-
Dr. Ambedkar Purv Samajsudharak : Shivram Janba Ka
डॉ. आंबेडकर पूर्व काळात अतिशय प्रतिकूलता असताना समाज सुधारणेसाठी धडपड करणारे आणि बहिष्कृत मानलेल्या जातीतील पहिले संपादक,पत्रकार,मुद्रक आणि मालक म्हणून स्वतःच्या कार्याचा ठसा उमटवणारे शिवराम जानबा कांबळे यांच्या करयचा मूळ संदर्भ साधनांच्या आधारे वेध घेणारा ग्रंथ.
-
Ambedkari Samajache Nivdak Prashna (आंबेडकरी समाजा
भारताला स्वातंत्र्य मिळून ६० वर्षे पूर्ण झालीत, मात्र काही अपवाद वगळता, बहुसंख्य आंबेडकरी समाजाचे प्रश्न आजही त्याच स्वरुपात व त्याच तीव्रतेचे आहेत. जागतिकीकरणानंतरही प्रश्न आणखी गंभीर होताना दिसत आहे. हे प्रश्न प्रत्येकाच्या जीवन - मरणाशी निगडीत आहेत. त्यामुळे अशा प्रश्नांकडे गांभीर्याने पाहणे अत्यंत आवश्यक आहे. आंबेडकरी समाजाच्या अशा महत्वाच्या निवडक प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न ह्या पुस्तकात केला आहे.
-
Adhunik Rashtravadache Udgate: Samarth Ramdas (आधु
समर्थ रामदासांच्या 'महाराष्ट्र देशा' ची चर्चा गेल्या दीडशे वर्षात न्यायमूर्ती रानडे यांच्यापासून एस. के. कुलकर्णीपर्यंत अनेक विचारवंतानी हिरिरीने केली आहे. परंतु समर्थांच्या राष्ट्रवादाची व्यापक सर्वांगीण चिकित्सा आजवर फारशी झालेली नाही. ज्येष्ठ व्यासंगी पत्रकार रविकिरण साने यांनी हा परामर्श या ग्रंथात अत्यंत समर्थपणे घेतला आहे. केवळ समर्थांच्या राष्ट्रवादाचा विचार न करता साने यांनी या ग्रंथात एक नवा सिद्धांत मांडला आहे. युरोपीय राष्ट्रवादाच्या उदयात अंधारयुग, पुनरुज्जीवन, प्रोटेस्टंट चळवळ हा ऐतिहासिक घटनाक्रम महत्वाचा आहे. असाच घटनाक्रम त्याच काळात भारतात, विशेषतः महाराष्ट्रात घडला. त्याचा परिणाम म्हणून समर्थ रामदासांनी आधुनिक राष्ट्रवाद अत्यंत प्रगल्भपणे मांडला असे साने यांनी सप्रमाण दाखवून दिले आहे. युरोपातील ज्युडिया, हेलेस संस्कृतीची राष्ट्रवाद विषयक पार्श्वभूमी आणि भारतातील वैदिक राष्ट्रवादापासूनचा प्रवास त्यांनी नेमकेपणाने मांडला आहे. समर्थ विचारवंतांची चिकित्सा करताना त्या काळातील पाश्चात्य विचारवंत कसा विचार करीत hote हे हि दाखवून दिले आहे. सामाजिक व राष्ट्रीय विचारवंत, ऐतिहासिक धर्मसुधारक, समाजकंटक, पुरोगामी, समतावादी, निखळ बुद्धिवादी विचारवंत हे समर्थांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू त्यांनी ठळकपणे समोर आणले आहेत. समर्थ साहित्य आणि कर्तुत्व याकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारा हा ग्रंथ आहे.
-
Maratha Samaj Apeksha Ani Upeksha (मराठा समाज अपेक
मराठा समाजात औदार्य, सहिष्णुता,धैर्य,बंधुभाव व सोशिकता हे गुण ठासून भरलेले आहेत. त्यामुळेच तो वडील भावाच्या भूमिकेतून इतरांना काही मिळते म्हणून कधीही खंत करत नाही. सर्वांना दिल्यानंतर आपणास मिळावे हि भावना ठेवतो. सर्वांच्या हितातच स्वतःचे हित पाहतो. सर्वांना जेवल्यानंतर तो स्वतःच्या भुकेचा विचार करतो व दुसरयाची भूक भागल्या नंतर स्वतः तृप्तीचा ढेकर देतो. सांप्रतच्या स्थितीत अनेक प्रश्नांच्या चक्रव्युहात अडकलेल्या या भावाला इतर सर्वांनी मोठ्या मनाने औदार्याचा हात देऊन त्यांच्याबरोबर चालण्याची संधी देतो. यातूनच बहुजन समाजात अभिसरणाची मंदावलेली प्रक्रिया गती व समाजासमाजातील आप-पर भाव निघून जाईल. समाज हिताची तळमळ असणारे व समाजासाठी आयुष्य वेचणारे एखादे तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठा समाजात जन्मास यावेत व मराठेतर बहुजन समाजात सर्वहारा समाजाची तळमळ असणारे एखादे श्रीमंत राजर्षि शाहू महाराज जन्मास यावेत. तरच मराठा - मराठेतर बहुजनांना न्याय मिळेल व ते गुण्यागोविंदाने राहतील.
-
Lok Sanskruticha Gabhara (लोक संस्कृतीचा गाभारा)
डॉ. राजेंद्र माने यांच्या या पुस्तकातून लोकसंस्कृतीचे अतिशय सशक्त, सर्वसमावेशक आणि जिज्ञासापूर्ती करणारे लेखन केलेले आहे. लोकसंस्कृती विषयीची उदासीनता, आपल्या संस्कृतीविषयी असणारी तुटलेपणाची भावना,लोकमानस आणि त्यांची जीवनशैली याविषयी असणारे आमचे अज्ञान दूर करण्याचे कार्य अशा ग्रंथामुळेच होऊ शकते. हे अज्ञान दूर करण्यासाठी त्यांनी या ग्रंथातून आपल्या लोकसंस्कृतीचे जे दर्शन घडवले आहे, ते वैशिष्ट्यपूर्ण म्हणावे लागेल.
-
He Jivan Sundar Jhale (हे जीवन सुंदर झाले)
वाळूच्या घड्याळातून कण निरंतर झरतच असतात; पण खालच्या काचपात्रात पडून त्या वाळूकानांची फुले व्हावी तसे माझे 'हे जीवन सुंदर झाले' डॉ. श्रीमती चारुशीला ओक हे एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व आहे. त्यांची वाटचाल मी ''आणि काशिनाथ घाणेकर'' या पुस्तकातून बघते आहे. ते पुस्तक मला विलक्षण आवडले होते. लेखिका म्हणून या पुस्तकाने त्यांना उत्तम नाव मिळवून दिले. त्यानंतरही त्या कथा, लेख अशा माध्यमातून अनेक नियतकालिकातून भेटत राहिल्या. एक समुपदेशक म्हणून बालक - पालक केंद्रात पार्ले येथे काम करणाऱ्या चारुशीला बाई, नामवंत नात्त्कात आपला ठसा उमटवणारी गुणवंत अभिनेत्री, उत्तम वक्ता, प्रेमळ कर्तव्यदक्ष पत्नी, मुलांची लाडकी आई, नातवंडाना मैत्रीण वाटणारी आजी. अशा कॅलिडोस्कोपिक बिलोरी व्यक्तिमत्वाची ही सौदामिनी मी ज्या कोनातून बघते त्या कोनात ती आकर्षकच वाटते. विश्वकोशाच्या त्या सन्माननीय सदस्य आहेत. 'हे जीवन सुंदर झाले' हे त्यांचे आत्मचरित्र. ते खरोखर सर्वांग सुंदर झाले आहे. ते वाचताना आपण कधी डोळे पुसतो, कधी मनी ओलावतो... तर कधी स्तिमित होतो. आत्मचरित्र हा लेखन प्रकार एक प्रकारे अत्ममग्नतेकडे घेऊन जाणारा आहे. तरी स्मृती, शैली, आणि स्वतःचा शोध घेत ललित लेखनाच्या रुपात अभिव्यक्त होण्याची मागणी करणारा हा अवघड आणि हळूवार साहित्य प्रकार आहे. चारुशीलाताईंचे हे आत्मचरित्र चिंतन, निरीक्षण, उत्कट अनुभव कथन करतानाच "हे जीवन सुंदर झाले" ह्या तृप्त समतोल वृत्तीचे दर्शन घडविणारे आहे.
-
Hindata Firta. (हिंडता फिरता)
आयुष्य समृद्धीकडे नेणारा 'भ्रमंती' हा एक राजमार्ग आहे. पण हा रस्ता साधासुधा नाही. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करूनच ह्या रस्त्यावरून चालत जावे लागते. भ्रमंती हे माणसाच्या ठायी असलेल्या एकटेपणाला मिळालेले वरदान आहे. भ्रमंतीत माणूस कधी एकटा असत नाही. चाहोबाजूचा निसर्ग, अवतीभवतीची माणसे आपल्याशी संवाद करून असतात. या संवादातून बरेच काही शिकायला मिळते. भ्रमंतीतून निखळ आनंद मिळतो. गुलजार, गिरीश कुबेर, कुमार केतकर, रविमुकुल, राजीव खांडेकर, उदय निरगुडकर, विजय कुबलेकर, दीपक करंजीकर,राणी दुर्वे, सतीश भावसार, शशिकांत सावंत,द. वि अत्रे, सुनंदा भोसेकर, प्रदीप म्हापसेकर,सतीश काळसेकर,नवनीता सेन, दीपक घारे,उज्वला दळवी, रविप्रकाश कुलकर्णी . या लेखकांनी हिंडता-फिरता भ्रमंतीतून मिळालेला आनंद आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आपण त्यांच्या ऋणात राहणेच चांगले.
-
Drushtipalikadil Srushti (दृष्टीपलीकडील सृष्टी)
आफ्रिका - एक अगम्य आणि अदभूत खंड! तेथील शतकानुशतके हिंसाचाराने व अत्याचाराने गांजलेली नि गूढ चालीरीतींच्या दुष्ट चक्रात गुरफटलेली. आजही तेथील कित्येक रहिवाशांचा चेटूक, करणी,पिशाच्चबाधा मंत्र-तंत्र,जादूटोणा नि चमत्कार यांच्यावर विश्वास आहे व त्यामुळे ते कर्मकांड व बुवाबाजीच्या आहारी गेले आहेत, हे लेखकास सहा वर्षांपूर्वी आफ्रिकेत स्थलांतर केल्यानंतर प्रकर्षाने जाणवले. 'दृष्टीपालीकडील सृष्टी' मध्ये आहेत आफ्रिकेतील अमानुष विळख्याची व्याप्ती आणि निष्पत्ती सिद्ध करणाऱ्या बारा मनोरंजक सत्यकथा. त्यातील काही आहेत चकित नि अस्वस्थ करणाऱ्या तर काही भयावह नि अंगावर शहरे आणणाऱ्या. त्यांच्या माध्यमातून लेखकाने आफ्रिकी मानसिकतेचा शोध घेतला आहे व तो सध्या, सोप्या नि उत्कंठावर्धक शैलीत सदर केला आहे. अंधश्रद्धांनी निर्मिलेली मानसिक गुलामगिरी - मग ती जगाच्या कोणत्याही भागातील असो - कशी समाजविघातक असते हे या संग्रहातील बहुतेक सार्या कथांचे सूत्र आहे. सर्वसाधारण मराठी माणसाच्या दृष्टीपालीकडील हि अज्ञात आणि अनोखी सृष्टी पाहिल्यानंतर आपल्या सभोवतीच्या समाजातील आंधश्रद्धांचे निर्मुलन करणाऱ्या चळवळीच्या कार्याची महानता व त्याचे महत्व सुस्पष्ट व्हावे अशी लेखकाची अपेक्षा आहे.
-
Une Ek (उणे एक)
पति-पत्नीचं नातं वर्षामाजी बदलत जाणारं. नवनवा चेहरा धारण करणारं. अत्यंत चिवट, चिकट आणि खोलवर रुतलेलं. या नात्याचा पोत बदलत जातो, वीण उसवत जाते, विरत जाते, रंग फिके, गडद होत जातात. मोडतोड होते, सांधे तुटतात, फाटे फुटतात; तरीही एक अदृश्य धागा, हे नातं अभंग ठेवतो. अबाधित ठेवतो. सैल पडलेली बंधन एखाद्या लहानमोठ्या प्रसंगानं परत घट्ट विणली जातात. प्रेमाच्या नाना छटा, स्वार्थाच्या कित्येक परी, सवयीची सोबत, घरातले, समाजातले कित्येक घटक या नात्याला सतत जीवदान देत असतात. चाळीसपन्नास वर्षं आपण या समोरच्या व्यक्तीबरोबर कशी घालवली, म्हणता म्हणता चार कापरे हात एकत्र येतात. हळुवार मिठी पडते. अशा या पटावरून एक सोंगटी उठून गेली तर उरते एक सोंगटी. एकातून उणे एकच अशी. ज्योत्स्ना देवधर यांच्या अल्पाक्षरी, अर्थबहुल, चित्रमयी शैलीचा मराठीला आणखी एक नजराणा – आणखी एक कादंबरी – उणे एक.
-
Encounter Vijay Salaskar Yanchya Sahaskatha (एन्का
लहानपणीच पोलीस बनण्याचे स्वप्न विजय साळसकर यांना पहिले होते. पोलीस अधिकारी बनायचे आणि चोर-पोलीस शिपायाचा खेळात चोराला पकडून विजयी व्हायचे ,असे अनोखे स्वप्न तरुण 'विजय' तेव्हा पाहायचे. पुढे मोठे झाल्यावर ,शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते इन्शुरन्स कंपनीत कामाला रहिले. तरीसुद्धा त्यांच्या मनातील पोलीस दलाविषयी असलेले आकर्षण संपलेले नव्हते. मोठ्या पगाराचा इन्शुरन्स कंपनीत काम करनार्या साळसकरांना 'पोलीस क्षेत्र' कायमच खुणावत होते. बाल वयात तरुण वयात अनेकजण आपल्याला परीने स्वप्ने पाहत असतात; परंतु प्रत्येकाची स्वप्ने पूर्ण होतातच असे नाही ; मात्र काही लोक असे असतात की,आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अखेरपर्यंत धडपड करीत राहतात. धडाकेबाज पोलीस अधिकारी विजय साळसकर हेही त्यापैकीच एक होते.
-
Shunyoupchar - Arthat Doctori Upay Nakoch : Bhag 5
शून्योपचार चिकित्सेची सखोल माहिती देणारे, हे पाचवे पुस्तक. यात शरीरास होणाऱ्या सर्व रोगांची सतरा बाह्य कारणे तपशीलवार सांगितली आहे. शिवाय एकूणच रोगांसाठी शरीरांतर्गत निर्माण होणारा टाकाऊ व आम्ल पदार्थ कसा कारणीभूत असतो; याचीही उपयुक्त माहिती दिली आहे. त्याचबरोबर तो नष्ट करण्याचे बावीस शून्योपचार दिले अहेत. स्त्रियांसाठी, वृद्धांसाठी आणि अर्भक, बालसंगोपन तसेच तरुणावास्थेपर्यंत अतिशय साधे, सोपे उपाय लेखकाने दिले आहेत. याखेरीज सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी यासाठी अनेक उपाय दिले अहेत. सवयी, देवपूजा, मंत्रोपचार तसेच वीर्यरक्षण, सुप्रजनन इत्यादींबाबातही शून्योपचार दिले आहेत. निरोगी राहू इच्छिणाऱ्यांसाठी पुस्तकाच्या शेवटी शून्योपचाराचा बावीस कलमी कार्यक्रम दिला आहे.
-
Anandayatri Dudhwala (आणन्दयात्री दूधवाला)
१९४९ मध्ये केरळचे वर्गिस कुरियन, हे अमेरिकेतून मेकॅनिकल इंजिनीयरिंगचे शिक्षण घेऊन गुजरातमध्ये स्थायिक झाले. आणि दुधाला स्पर्श न करणाऱ्या या अवलियाने तिथे दुग्धक्रांती घडवून आणली. त्या क्रांतीने वर्गिस कुरियन यांना 'भारताचा दुधवाला' ही उपाधी प्राप्त झाली. वर्गिस कुरियन यांनी आपले संपूर्ण आयुष्य गुजरातमध्ये घालवले. तिथल्या अशिक्षित शेतकऱ्यांना हाताशी धरून त्यांनी साऱ्या जगाला अक्षरशः दुध पाजले, असे म्हटले तर वावगे ठरू नये. त्यांच्या अथक प्रयत्नांतून दुग्ध्याव्यावासायातील, 'बिलियन लिटर आयडिया' हा दुधाचा पूर आणणारा प्रकल्प ठरला. म्हणून त्यांना त्यांच्या या असामान्य कार्यासाठी विविध राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरील मानसन्मान प्राप्त झाले. आज त्यांच्या हयातीनंतरही लोकांच्या हृदयात अमूल चा ब्र्यांड कायमचा कोरला गेला आहे. विज्ञानलेखक जोसेफ तुस्कानो यांनी असामान्य अशा वर्गिस कुरियन यांचा ललित शैलीने घेतलेला जीवनालेख तरुणांना नक्कीच स्फूर्तिदायक ठरेल !