-
Rang Sukhache (रंग सुखाचे)
एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे जरतारी हे वस्त्र मानवा, तुझिया आयुष्याचे'' ग. दि. माडगूळकरांचा हा संदेश वेगवेगळ्या ढंगाने लेखिकेने या पुस्तकात फुलवला आहे. आजचं जीवन धकाधकीचं बनलेलं आहे. अनेक समस्या, संघर्ष आणि ताणांनी माणसाचं आयुष्य व्यापून गेलं आहे. आणि म्हणूनच तो सुखाला पारखा झाला आहे असे त्याला वाटते, परंतु सुख ही एक मानसिक सवय आहे. माणसाचं जीवन अनुभवणं यातच खरं सुख आहे. हे जीवन अनुभवताना भावनांचे, विचारांचे वेगवेगळे पैलू दृसि पडतात. या पैलूतून सुखाचे वेगवेगळे रगं नजरेस पडतात. अनुभवायला मिळतात. फक्त हे रंग पाहण्याची दृष्टी, तसा चष्मा आपणास असला पाहिजे व अशी 'दृष्टी’ देण्याचे मार्गदर्शन या पुस्तकातून रमा मराठे यांनी केले आहे. नेहमीच आनंदी राहण्याचे मर्म सांगणारे सुखाच्या प्राप्तीचे मार्ग सांगणारे पुस्तक.
-
Off Line (ऑफ लाईन)
विज्ञानकथा हा प्रकार मराठीत रुजवणा-या निवडक लेखकांपैकी एक म्हणजे डॉ. बाळ फोंडके. ‘ऑफ लाइन’ या नव्या कथासंग्रहातही अशाच विज्ञानकथा जरी असल्या तरीही या कथांना पूर्णपणे विज्ञानकथा म्हणता येणार नाही. कारण या कथा म्हणजे तंत्रज्ञानाच्या आवाक्याने झपाटून गेलेल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा घेतलेला वेध म्हणावा लागेल. कारण वैज्ञानिक शोधामुळे मानवी आयुष्य अतिशय गतिमान झालं असलं तरी आयुष्याला मिळालेल्या या गतीमधून कुठेतरी आपलं माणूसपण हरवत चाललं आहे. याचीच जाणीव या कथा वाचताना वेळोवेळी होत राहते.
-
Nelson Mandela(नेल्सन मंडेला )
दक्षिण आफ्रिकेवर ब्रिटीशांनी व नंतर अन्य युरोपीय देशांनी कायम वर्चस्व ठेवले. देश स्वतंत्र झाला तरी तेथील वर्णद्वेष कायम राहिला. तेथील गोऱ्यांनी घटनेतच कृष्णवर्नियांना दुय्यम ठरविले. त्यामुळे लोकसंख्ये[...]