-
Aagishi Kheltana (आगीशी खेळताना)
उत्तर प्रदेशातील नऊ सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेले हे लेखन आहे. त्यातील दोघी जनी पहिल्या फळीत, तर सात जणी गाव पातळीवर क्षेत्रकाम करणाऱ्या. दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्या आहेत. त्यामुळे या लेखनाला वेगळे परिमाण लाभले आहे. खूप वेगळे अनुभवविश्व त्यातून प्रगट होते. स्त्रीविषयक अनेक प्रश्न यांतून उपस्थित होतात. चळवळीतील कार्यकर्त्या स्त्रियांचे जग, त्यांची सामाजिक स्थिती, वैचारिक आंदोलने, स्वयंसेवी संस्था असे वेगळे जग समजते. 'आम्ही अबला नाहीच, पण अडाणी विचारशून्य याचकही नाही, ' हा विचार या स्त्रियांच्या लेखनातून समोर येतो. बोलीभाषेचा वापर, साधी - सोपी मात्र आशयगर्भ भाषा ही लेखनाची वैशिष्ट्ये आहेत.लेखिका कविता महाजन यांनी केलेला अनुवाद मूळ लेखन वाटावा एवढा सरस!
-
Natakvalyache Prayog (नाटकवाल्याचे प्रयोग)
हे एका नाटकवाल्याचे प्रयोग नाटकाचे प्रयोग आणि जगण्याचे प्रयोग. समाजाच्या आणि नाटकाच्या गाभ्यापर्यंत जाण्याचे प्रयोग नाटका इतकाच जिवंत आणि रसरशीत अनुभव.
-
-
Superhero-Dr.Prakash Aamte (सुपरहिरो- डॉ. प्रकाश आ
जिथे रस्ते नव्हते,वीज नव्हती,एव्हडंच काय,पण रोजच्या जगण्यासाठी लागणाऱ्या साध्या सुविधाही नव्हत्या, अशा हेमलकशासारख्या अतिशय दुर्गम आदिवासी भागात जाण्याचा निर्णय डॉ. प्रकाश आमटे यांनी आपल्या वडिलांना -बाबा आमटे यांना- दिलेल्या शब्दाखातर, आयुष्याचं ध्येय म्हणून घेतला. हेमलकशाच्या आजूबाजूला असलेलं जंगल,जंगलातले विंचू, साप,अस्वल आणि जंगली प्राणी ,आदिवासींच भीषण दारिद्र्य आणि कुपोषण,भाषेचे प्रश्न अशा अनेक अडचणींची मालिकाच डॉ. प्रकाश आमटे यांच्यापुढे होती. तरीही हि दुर्गम वाट स्वीकारत पुढे जाणाऱ्या डॉ. प्रकाश आमटे यांच्या अथक प्रयत्नांमधून आज हेमल कशात शाळा सुरु झाली. हॉस्पिटल उभारलं गेलं,शेती पिकू लागली आणि जे आज जगाच्या नकाशावर ठळकपणे आपली ओळख दाखवू लागलं आहे. डॉ. प्रकाश आमटे यांच्या कार्याची दखल राष्ट्रीयत्व नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आणि त्यांच्यावर 'मगसेसे' सह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांचा वर्षाव झाला. मानवतेचा ध्यास घेतलेले डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या प्रत्येक पावलावर साथ देणाऱ्या डॉ. मंदा आमटे यांनी हेमलकशातले आदिवासी आणि तिथले वन्य प्राणी यांच्या आयुष्यात नंदनवन फुलवलं. म्हणूनच तर ते ठरतात सर्वार्थानं 'तुमचे आमचे सुपरहिरो!'
-
Udya (उद्या)
संख्या,सर!दोन अब्ज माणसांचा देश आहे. मी फक्त सर्वेलन्सच पाहतो, तरी आपण खूप कमी पडतो. आज कोणतीही फ्रेम पहा. नव्वद-पंच्याण्णव टक्के रागात,ताणात! आपण मेगा,टेरा,गिगा करत प्रचंड माहिती जनरेट करतो. ती तपासायचे प्रोग्राम्स रचतो. ते सांगतात नव्वद-पंच्याण्णव टक्के संभाव्य गुन्हेगार! अशा इंटर्नल कॉम्पिटीशननं सगळे तेजतर्रार राहतात. एकूण प्रोसेसच लीन आणि मीन होते. मज काई पाते नाई. आता मीन बोल्ल तं मतलब होते हरामी! आपल्या माणसानं कडक्या रोड्पनात जावं , स्वभावानं हरामी व्हावं. काऊन? चाकं पिल्लाच्या दोन्ही बाजूंनी गेली. तीही योजना पूर्वक नाही, तर सहज. पिल्लू उठून आईकडे पळाल. आज, आत्ता वाचलंही , उद्या...
-
Superhero Dr.Anand Nadkarni (सुपरहिरो-डॉ.आनंद नाडक
मनोविकार ते मनोविकास हा पंचवीस वर्षांचा प्रवास! मानसिक आरोग्य आणि समज यांच्यातली दरी दूर करण्याच्या ध्यासाने झपाटलेला 'शहाण्यांचा डॉक्टर' म्हणजे डॉ. आनंद नाडकर्णी. ठाण्यातली आय पी एच संस्था,पुण्यातलं मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र याद्वारे 'सदृढ मन सर्वांसाठी' या ध्येय वाक्याचा उद्घोष करणारा कुशल संघटक, भारतातल्या औद्योगिक विकासासाठी कॉर्पोरेट ट्रेनर, उगवत्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी मेनटॉर, गुणवान कलाकार आणि हरहुन्नरी मुलांसाठी मार्गदर्शक, मनोरुग्ण आणि त्यांच्या कुटुंबासाठी आधार असा हा कार्यकर्ता डॉक्टर - तुमचा आमचा 'सुपरहिरो!'
-
Ekatrit Vichar Karuya (एकत्रित विचार करूया)
शालेय शिक्षणात पाठ्यपुस्तकं शिकवण्या बरोबरच शिक्षक म्हणून आपली जबाबदारी फार मोठी आहे. शिक्षणा बरोबरच मुलांचा एक संवेदनशील, जबाबदार, उत्तम नागरिक म्हणून विकास होण्यासाठी जगण्यातल्या अनेक मुल्यांची त्यांना जाणीव करून देणं, ती मुल्य मुलांमध्ये रुजवणं हे फार महत्वाचं काम शिक्षकांना करायचे असते. नैतिक मूल्याच हे शिक्षण पाठ्यपुस्तकातल्या धड्या सारखं शिकवता येत नाही. आपल्या आसपासच्या घटनांवर मुलांशी संवाद साधून त्यांना आपल्या भवतालचे जग, माणसं,पर्यावरण समजावून घेण्यासाठी शिक्षकांनी मदत करणं अपेक्षित आहे. धर्म म्हणजे काय? प्रगती म्हणजे काय? मन, भावना,विचार यांचा नेमका अर्थ काय? आत्मनिर्भर होणं,वाटून घेण्यातला आनंद घेणं? नातेसंबंध,स्पर्धा,सौंदर्य यांचं जगण्यातलं स्थान काय? या सगळ्या विषयावर अत्यंत सहृदयतेने,विश्वासाने मुलांशी चर्चा करत हे पुस्तक शिक्षक,मुलांना नवा दृष्टीकोन बहाल करते.
-
Kalpakteche Gupit (कल्पकतेचे गुपित)
एक साधासुधा दिसणारा 'मॅनेजमेंट गुरु' राघव कॉर्पोरेट जगातल्या 'अर्जुन'ला भेटतो. त्याला भूतानला नेउन एक महिन्यांची कल्पकतेची शाळा घेतो. कल्पक विचार मांडताना तो प्रत्यक्षात वापरायची प्रक्रिया हि शिकवतो. अनेक प्रकारच्या प्रश्नावल्या सोडवून घेतो, खूप माहिती देतो आणि विविध विचार मांडतो. प्रशिक्षणाच्या शेवटी अर्जुनला जाणवतं - कल्पक असणं फार गरजेचं आहे. एक आनंदी माणूस असायला,एक चांगला मुलगा असायला,यशस्वी कर्मचारी असायला,निरोगी समाजाचा घटक असायला,समृद्ध देशाचा नागरिक असायला आणि एक प्रियकर असायलाही! व्यक्ती,समाज ,कुटुंबातली आणि समाजातली व्यक्ती यांच्या आनंदी समृद्ध जगण्यासाठीच्या प्रशिक्षणाची हि हस्तपुस्तिका तुम्हालाही सांगेल कल्पकतेच गुपित!
-
Chalishitala Break (चाळिशीतला ब्रेक)
ब्रिटनच्या एक प्रमुख जाहिरात कंपनीत उत्तम नोकरी करणाऱ्या नायजेल मार्शच आयुष्य परिपूर्ण आहे. त्यांनी वयाची चाळीशी गाठली आहे. या वयात येणारा कामाचा ताण त्यांच्या वर आहे. करियर,लग्न,चार मुलं आणि पत्नी यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. पण एक दिवस त्यांची नोकरी जाते आणि सगळं काही बदलत जातं. नायजेल मार्श ह्या वर्षभराच्या रिकाम्या वेळात वजन कमी करतात. समुद्रात पोहण्याच्या शर्यतीत भाग घेण्यासाठी सराव करतात. चित्रकलेचा जुना छंद पुन्हा सुरु करतात. पत्नी, मुलांच्यासाठी वेळ काढून आयुष्यातल्या लहान-लहान गोष्टीतला आनंद पुन्हा नव्याने अनुभवतात. दारूच्या व्यसनातून पूर्ण मुक्त होतात. सहज, सोप्या दिसणाऱ्या या गोष्टीतून आयुष्य अधिक अर्थपूर्ण,आनंदी अधिक अर्थपूर्ण,आनंदी जगण्याचं स्वप्न पाहायला शिकवतात.