-
Syria Sagale Virudh Sagale (सीरिया सगळे विरुद्ध सग
Good read. Value for money. Do buy and read. Should not take more than a few hours to read. Entertaining. Brilliant book by VP Kale. He writes close to life. Light hearted & relaxing.
-
Drashta Anuyatrik Dr. Anil kakodkar (द्र्ष्टा अणुय
समाजाच्या विविध क्षेत्रात अनेक व्यक्ति कर्तृत्वाची नवीनवी शिखरे गाठत देशाच्या उभारणीत आपले योगदान देत असतात. अशांपैकी एक असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे पद्मविभूषण डॉ. श्री. अनिल काकोडकर. ‘सूर्यकोटि समप्रभ’ ही त्यांची जीवनकहाणी. अणुशास्त्र हा विषय राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा तरीपण सर्वसामान्यांना न समजणारा. पोखरणच्या रणातून त्याची ओळख व महत्त्व आपल्या सर्वांपर्यंत पोचवताना ते अणुबॉम्ब व अणुशक्ती ह्यामधील आपला संभ्रम दूर करतात. विज्ञान आणि समाजाची नाळ जोडण्यासाठी झटताना पुढच्या पिढीला नवी क्षितिजे आणि प्रेरणा देऊन जाणारे हे व्यक्तिमत्त्व. सामर्थ्यशाली देशाच्या स्वप्नाच्या जोडीला ह्या पुस्तकात दर्शन घडते ते अणुशास्त्र ह्या विषयाला वाहून घेतलेल्या पण कुटुंबवत्सल असलेल्या एका यात्रिकाचं. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशीच डॉ. अनिल काकोडकरांची ही जीवनकहाणी. ‘सूर्यकोटि समप्रभ’ या त्यांच्यावरील चरित्र ग्रंथास माझ्या हार्दिक शुभेच्छा!
-
Bhakti-Bheeti-Bhas
आजपर्यंत आपल्या देशापुढील विविध प्रश्नांचे विवेचन अनेकांनी अनेक प्रकारे केलेले आहे. परंतु त्या प्रश्नांचा विचार सामाजिक-राजकीय समालोचनाच्या पायावर क्वचितच झालेला दिसतो. म्हणूनच श्रीमंत माने यांनी लिहिलेले ‘भक्ती-भीती-भास : फॅसिझमच्या संकटाचा अन्वयार्थ’ या पुस्तकाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. वर्तमानातील समस्यांचे एका पत्रकाराच्या तीक्ष्ण नजरेने शोधलेले सूक्ष्म तपशील जे आपल्याला माहीत नसतात किंवा त्याकडे आपले कळतनकळत दुर्लक्ष होते, त्यांचे अभ्यासपूर्ण संकलन या पुस्तकात आहे. त्यांच्याच प्रकाशात श्री. माने यांनी नजिकच्या भूतकाळाचे करून घेतलेले आकलन यामुळे वाचकांना अंतर्मुख तर करतेच, परंतु त्यांच्या जाणिवांचा विकास करण्यातही मदत करते. भारताचा आजचा कालखंड हा आपल्या संविधानकर्त्यांनी दूरदृष्टीने स्थापन केलेल्या लोकशाही प्रजासत्ताकाच्या संक्रमणाचा आहे. हे संक्रमण भविष्यात कोणती दिशा घेईल यासंबंधी ज्यांची लोकशाही मूल्यांवर निष्ठा आहे त्यांच्या दृष्टीने चिंता करायला लावणारा हा प्रश्न आहे. उद्या आपण बहुसंख्येच्या बळावर भारताला पुढारलेल्या सुसंस्कृत जगाने कालबाह्य ठरविलेल्या धर्माधिष्ठित राज्याकडे घेऊन जाणार आणि त्याच्याद्वारे एका नव्या खास भारतीय शैलीतल्या फॅसिझमला जन्म देणार, की पुन्हा आपला प्रवास प्रजासत्ताकाकडे नेणार, या गंभीर समस्येचे अनेक निर्देश या पुस्तकात आहेत. - रावसाहेब कसबे.
-
Gretachi Haak Tumhala Aiku Yetey Na (ग्रेटाची हाक
एक पंधरा वर्षांची शाळकरी मुलगी शाळेत जाण्यास नकार देते. हा गुन्हा आहे हे माहीत असूनही तो ती करते. त्यातून जगातील लाखो मुलांना स्फूर्ती मिळते. त्यानंतरच्या घटनाक्रमाने संपूर्ण जग हादरून जाते. कोणतीही कृती छोटी नसते हेच स्वीडनच्या ग्रेटा थुनबर्गने दाखवून दिलं आहे. नेमका ऋतू कोणता हा प्रश्न एका क्षणी पडावा तर पुढच्या क्षणी त्याचे अतिरेकी रूप पाहून भीतीने गाळण उडावी, अशी ऋतूंची दहशत जगभर पसरली आहे. हवामान संकटाने जग हवालदिल झालं आहे. आपली वाटचाल ही समूळ उच्चाटनाकडे आहे. याला जबाबदार कोण? विज्ञान व वैज्ञानिक 1965 पासूनच, ‘कर्बउत्सर्जन रोखून शून्यावर आणले नाही तर जग धोक्यात येईल’, असे इशारे देत आले आहेत. परंतु कुठल्याही राष्ट्रप्रमुखांनी या इशार्यांना मनावर घेतलं नाही. आता जग कडेलोटाला आलं आहे. ग्रेटा आणि लाखो मुले जगातील नेत्यांना व उद्योगपतींना याचा जाब विचारत आहेत. संयुक्त राष्ट्रसंघात ग्रेटा कडाडली, “मानवजात व जीवसृष्टी नायनाटाच्या मार्गावर असताना तुम्ही पैसा व आर्थिक विकासाच्या परीकथा सांगत बसता. तुमची हिंमत होतेच कशी? तुम्ही आम्हाला फसवत आहात आणि आम्ही हे सहन करणार नाही.’’ कार्बनमुळे काळवंडून गेलेलं जग स्वच्छ व शुभ्र व्हावं, यासाठी बलाढ्य प्रदूषकाशाहीच्या विरोधातील लढ्यात आता जगातील मुलांच्या सोबतीने शिक्षक, कलावंत, वैज्ञानिक, अर्थतज्ज्ञ आले आहेत. प्रश्न आहे तो धोरणकर्त्यांचा आणि त्यांच्या कृतीचा!