-
Dream Runner : Oscar Pistorius (ड्रीमरनर : ऑस्कार
ड्रीमरनर म्हणजे पायांशिवाय ऑलिम्पिक्समध्ये सहभागी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या असामान्य धावापटूची त्याच्याच स्मरणसाखळीतून उलगडत जाणारी जीवनकहाणी. जीवनाकडे पाहण्याची योग्य मनोदृष्टी असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होऊ शकतात याचा प्रत्यय देणारी,अविश्वसनीय तरीही सत्यकथा ! आपल्या घरी जन्माला आलेलं बाळ थोडं वेगळा आहे ... त्याच्या पायातल्या महत्वाच्या हाडांवाचून ते जन्माला आलंय असं त्याच्या आई-बाबांच्या कळलं. ऑस्करच्या आई-बाबांनी त्याचे दोन्ही पाय गुडघ्याखालून कापण्याचा अवघड निर्णय घेतला...त्या भविष्यात जास्तीतजास्त नॉर्मल जगता यावं यासाठी! त्याच्या आईनं त्याला एक पत्र लिहिलं होतं त्यात ती म्हणते "अंतिम रेषा सर्वत शेवटी पार करणारा हा खरा हारतो का ? त्याला पराजित म्हणयचं का ? नाही ! जो कडेला बसून नुसत खेळ पाहातो , आणि खेळात, स्पर्धेत उतरण्याचा प्रयत्न करायला धजत नाही तो खरा पराजित!"
-
Brand Guru (ब्रॅण्ड गुरु )
स्वत:चा ब्रॅण्ड बनवू इच्छिणा-या प्रत्येकासाठी - तुला आवडते ते नाव घेवून लोगो तयार होत नाही मित्रा, चित्रांची गर्दी करून लोगोमध्ये भरवता येत नाही जत्रा आवडत्या देवाचे नाव , आवडता रंग विसरा आता सर्व, नव्या शतकात सुरु आहे ब्रॅण्डिंग चे पर्व.... ' जो दिखता है वो बिकता है ' हा ब्रॅण्डिंग चा फंडा . स्वत:चाच ब्रॅण्ड बनवून तू का करीत नाहीस उद्योगधंदा विचार कसला करतोस मित्रा , आजपासून स्वत:चा ब्रॅण्ड बनविण्याचा प्रवास कर सुरु तुझ्याचसाठी ' उद्योजक मित्रा' खास हे पुस्तक 'ब्रॅण्ड गुरु' .
-
Yashacha Kanmantra (यशाचा कानमंत्र)
अमर चित्रकथा’सारखा स्तुत्य उपक्रम करणार्या अनंत पै ह्यांचे हे लेखन आहे. त्या कामात व्यग्र असतानाच त्यांच्या लक्षात आले की मुलांच्या मनात यशइच्छा असतेच पण काही वेळ त्यांची ह्यासाठीची मार्गक्रमणा चुकीची होत असते, काही वेळा त्यांना समजून घेण्यातच चूक झालेली असते न् त्यामुळे ते भरकटूही लागतात आणि बर्याचदा कमी पडतो तो त्यांचा आत्मविश्वास - तर ह्या सार्यावर मात करून यश कसे मिळवावे ह्याचेच हे मार्गदर्शन - "ध्येयानं आमूलाग्र परिवर्तन घडतं", "आत्मसंयमाने इच्छाशक्तीचा विकास", "निरीक्षणाने,श्रवणाने सुप्त सामर्थ्य जागृत करा", "ताणमुक्त व्हा आणि स्वत:ला नव्यानं घडवा" अशी पैलिखीत प्रकरणांची नुसती शीर्षके जरी वाचलीत तरी हा कानमंत्र थेट कसा पोचणारा आहे हे लक्षात येईल. 'काल-बँक-लिमिटेड’मध्ये पै ह्यांनी सांगितलेली वेळेची बचत तर सर्वांनाच उपयुक्त. इच्छुकांनी अवश्य लाभ घ्यावा. असेच आहे हे सारे !
-
Atmavishwasache Kanmantra (आत्मविश्वासाचा कानमंत्
आत्मविश्वास अभाव हे यश आपल्यापासून चार हात दूर राहण्याचे एक महत्त्वाचे कारण असते पण ते आपल्या लक्षात देतच नाही ह्याची कानउघडणी न करता जाणीव करून देत असतानाच हे यश संपादन करण्यासाठी हा अभाव कसा दूर करावा ह्याचा कानमंत्र देणारे हे पुस्तक. सर्वसाधारणपणे असा एक समज असतो की, फक्त बुद्धिमान आणि अभ्यासात उत्तम गुण मिळविणारांनाच भवितव्य असते. परंतु "तुला हे जमणारच नाही" किंवा "ही तुझी योग्यता नव्हे" असले अडसर जर आपर दूर करू शकला आणि तेच ते उगाळत बसण्यात वेळ दवडला नाही तर ही मूठभरांची मक्तेदारी राहणारच नाही तर ही मूठभरांची मक्तेदारी राहणारच नाही असा लेखकाचा दृढ विश्वास आहे न् ता त्यांनीही सहन शैलीतच व्यस्त केला आहे.