-
Warren Buffett Yanche Guntavanuk Mantra (वॉरन बफे
खेळण्या-बागडण्याच्या वयात एखादं मूल कोकच्या बाटल्या विकतं, घरोघरी वर्तमानपत्र टाकतं. एवढंच नव्हे तर यांसारखे अनेकविध व्यवसाय करून मिळवलेल्या रकमेतून अकराव्या वर्षी शेअर्सची खरेदी करतं... लवकरच जमीन विकत घेतं आणि इन्कम टॅक्सचं रिटर्न दाखल करून हशारीने आपली मिळकत व खर्च यांचा हिशेबही मांडतं... ही कोणतीही काल्पनिक कथा नव्हे तर हे आहे दिग्गज गुंतवणूकदार वॉरन बफे यांच्या बालपणाचं वर्णन... जगाला स्तिमित करणारं गुंतवणुकीचं साम्राज्य उभं करणारे वॉरन जितके श्रीमंत आहेत तितकेच मूल्यसंपन्नही. सर्वोच्च दर्जाची व्यावसायिक तत्त्वं आणि अफाट दानशूरता हे त्यांच्या लखलखत्या कारकिर्दीतील महत्त्वाचे पैलू. व्यवस्थापनातील आदर्श असलेल्या वॉरन यांनी आपल्या यशाची सूत्रं वेळोवेळी सर्वांसमोर खुली केली आहेत. त्याचबरोबर दीर्घकालीन गुंतवणुकीकडे बघण्याचा विवेकी दृष्टिकोन देऊन त्यांनी गुंतवणूकदारांसमोर आदर्शही ठेवला आहे. त्यांच्या याच दृष्टिकोनातून आकाराला आलेले हे अनोखे गुंतवणूक मंत्र वाचकांसाठी दीपस्तंभ ठरतील.
-
Chanakyacha Mantra (चाणक्याचा मंत्र)
`चाणक्याचा मंत्र`. चाणक्य कोण हे सर्व भारतीयांस चांगलेच ठाऊक आहे. इसवीसन पूर्व ३४०. परिस्थितीने होरपळलेला पण ध्येयाने झपाटलेला एक ब्राह्मण युवक आपल्या परमप्रिय पित्याच्या निर्घृण हत्येचा सूड घेण्याची प्रतिज्ञा करतो. थंड डोक्याचा, कावेबाज, कठोर व प्रचलित नीतिमूल्यांना न जुमानणारा तो युवक, भारतातील सर्वश्रेष्ठ रणनीतिकार बनतो. अलेक्झांडरच्या आक्रमणाविरुद्ध विस्कळीत झालेल्या भारताला एकसंघ बनवण्यात यशस्वी होतो. चंद्रगुप्ताला विशाल मौर्य साम्राज्याच्या सिंहासनावर विराजमान करतो. आजच्या काळात म्हणजे अडीच सहस्राद्बीनंतर चाणक्य पुन्हा गंगासागर मिश्राच्या रूपात अवतार घेतो. भारतातील एका छोट्या शहरात, व्यवसायाने शिक्षक असणारा गंगासागर अनेक महत्त्वाकांक्षी व्यक्तींना आपल्या हातातील कठपुतळ्या बनवतो.आधुनिक भारत हा प्राचीन भारतासारखाच वर्णभेद, भ्रष्टाचार आणि समाज विभाजक राजकारण ह्यांनी दुंभगलेला आहे. हा कावेबाज पंडित, भारताला पुन्हा एकदा एकत्र आणण्याचा चमत्कार करू शकेल का? याचे उत्तर मिळवण्यासाठी अश्विन सांघी या सर्वाधिक खपाची पुस्तके लिहिणाऱ्या या लेखकाचे `चाणक्याचा मंत्र` हे पुस्तक वाचलेच पाहिजे.
-
Sanskrutik Bharatatil Shreshtha Lokakatha (सांस्कृ
दक्षिण आशियातील ब्रह्मदेश, थायलंड, लाओस, व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया आणि कोरिया या देशांतील निवडक लोककथा या पुस्तकात आहेत. या सर्व देशांत भारतीय संस्कृतीचा हजारो वर्षांपासून प्रसार झालेला आहे. या प्रदेशाला 'बृहत् भारत' असेही म्हणतात किंवा आजच्या भाषेत आपण त्याला 'विस्तारित भारत' असेही म्हणू शकतो. सर्व दक्षिण आशियातील देशांत भारतीय संस्कृती व भारतीय जीवनमूल्यांचा फार खोलवरचा प्रभाव आहे. या सर्व देशांची लोकसंस्कृती अतिशय समृद्ध आहे. इथे लोककथांचे प्रचंड भांडार उपलब्ध आहे. या पुस्तकात प्रत्येक देशाच्या दहा कथा निवडताना ज्या कथांतून भारतीय जीवनमूल्यांचे दर्शन घडेल अशा कथा निवडल्या आहेत. या कथांतून भावासाठी बलिदान देणारी बहीण, आईची रक्षा करणारा वाघ, एकनिष्ठ पत्नी, एकनिष्ठ पती, कर्तव्यदक्ष राजा, गुंतागुंतीच्या प्रकरणात न्याय करणारा न्यायाधीश, मधाच्या एका थेंबासाठी राज्य कसे गेले, अशा अनेक विषयांवरच्या कथा वाचायला मिळतात. यातील प्रत्येक कथा आपल्याला भारतीय जीवनमूल्यांचे दर्शन घडवील आणि त्या देशांचे आपल्या देशाशी नाते आहे हे लक्षात येईल. यातील कथा या सर्व देशांना भारतीयांशी जैविकरीत्या जोडणाऱ्या आहेत. हे सर्व देश म्हणजे आपल्या संस्कृतीचा विस्तार आहेत.
-
Dr.Babasaheb Ambedkar Anubhav Aani Aathavani (डॉ.
डॉ. आंबेडकरांचे काही इतस्तत: विखुरलेले अनुभव आणि त्यांचे सहकारी व निकटवर्तीय यांच्या आठवणी येथे एकत्र केल्या आहेत. बुद्धिमान, कष्टाळू आणि संवेदनशील अशा डॉ. आंबेडकरांच्या वाटेत पूर्वग्रहांची अभेद्य व चिरेबंद भिंत कशी आडवी आली होती आणि तिने त्यांचे जीवनकार्यच कसे संकटात आणले होते हे वाचकाला येथे दिसेल. समजूतदार आस्थेवाईकपणे टिपलेल्या त्यांच्या सशक्त व चैतन्यमय व्यक्तिमत्त्वाच्या खुणा त्याला येथे आढळतील. त्यांचे धवल चरित्र आणि उज्ज्वल यश पाहून प्रशंसेची दाद त्याला द्यावीशी वाटेल. ते त्यांच्या काळातील स लक्षणीय व होते. त्यांचे अल्पज्ञात पैलू, चारित्र्य आणि तत्कालीन गुंतागुंतीच्यी परिस्थिती यावर प्रकाशझोत टाकल्यामुळे हा एक अमूल्य ग्रंथ झाला आहे. पुढेही तो तसाच राहील.
-
Kameru (कामेरू)
मराठीतील एक श्रेष्ठ कादंबरीकार म्हणून श्री. ना. पेंडसे परिचित आहेत. कोकणचा निसर्गसमृद्ध प्रदेश त्यांनी आपल्या लेखणीतून समर्थपणे उभा केला आहे. कथा, कादंबरी, नाटक, आत्मचरित्र या विविध वाङ्मयप्रकारात त्यांनी चौफेर आणि सशक्त लेखन केले आहे. कोकणातील माणसं, वेगवेगळी ठिकाणं आणि संपन्न समुद्रकिनारा याचं सर्जन म्हणजे पेंडसे यांचं एकूण लेखन आहे. घटना, प्रसंग, निवेदन, संवाद, सहज भाषाशैलीत जीवनानुभव त्यांच्या लेखनात सहजपणे येऊन जातो. रंजनात्मकतेच्या पलीकडे जाऊन स्वत:ला जाणवलेली अनुभवसृष्टी ते आपल्या लेखनातून उभी करतात. जीवनातील नाट्य रेखाटताना निवेदनात तटस्थ तरीही जीवनवेधी अशा चैतन्ययुक्त, जिवंत निवेदनातून जीवनाचे नाट्यमय दर्शन घडवतात. त्यांच्या ‘कामेरू’ या कादंबरीचा विषय कामभावना असला तरी वैविध्यपूर्ण विषय यात येतात. ग्रामजीवनापासून सुरू होणारी ही कथा शहरी जीवनात स्थिरावते. कामवासनांचे, सुखदु:खांचे चित्रण विलक्षणतेने येते. आदिम कामेच्छांचे चित्रण अस्वस्थ करते. अनीतिमानतेवरही प्रकाशझोत टाकते. एकूणच कामभावना आणि त्याभोवती येणारे आदी विषय पेंडसे सूक्ष्मपणे ‘कामेरू’मधून रेखाटतात.
-
Lifestyle (लाईफस्टाईल)
तुमची ‘लाईफस्टाईल’ कशी असावी? हे ठरवायचं तुमचं तुम्हीच! तो अधिकार आणि स्वातंत्र्य फक्त तुम्हालाच, इतर कुणालाही नाही.
-
Bhartiya Udyojika (भारतीय उद्योजिका)
भारतीय उद्योगविश्वात तळपणार्या महत्त्वाकांक्षी स्त्रियांच्या या संघर्षकथा आपल्याला स्तिमित करतात. भारतासारख्या पुरुषप्रधान देशात स्त्रियांनी कॉर्पोरेट क्षेत्रात अत्युच्च स्थान प्राप्त करणं ही खचितच सोपी गोष्ट नव्हे. अढळ आत्मविश्वास, असामान्य बुद्धिमत्ता, निर्णयकौशल्य, यासोबतच स्त्री म्हणून तोंड द्यावा लागणार्या कौटुंबिक व व्यावसायिक पातळीवरच्या अनंत अडचणींवर मात करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती या गुणांच्या बळावरच या स्त्रियांनी उत्त्तुंग झेप घेतली. कठोर परिश्रम व बांधिलकीच्या जोरावर त्यांनी खाचखळग्यांनी भरलेला स्पर्धेचा काटेरी मार्ग तुडवला आणि त्या यशोशिखरावर विराजमान झाल्या. मल्लिका श्रीनिवासन. राजश्री पॅथी. वंदना लूथरा. प्रीथा रेड्डी. अखिला श्रीनिवासन. अनू आगा. डॉ. अमृता पटेल. इंद्रा नूयी. इंदू जैन. एकता कपूर. कल्पना मोरपारिया. किरण मजूमदार शॉ. चंदा कोचर. जरीना मेहता. जिया मोदी. ज्योती नाईक. तर्जनी वकील. नीलम धवन. नैना लाल किदवई. पिया सिंह. प्रिया पॉल. फाल्गुनी नायर. मीरा सान्याल. मेहर पद्मजी. रंजना कुमार. रितू कुमार. रेणुका रामनाथ. रेणू सूद कर्नाड. ललिता डी. गुप्ते. सुधा नारायण मूर्ती.
-
Valmikiramayana (वाल्मीकिरामायण)
श्रीवाल्मीकिरामायणाला आदिकाव्याचा दर्जा आहे. रामकथा भारतभर पसरून अनेक भाषांमध्ये रामायण लिहिले गेले आहे; परंतु फक्त मूळ वाल्मीकिरामायण समोर ठेवून त्यावर प्रवचने होणे हे मराठीत तसे अपूर्वच. श्री. माधवराव चितळे यांनी अशा या ८८ प्रवचनांचा प्रपंच पाच वर्षांत पूर्ण केला. त्याचेच हे संपादित रूप! वाल्मीकींची रचना साहित्य म्हणून सुंदर आहेच; पण ही नुसती रामकथा नाही. त्यात इतिहास, भूगोल, समाजव्यवस्था, त्यातील चालीरीती, राज्यव्यवस्था, राजाकडून असलेल्या अपेक्षा, मानवी संबंध अशा अनेक विषयांची विस्तृत मांडणी आहे. अगदी आपल्याला आश्चर्य वाटेल अशी! या प्रवचनांमध्ये अशा सर्व पैलूंवर प्रकाश टाकलेला दिसेल आणि आजच्या संदर्भातले याचे महत्त्वही कळेल. तसेच काही रूढ समजुती - उदा. सीतास्वयंवर, अहल्येची, शबरीची कथा याबद्दलही वाल्मीकींनी वेगळेच सांगितलेले दिसेल. वाल्मीकींचा हनुमान तर आपल्या कथांमधून येणार्या हनुमानापेक्षा कसा वेगळा होता तेही महत्त्वाचे आहे. राम हा विष्णूचा अवतार म्हणून जन्माला आला असला तरी रामायणात त्याचे एक कर्तबगार मानव असेच चित्रण आहे, ‘राम’ असाच उल्लेख आहे. मग आपण त्याला ‘प्रभू राम’ असे का म्हणावे, ते ह्या प्रवचनांमधील प्रदीर्घ विवेचन वाचून आपल्याला समजेल. शेकडो वर्षांपासून भारतीय जनमानसाच्या मनावर राज्य करणारी ही रामकथा मूळ स्वरूपात आजच्या संदर्भाने कथन करण्यात आलेली असून, नवीन पिढीलाही हा ग्रंथ तितकाच रोमांचक वाटेल.
-
Rang Sukhache (रंग सुखाचे)
एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे जरतारी हे वस्त्र मानवा, तुझिया आयुष्याचे'' ग. दि. माडगूळकरांचा हा संदेश वेगवेगळ्या ढंगाने लेखिकेने या पुस्तकात फुलवला आहे. आजचं जीवन धकाधकीचं बनलेलं आहे. अनेक समस्या, संघर्ष आणि ताणांनी माणसाचं आयुष्य व्यापून गेलं आहे. आणि म्हणूनच तो सुखाला पारखा झाला आहे असे त्याला वाटते, परंतु सुख ही एक मानसिक सवय आहे. माणसाचं जीवन अनुभवणं यातच खरं सुख आहे. हे जीवन अनुभवताना भावनांचे, विचारांचे वेगवेगळे पैलू दृसि पडतात. या पैलूतून सुखाचे वेगवेगळे रगं नजरेस पडतात. अनुभवायला मिळतात. फक्त हे रंग पाहण्याची दृष्टी, तसा चष्मा आपणास असला पाहिजे व अशी 'दृष्टी’ देण्याचे मार्गदर्शन या पुस्तकातून रमा मराठे यांनी केले आहे. नेहमीच आनंदी राहण्याचे मर्म सांगणारे सुखाच्या प्राप्तीचे मार्ग सांगणारे पुस्तक.