-
Juni Viti Nava Rajya (जुनी विटी नवा राज्य)
नवी विटी नवं राज्य असलेल्या खेळ खेळायला सर्वांनाच आवडतं. पण नेहमीच ते कसं जमणार? विशेषतः सध्याच्या झंझावाती वेगाने बदलणाऱ्या समाजजीवनात? माणसांची किंमत पैश्याची किंमत नात्यांची श्रेणी समूहजीवनाची कल्पना सगळ्याच बाबतीत नवंrajya येतंय ह्या नव्या राज्याशी आपली जुनी विटी म्हणजेच जुने आदर्श, जुन्या कल्पना, जुनी स्वप्नं ह्यांचा सांधा कसा जुळवता येईल याचं मंथन करणारं पुस्तक गाजलेल्या वृत्तीपत्रीय सदराचं संकलन जुनी विटी नवं राज्य
-
Amhas Amhi Punha Pahave (आम्हांस आम्ही पुन्हा पहाव
न्या. श्री. चंद्रशेखर धर्माधिकारी हे एक प्रज्ञावान आणि व्यासंगी विचारवंत आहेत. असे असूनही विद्वत्तेच्या आणि व्यासंगाच्या उंच मनोऱ्यात त्यांनी स्वतःला बंदिस्त करून घेतलेले नाही. न्यायाधीशाच्या दूरस्थ पदावर राहूनही ते सभोवारच्या समाजाचे जीवन मुक्तपणे पाहतात, अनुभवतात आणि त्याच्या विविध समस्यांच्या बारकाईने अभ्यास करतात. त्यांच्या विचारांना आणि अभ्यासाला काही निश्चित जीवनमूल्यांचे अधिष्ठान आहे. त्यामुळे त्यांचा विचारशोध कधीच धूसर, ढगाळ होत नाही. तो नेहमीच स्पष्ट, साधार आणि प्रत्यक्षाशी बांधलेला असतो. संभ्रमावस्थेत सापडलेल्या आजच्या आपल्या समाजाला, योग्य आणि आवश्यक असे विचार देणाऱ्या थोड्या तत्वचिंतकातील ते एक प्रमुख आहेत. - वि. वा. शिरवाडकर.
-
Je Dekhe Ravi(जे देखे रवि)
प्रकाशक मंडळी पुस्तक खपले असा शब्दप्रयोग करत नाहीत,ते चालेले असा शब्दप्रयोग करतात.मला भविष्य कथनातले थोडे फार कळते.पण ते माणसांबद्दल.पुस्तकाची पत्रिका असते का? ती प्रकाशक नक्कीच मांडत असणार.सदर पुस्तक थोडे फार हलेल,चालेल कि जागेवरच बसून राहील हे येणारा काळच ठरवणार आहे.प्रकाशनाचे मुद्दल त्याला परत मिळो हि सदिच्छा व्यक्त करतो.नफा झाला तर मी हजर आहेच.
-
Lopalelya Suvarnamudra : Harvat Chalalelya Mhani (
ज्येष्ठ साहित्यिक द. ता. भोसले यांनी या पुस्तकात साडेपाचशे म्हणींची ओळख करून दिली आहे. यातील अनेक म्हणी आज वापरात नाहीत. भोसले यांनी त्या म्हणींचा अर्थ थोडक्यात समजावून सांगितला आहे. भाषेचा अभ्यास आणि त्यातील मौज अनुभवता येईल अशा या म्हणी आहेत. राज्याच्या ग्रामीण भागात वेगवेगळ्या म्हणी वापरल्या जातात, त्यादेखील इथं वाचायला मिळतात. या म्हणींमधून ग्रामीण भागातील लोकजीवनदेखील समजून येतं. एखाद्या म्हणीच्या माध्यमातून खूप मोठा आशय व्यक्त करता येतो. या पुस्तकातील म्हणी अशाच महत्त्वाच्या आहेत.
-
Shree-Shillak : Nivruttipurva Ani Nivruttipashchat
चाळीशीचा उंबरठा ओलांडलेल्या सर्वांसाठीच उपयुक्त पुस्तक. - चाळीशीतल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या निभावता निभावता उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ घालून पुरेशी 'शिल्लक' कशी ठेवायची आणि ती योग्य पद्धतीने कशी गुंतवायची याचे मर्गदर्शन. - खर्च नियोजन, उत्पन्न आणि आवक व्यवस्थापन आणि धोरणी गुंतवणूक या तीनही विषयांचा मागोवा घेणारे पुस्तक. - अनाठायी जोखीम न स्वीकारता डोळस गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध संकल्पनांची माहिती. - पतमापन म्हणजे काय, ठेवी का कर्जरोखे, त्यातल्या त्यात गृहवित्त कंपन्यात ठेवी ठेवतानाचे लाभ काय, महागाईवरचा उपाय म्हणून शेअर्स कडे कसे बघावे, ते करताना काय काळजी घ्यावी अशा अनेक विषयांना स्पर्श. - निवृत्तीनंतरही आपले आर्थिक स्वातंत्र्य जपायचे असेल तर त्याची तयारी नेमकी कशी करावी हे सांगणारे पुस्तक.
-
Prasadachi Vani... Arthath Tuka Mhane (प्रसादाची व
तुकाराम महाराज स्वतःच्या कवितेचे स्पष्टीकरण करताना म्हणतात - 'प्रसादाची वाणी वदतो उत्तरे। नाही मतांतरे जोडियेली।।' तुकोबा ईश्वरी प्रसादाने वेदांचा भाषानिरपेक्ष अर्थ पाहू शकतात कारण संस्कृत भाषेतील वेद ज्या ईश्वराने ऋषींना दाखवला तोच ईश्वर आता तुकोबांना तोच अर्थ दाखवत आहे. फरक हा आहे कि पूर्वीच्या ऋषींनी तो त्यांच्या म्हणजे संस्कृत भाषेतून पाहिला तर तुकोबा तो आता आपल्या म्हणजे मराठी भाषेतून पाहत आहेत. संत बहिणाबाई तुकोबांच्या अभंगाला 'तुकाराम वेद' असे का म्हणतात हे आत्ता लक्षात यावे. तुकोबा हे मंत्रद्रष्टे ऋषी व त्यांचे अभंग म्हणजे तुकोबांची वाणी ही प्रसादाची वाणी आहे. प्रस्तुत संपादनात तुकोबांच्या 'प्रसादाच्या वाणी'तून निघालेले काही अभंग त्यांच्या अर्थासह वाचकांपुढे ठेवले आहेत. 'अग्रोवन' दैनिकातून 'अध्यात्म' या वाचकप्रिय सदरातून प्रसिद्ध झालेल्या अभंगातील निवडक अभंगांचा संग्रह.