-
Mahamandi Samjun Ghetana (महामंदी समजून घेताना)
आर्थिक संकल्पना नेहमीच क्लिष्ट असतात आणि महामंदीसारखा विषय तर त्याहून जातील असतो असं आपल्यापैकी बहुतेक जणांना वाटत . सहाजिकच महामंदीचा फटका सोसूनसुध्दा त्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला तरी तो बहुदा अयशस्वी ठरतो . २००८ साली सुरु झालेली जागतिक महामंदी नक्की कशामुळे आली , ती दूर करण्यासाठी काय प्रयत्न करायला हवे होते आणि प्रत्यक्षात काय प्रयत्न झाले , महामंदीचा भारत , अमेरिका आणि युरोप इथं काय परिणाम झाला , या पुढे काय घडण्याची शक्यता आहे , या सगळ्यांविषयीची महत्वाची माहिती जागतिक पातळीवरच्या घडामोडीचे अघ्यायवत संदर्भसहित या पुस्तकात दिली आहे .
-
Osamachi Akher Aani Jeevanala Bhidlela Vidnyan (ओस
साहित्य,कला आणि विज्ञान, माणसाचं माणूसपण सिध्द करणाऱ्या त्याच्या प्रतिभेचे तीन रम्य आविष्कार .तीन वेगवेगळ्या क्षेत्रांमधले . तरीही सर्जनशील नवनिर्मितीचा धागा त्यांना एकत्र गुंफून टाकणारा आहे . असं अजूनही सहसा या तीन क्षेत्रांमध्ये फारसं सख्य , सौहार्द असल्याचं दिसून येत नाही . नवनिर्मितीच्या विविध आविष्कारांमध्ये कृत्रिमरीत्या तयार केलेली हि दरी कायम राहण माणसाच्या सांस्कृतिक विकासाच्या आडच येणारी आहे , पण हि दरी पार करण्याचा चंगच आता वौज्ञानिकांनी बांधलेला आहे . साहित्य, कला ,दैनंदिन जीवन यांच्या अनेक पैलूंचा विज्ञानाच्या नजरेतून वेध घेतला जात आहे . त्यांचाच परिचय ललितगद्यचा धाटणीतून करून देणारा हा लेखसंग्रह .