-
Kombada Zala Ghadyal (कोंबडा झाला घड्याळ)
कवी राजेश देवराव बारसागडे यांचा 'कोंबडा झाला घड्याळ' हा बालकवितांचा संग्रह आहे. प्रत्येक कविता ही अर्थपूर्ण आणि प्रवाही आहे. कधीकधी ती गुणगुणत वाटेल,ती कधी गात राहावी वाटेल. येथे इथे माणसं आहेत, प्राणी आहेत, मुलं आहेत आणि कितीतरी … जे आपल्या भोवती असतात. कविता भावपूर्ण आहेत आणि खूप अर्थपूर्ण आहेत मुलांचे भाविश्व अधिक प्रगल्भ करणा -या ह्या कविता केवळ मुलांनाच नव्हे तर सर्वांनाच आवडतील.
-
Gangemadhe Gagan Vitlale (गंगेमध्ये गगन वितळले )
गांधी - काळाच्या चरख्यावर माणुसकीची वस्त्रं विणणारा विसाव्या शतकातला कबीर. गांधींनी एका धाग्यात देश जोडला! मनं सांधली! फाळणीचं दुर्दैव मात्र ते टाळू शकले नाहीत. धर्म ही त्यांच्या मते एक उन्नत प्रेरणा. पण त्यांच्या समोर मात्र धर्माच्या नावावरच रक्त सांडलं-सांडत राहिलं. विलक्षण प्रेम आणि आत्यंतिक द्वेष अशा कचाट्यात असतो गांधी. पुन्हा एकदा पाह्यला हवं महात्म्याकडं. महादेवभाई देसाई, जमनालाल बजाज, मनुबेन गांधी, हरिलाल गांधी... या आणि अशाच काही जिवलग सहकार्यांच्या आठवणी, दैनंदिनी आणि पत्रव्यवहारातून एक वेगळाच नयानवेला गांधी रेखांकित होतो.
-
Baba Amte (बाबा आमटे)
पर्यावरण सार्वभौमत्वाच्या वाटेवरला मी योगी? छे मी तर वियोगी! मिळाले नाही मला मागितले ते सर्व पण पाहिलेली सर्व स्वप्नं साकारली आहेत. माझी म्हणूनच आज आयुष्याचा मावळतीला निघालोय पकडायला नर्मदा किना-यावरचा सूर्योदय. मला ठाऊक आहे हे समान्य माणसाचे शतक आहे. न्यायोचित माणसाला अन्याय अवस्थेत जागा एकच : जागा किंवा एकच तरुंग किंवा मृत्यू तरुंगाबद्दल मला प्रेम आहे आणि मृत्यूचे मला भय नाही. या माझ्या लोकमतेचं लावण्य कुणी हिरावून घेऊ नये म्हणून माझं मी जीवन उधळत राहणार आहे जगत राहणार आहे मी...