-
Aaushadhbhan (औषधभान)
औषधसाक्षर होण्यासाठीचे ' रामबाण ' पुस्तक! औषधांचा अतिवापर, कमी वापर किंवा चुकीचा वापर टाळून योग्य पद्धतीने वापर व्हावा यासाठी संग्रही असायलाच हवे असे रामबाण पुस्तक. औषध तेच - जबाबदारीने वापरले तर अ[...]
-
Aahar Sutra Bhag 2 (आहार सूत्र : भाग २)
आहार जीवनशैली सुसंगत असणं, ही मूलभूत गोष्ट आहे. आपण जीवन शैलीशी सुसंगत आहार याचा अर्थ सोयीचा काढला आहे. आपल्या दर दृष्टीनं सोयी आहार म्हणजे उभ्या उभ्या कुठेही खाता येईल, पटकन पोट भरल्याचं समाधान देईल, जिभेशी सलगी साधेल आणि झटपट तयार होईल असा आहे. आहाराच्या बाबतीत आपण सारे निरक्षरांच्या जमातीत मोडतो. अन्नमय शरीरासाठी व्यक्तीगत जीवनशैलीचा विचार करून आहाररचना करणं हे आपलं उद्धिष्टय व्हायला हवं. निरोगी व्यक्ती, निरोगी समाज आणि जगासाठी उद्धिष्टय साध्य करायला हवं.
-
Aahar Sutra Bhag 1 (आहार सूत्र : भाग १)

Brahmavakya (ब्रह्मवाक्य)
तुमचं एक चौकोनी शहरी कुटुंब आहे? तुम्हाला स्वेच्छानिवृत्तीची झळ लागलेली आहे? तुमचे नातेवाईक अमेरिकेत राहतात? आणि आपल्या भारतभेटीत उदंड कौतुक वसूल करून घेतात? तुमची पुढची पिढी तुम्हाला जुमानत नाही? तुम्हाला आधुनिक फॅशनच्या चटपटीत मुलाखतीला तोंड द्यावं लागतं? तुम्ही… तुमचं… तुम्हाला… तसं कशाला, तुमचं काहीही होवो. या पुस्तकातल्या कथांमध्ये तुम्हाला आरसा दाखवल्यासारखं वाटणारच. मिश्कील खेळकर कथांचा संग्रह.
-
Dhwaj Vijayacha ( ध्वज विजयाचा )
कारगिलचा विजय हा प्रत्येक भारतीयाचा विजय. या विजयाचे शिल्पकार सार्यांच्या दृष्टीतून हिरो. लढताना स्फुरण चढ़तं आणि ओठातून शब्द येतात, 'जय गोरखाली!' 'जय भवानी' 'सत् श्री अकाल!' किंवा 'हर हर महादेव!' जवान कोणत्याही रेजीमेंटचा असो, अधिकारी कोणत्याही रॅकचा असो, युद्भूमीवर लक्ष्य एकच-समोरचा शत्रु! त्याला मारलं नाही तर तो मला मारेल ही एकच भावना, रमच्या घोटाबरोबर सार्या शरीरभर वाहत असलेली. जवान आणि अधिकारी, देह अनेक मन अशा विलक्षण उर्मीत विजयपथावर चालत असतात. विजयश्रीने माळ घातल्यावर ही धुंदी हलके हलके उतरायला लागते. मनावरचा ताण ओसरतो. क्रौर्याची सीमा पायरीपायरीने कमी व्हायला लागते. युद्धभूमिवरच्या एकाच भावनेला मग हलके हलके पदर सुटायला लागतात. तिथे झालेल्या पडझडीची-मोड़तोडीची आणि कमावलेल्या-गमावलेल्या सार्यांचीच उजळणी करणार्या या कथा!
-
Sparshgandh (स्पर्शगंध )
आयुष्यरंगातील अस्वस्थ पदर व्यक्त करणारा, मन ढवळून काढणारा कथासंग्रह. या कथांचे आपणही सहप्रवासी असल्याची अनुभूती देणा-या आगळ्या-वेगळ्या, जिवंत कथांचा अमूल्य ठेवा.
-
Athara Dhanyach Kadabol (अठरा धान्यांचं कडबोळं)
साने गुरूजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टचा ‘बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार’ प्राप्त पुस्तक. या पुस्तकात असलेल्या देशविदेशातील सर्वोत्कृष्ट अनुवादित कथा म्हणजे कथाप्रेमींसाठी पर्वणीच.