-
Gaat Aahe Lagnashi (गाठ आहे लग्नाशी)
लग्न… का? कधी? कसं? कशासाठी? कोणासाठी? कुठवर? काय किंमत मोजून? लग्नाविषयी चौफेर विचार मांडणारं… विचारांना चालना देणारं… तरुणतरुणींनी व त्यांच्या पालकांनी वाचलंच पाहिजे असं पुस्तक!
-
Vanshvel
आपल्या वंशवेलीवर टवटवीत, सुगंधी फुले यावीत अशी आकांक्षा बाळगणार्या सर्व नवविवाहितांसाठी आवश्यक असे हे शास्त्रीय दृष्टीकोनातून गर्भधारणेच्या नियोजनाची माहिती देणारे सर्वाधिक खपाचे पुस्तक! बाळाचा जन[...]
-
Bahaar
आपल्याच दुःखात बुडून जाण्यापेक्षा थोडीशीच, पण दुस-याची जाण ठेवली तर? कटू शब्दांचे बाण सुटायच्या आधी थोडासाच, पण संयम दाखवला तर? एक साधा गुलमोहर – तोही मनासारखा बहरायची वाट बघावी लागते. नाही तसा बहरला, कोसळला, तरी आपण कोसळायचं नसतं. तोल सुटू द्यायचा नसतो. स्वतःच्या ‘मी’पणात एवढं आत्मकेंद्रित व्हायचं नसतं…
-
Chandrakiran
पंचाहत्तर वर्षं रंगभूमीवर व साठ वर्षं चित्रपटसृष्टीत कलासेवा केलेल्या चंद्रकान्त गोखले यांचा अनुभवसंपन्न जीवनप्रवास.
-
Ghar Kaularu
आपल्या आयुष्यात बालपण येतं आणि जातं ते पुन्हा परत न येण्यासाठी! पण बालपणाच्या आठवणींनी तो काळ मनात ताजा, लख्ख होऊन कायम राहिलेला असतो; नव्हे काळाबरोबर अधिक मुरून चविष्ट बनतो. लेखिकेचं बालपणातलं कोकणातलं घर आणि घराशी निगडित अनेक गोष्टी तिच्या मनात सतत पिंगा घालत असतात. त्यातलीच ही काही शब्दरूपं!
-
In Black And White
इन ब्लॅक अॅन्ड व्हाईट – सुख-दुःखाचे निदर्शक असणारे हे दोन रंग. या भेदाच्या सीमारेषांवर आपल्या रंगीबेरंगी आयुष्याचा पट साकारणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार मनजित बावा यांच्या कलाजीवनाचा आविष्कार.