-
Kokani Mati (कोकणी मती)
समाजिक बांधिलकी जपणा-या आणि समाजासाठी करू इच्छीणा-या अनेकांना हालाखीच्या परिस्थितीतून जावे लागले आहे. परंतू हि-याला पैलू पाडताना जसे अनेक घाव सोसावे लागतात त्याचप्रमाणे अशा माणसाच्या एकूणच व्यक्तीमत्वाला समाजातून होणा-या विरोधामुळे उभारी येते, म्हणून नव्या पिढीला हे पुस्तक मार्गदर्शक होवो हीच परमेश्वराजवळ प्रार्थना.
-
Jwala Aani Phul (ज्वाला आणि फूल)
या रचनेत काव्य नि:संशय, पण केवळ काव्यात्मक अनुभूती व्यक्त करणे एवढेच तिचे कार्य नाही. इथे तरल काव्यात्मता आणि ज्वलंत विचार एकजीव झाले आहेत. सौंदर्य आणि सामर्थ्य यांचा संगम सांगणा-या एका थोर आत्माच्या या जळजळीत अविष्कारात कुठेही क्लिष्टता आढळणार नाही या सर्व चिंतनात एका प्रकारची धुंदी आहे, जोश आहे, आव्हान आहे.एकाच वेळी शिंगे, तुता-या रणभेरी वाजव्यात तशा प्रकारचा शब्दांचा, कल्पनांचा आणि विचारांचा कल्लोळ येथे आहे हे शब्द आणि या कल्पना, जीवन उत्कटतेने जीवन जगात असताना एका प्रज्ञावंताच्या हृदयाला झालेल्या जखमातल्या रक्ताने माखलेल्या आहेत. हे रक्त नुसते भळभळ वाहत नाही. चिळकांडी उडत असताना त्याचे ज्वालेत रुपांतर होते. कारण बाबासाहेबांची अनुभूती केवळ हळव्या भावनेच्या किंवा क्षणिक वेदनेच्या टप्प्यापाशी थांबत नाही तर स्वतंत्र बुद्धीने आजच्या उदवस्त मानवाच्या पुनररुज्जीवानाचा ही अनुभूती शोध घेते.
-
Mich Majha Mor (मीच माझा मोर)
प्रशांत असनारे यांच्या कवितांचा हा संग्रह. नातीगोती, दैनंदिन आयुष्य.. त्यातील विसंगती अत्यंत सफाईने टिपणाऱ्या या कविता हृदयाचा ठाव घेतात. काही वेळा भेदक भाष्य करून जातात. जळजळीत वास्तवाचा वेध घेऊन अस्वस्थही करतात. असनारे यांच्या कवितेत वाचकाला खिळवून ठेवण्याची ताकद आहे.
-
Kunabyacha Gana (कुणब्याचं गाणं)
शेतक-याचं कष्टप्रद जीवन, त्याची कर्तव्यनिष्ठा, त्याचं काळ्या मातीशी इमान त्याचं मुक्या जित्राबावरचं त्याचं विठोबावरची निस्सीम भक्ती, माणुसकीवरची आपर श्रद्धा अविरत मेहनतीची तयारी अन सहनशीलता स्थितप्रज्ञता मला लिहितं करते. मातीतून जसे तृणांकुर रुजून येतात अन आभाळाशी मुक्त सवांद साधत वा-यावर डोलत राहतात, अशी कविता रुजून येते. आतून, खूप आतून, मनाच्या अंत:करणाच्या गाभ्यातून! सृजनाची, सर्जनाची व प्रतिभेचि कुंडलं भेदून भावाविष्काराच्या, भावव्याक्तीच्या रुपात कविता हळुवार अलगद प्रकटते अन तिचा गंध आसमंतात दरवळत राहतो
-
Rajmudra (राजमुद्रा)
या पुस्तकात नामांकित अधिकाऱ्यांची माहिती दिली आहे.लहान गावातून येऊनही उत्तुंग इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी मिळवलेल्या यशाचे वर्णन त्यांच्याचकडून वाचावयास मिळते.