-
Rang Yacha Vegla...(रंग याचा वेगळा...)
रंग माझा वेगळा म्हणत सर्वत्र मजेत हिंडणारा एक अवलिया आपल्यासमोर आहे. याचे साहित्य वाचून विजय तेंडूलकर,दुर्गा भागवत,विंदा करंदीकर याचे चाहते झाले. मधु लिमये,नानाजी देशमुख,बलराज मधोक याचे जवळचे मित्र होते. काश्मीरपासून देवराळाच्या सतीपर्यंत आणि कोसळणाऱ्या रशियापासून आपल्या अंटार्क्टिका मोहिमेपर्यंत हे सारे समजावे म्हणून याने शोधयात्रा केल्या. औद्योगिक क्षेत्रात संशोधन करणाऱ्या दिल्लीतील एका जागतिक कीर्तीच्या संस्थेचा हा संचालक. औद्योगिक क्षेत्रातील संशोधनासाठी याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बहुमान मिळाले. आणि हो, याने वेगळ्या दर्जेदार कविता पण केल्या!
-
End Game (एन्ड गेम)
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत चीनची हजारो-लाखो कोटींची गुंतवणूक आहे. ह्या आर्थिक सामर्थ्याच्या जोरावर चीन अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत अक्षरशः उलथापालथ घडवू शकतो. त्यातून मग दोन महासत्तांमधील लष्करी संघर्षाला सुरुवात होईल का? ह्या दोघात युद्ध भडकले, तर संपूर्ण जगच त्या वणव्यात होरपळणार हे नक्की. चीन व अमेरिकेच्या युद्धनौका समोरासमोर उभ्या ठाकल्या आहेत. कोणत्याही क्षणी भडका उडेल,अशी परिस्थिती आहे. पण हा केवळ आर्थिक किंवा लष्करी संघर्ष आहे कि त्या मागे काही मुलभूत कारणे आहेत? जगाला भेडसवणाऱ्या ह्या प्रमुख समस्या सर्वव्यापी आहेत,मग प्रत्येक राष्ट्राने त्या केवळ आपल्या हिताचा विचार करून सोडवायचा प्रयत्न केला तर हितसंबंधांचा संघर्ष अटल आहे. थ्रिलरचा रोमांचकारी अनुभव देतानाच विचारप्रवृत्त करणरी कादंबरी.