-
Devsbhasha,Vaspati An Parani,Tasech Anya Lok Yanch
शुद्ध भाषा, तसेच देवनागरी लिपी यांचे महत्त्व, मानवांची भाषा आणि देवतांची भाषा यांतील भेद, भाषानिर्मितीविषयी पाश्चात्त्यांचे अयोग्य अनुमान, सप्तलोक, सप्तपाताळ अन् सप्तनरक येथील भाषा, जिवाणू, जंतू, वनस्पती, पक्षी आणि पशू यांच्या भाषा यांविषयीचे एकत्रितपणे कुठेही उपलब्ध नसलेले ज्ञान या ग्रंथातून आपल्याला मिळते.
-
Dhyasparva(ध्यासपर्व)
रावसाहेबांच्या जीवनाचा आलेख प्रामुख्याने संघर्ष आणि लढे यांनीच चितारलेला आढळून येतो. जे मनाला आणि बुद्धीला भावले, त्याची सदोदित पाठराखण केली. जे भावले नाही, त्याच्या विरोधात परिणामाची क्षिती न बाळगता उभे ठाकले. फुले, गांधीजी आणि कर्मवीर अण्णाना अभिप्रेत असणारी समाजिक व्यवस्था निर्माण करण्याचा जीवनभर ध्यास घेतला. या ध्यासापोटी सत्ता आणि मत्ता यांच्यापासून जाणीवपूर्वक आणि निग्रहाने दूर राहिले. इतकेच नाही तर सर्व समाजिक आणि शैक्षणिक कार्यांत कोणाकडून पै - पाव आण्याची अपेक्षा न करतना पदरमोड करून तनमनधनाने सहभागी झाले. एका ध्येयवादी, संवेदनशील व्यक्तीने जीवनातील अनुभूतींचे केलेले कथन.
-
Tejshalaka-Irena Sendler(तेजशलाका- इरेना सेंडलर)
नाझी भस्मासुर हिटलर आणि त्याच्या अनुयायांचा हिंस्त्र व क्रूर नंगानाच चालू असताना तब्बल अडीच हजार ज्यू बालकांचा प्राण वाचवणार्या शूर महिलेची ही गोष्ट. इरेना सेंडलर या त्या तेजस्वी महिलेचे अलीकडेच निधन झाले. ती मावळतीकडे जात होत होती तसतसे तिचे दुसर्या महायुद्धातले हे अलौकिक शौर्य जगाला कळत गेले. ही ओघवती कहाणी श्वास रोखून धरायला लावते. दुसर्या महायुद्धाच्या छळछावणीतून अडीच हजार ज्यू मुलांना नाझींच्या तावडीतून वाचविण्याचे अद्वितीय कार्य करणार्या पोलिस महिला इरेना सेंडलर यांची स्फूर्ती देणारी कहाणी 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीचे वरिष्ठ उपसंपादक अभिजीत थिटे यांनी या पुस्तकात कथन केली आहे ..... दुसर्या महायुद्धाचा काळ, पोलंड पुन्हा एकदा पारतंत्र्यात गेलं, रशिया आणि जर्मनीनं पोलंडचे लचके तोडले. नाझी सेना पोलंडमध्ये घुसल्या आणि सुरू झालं एक विनाशपर्व, मानवी इतिहासातील सगळ्यात काळाकुट्ट अध्याय याच काळात रचला गेला. ज्यूंचं शिरकाण सुरू झालं. वॉर्सा घेटोमध्ये लाखो ज्यूंना कोंडून ठेवलं होतं. पोलंडमधील छळछावण्या रोज हजारो ज्यूंना जाळत होत्या. घेटोमध्ये दरमहा किमान पाच हजार ज्यू मृत्युमुखी पडत होते. लहान मुलांना फूस लावून पळवून नेलं जात होतं. त्यांच्यावर वेगवेगळे वैद्यकीय प्रयोग करून पाहिले जात होते. सगळीकडे अंधार दाटून आला होता. सूर्य उगवेल की नाही, अशीच शंका वाटत होती. अशा वेळी एक पणती धीटपणे उभी राहिली. या अंधाराला भ्यायलेलेल्यांना धीर देत राहिली. त्या पणतीचं नाव होतं इरेना सेंडलर. स्वत:च्या जिवाचा विचार न करता अडीच हजार ज्यू मुलांना नाझींच्या तावडीतून वाचविणारी धीट आई. नाझींच्या छळाला तोंड देत, स्वत: मृत्यूच्या दारी पोहोचलेली असतानाही मानवता धर्माचाच विचार करणारी अखिल मानवतेची आई.
-
Giving(गिव्हिंग)
या पुस्तकातून राष्ट्रपति क्लिंटन यांची सार्वजनिक सेवा, कॉर्पोरेट आणि व्यक्तिगत पातळीवरील सक्रियता प्रेरित करते. या पुस्तकातून त्यांनी जगातील अनेक उल्लेखनीय संस्था, उल्लेखनीय गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. तसेच ते असा संदेश देतात की प्रत्येक व्यक्तीने समाजात बदल घडावा म्हणून वय, वेळ, पैसा हे गृहीत न धरता झटले पाहिजे.
-
Social Median Ghadavaleli Kranti(इजिप्त... वेल घोन
गूगलसारख्या जगप्रसिद्ध कंपनीतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून वेल घोनिम देशवासीयांसाठी लढा उभारतो. इजिप्तमधील जनतेला तो संघटित करतो ते केवळ फेसबुकच्या माध्यमातून. सोशल मीडियाचा वापर मंनोरंजनापलीकडे करणारे वेल घोनिमची ही कथा धनंजय बिजले यांनी लिहिली आहे. 18 दिवसांच्या क्रांतीने तीस वर्षांची राजवट लयाला जाण्याचे हे इतिहासातील पहिलेच उदाहरण आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या या ऐतिहासिक क्रांतीचा वेध घेण्यात हे पुस्तक यशस्वी ठरले आहे.
-
The Comeback(द कमबॅक)
A riveting corporate tale that would be of special interest to anyone who has ever wondered what it takes to survive in business. This is a story of an engineer and his construction company. A series of reckless decisions by his trusted colleagues , of which he is quite unaware, take the company on a downward spiral and he realizes to his horror that he is on the bank of bankruptcy .. But … Harsh Mehta, the protagonist of the novel chooses the path of arduous struggle and not only he turns around his company but salvage his honour among his clients and restore his self-esteem.
-
Ahe Loktantra Tarihi (आहे लोकतंत्र तरीही)
आज आपल्या देशात लोकशाही नांदत असतानाही काही वैगुण्यांनी देशाची कामगिरी झाकोळली जात आहे. अशी वैगुण्ये कोणते, समाजात अजून कोणत्या उणीवा राहिल्या आहेत, त्या दूर करण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत, अशा प्रश्नांची चर्चा डॉ. सहसबुद्धे यांनी आपल्या या 'आहे लोक-तंत्र तरीही...' या लेख-संग्रहात केली आहे. डॉ. सहसबुद्धे एखाद्या राजकीय किंवा सामाजिक घटनेकडे पाहून किती वेगवेगळ्या अंगांनी विचार करतात, याची उदाहरणे या लेख-संग्रहात अनेक पानांवर आढळतात.