-
Falnichya Deshat (फाळणीच्या देशात)
दक्षिण आफ्रिकेतला वर्णद्वेष. पूर्व आणि पश्चिम जर्मनीला विभागणारी बर्लिन भिंत आणि भारताची फाळणी या सर्व घटना म्हणजे इतिहासाचा अविभाज्य काळा भाग. कालांतराने तो वर्णद्वेष विरघळतोय. भिंत तुटतेय... वारे वाहू लागलेयत. हा नवा इतिहास घडताना, तुटलेली मनंजुळत असलेली पाहताना एका संवेदनाक्षम पत्रकाराच्या मनात उठलेल्या स्पंदनांचं हे एक शब्दरूप...
-
Raktarekha (रक्तरेखा)
'पुन:प्रहार' ! सोलापूरच्या,कानडी ढंगाने मराठी भाषा बोलणाऱ्या शशी भागवताने 'मराठी विषयी घेऊन कसाबसा मुंबईच्या विल्सन कॉलेजात प्रवेश मिळवला... आणि आठ दिवसात प्रा. बा. ल. कुलकर्ण्यांनी त्याला 'मराठी'च्या बाहेरची वाट दाखवली. माझे 'मराठी'चांगले नसावे. कदाचित मुलीच्या देखत झालेला तो मानभंग मला बोचला आणि मला लेखक करून गेला,पण नाही! मी लहानपणी शाळेतही काहीबाही लिहित होतोच!पण तरीही हे तेवढ्यामुळेच घडले असावे,असेही नाही... त्याला अगम्य,अर्तक्य असे काही वेगळेच कारण असावे-मागील जन्मी माझे हे अपूर्ण राहिलेले 'कर्म'ही असण्याचा संभाव आहे. म्हणजे हा पुनर्जन्म...? होय,पुनर्जन्मावर निदान माझा तरी विश्वास आहे... त्या शिवाय 'कर्म'ह्या गोष्टीला काही अर्थच नाही. आज ह्या गोष्टीला काही अर्थच नाही. आज ह्या 'रक्तारेखे'ला साक्षी ठेऊन 'मी' संकल्प सोडतो आहे... मी आज लिहिणार आहे,ते पुनर्जन्मावर...! 'पुन:प्रहार' ! ज्याच्या त्याच्या कर्मा'चा ! गतजन्मीच्या 'कर्मा'चा ! कारण कर्मा'वाचून खरे असे काहीच नाही...!
-
Best Of Shantaram (बेस्ट ऑफ शांताराम)
व्ही.शांताराम चित्रपटाचं दिग्दर्शन करतात तरी कसं, हे राज कपूरला पाहायचं होतं. त्याची ती इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. चित्रनगरीच्या या अलौकिक किमयागाराच्या सर्वोत्तम सात चित्रपटांचा हा रसास्वाद स्वतःच्या संग्रही ठेवावा असा रसाळ आणि रंगतदार आहे.