आमटे, नातू दिगंत आमटे, कौस्तुभ आमटे, अनिकेत आमटे, नात डॉ.शीतल आमटे-करजगी; तसेच नातसुना, नातजावई या कुटुंबियांच्या मनातील बाबा व्यक्त होतात. तसेच बाबांचा आदर्श घेऊन सामाजिक कार्य करणारे गिरीश कुलकर्णी, साहित्यिक, कवी वि. वा. शिरवाडकर, बा. भ. बोरकर, गो. नी. दांडेकर, पु. लं. देशपांडे, विश्राम बेडेकर, राम शेवाळकर, यदुनाथ थत्ते, नेते मधू दंडवते, एस. एम. जोशी यांनी आमटे यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.