-
Morpees (मोरपीस)
Padmaja Phatak Snehlata Dasnurkar Manohar Talhar Shakuntala Gogate Arvind Gokhale Indrayani Savkar Shailaja Raje Nirmala Mone Raja Rajvade Vasanti Kale Leela Shrivastavटाईम मशीनच्या माध्यमातून काळाच्या पुढेही जाता येत आणि मागेही.'मोरपीस'हे तरी खर काय आहे ? कोणत्या तरी पुस्तकात दडवून ठेवलेलं मोरपीस हरवत,पण काळजात तर ते कायमच जागा करून असतं.'माहेर'च्या अंकातून एकोणीसशे साठच्या दशकातून अशी हजारो मोरपीस ठायी ठायी भेटतात. साहित्याची समृद्धी वाढवणार्या आणि वाचकांची संपन्नता वर्धिष्णू करणार्या अनमोल सर्वस्पर्शी कथांचा नजराणा म्हणजे (मोरपीस) !
-
Pimpalpan Part-5 (पिंपळपान भाग-५)
आशयसमृद्ध,भावस्पर्शी कथांच्या रूपानं आजवर अनेक सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीचा स्पर्श 'मेनका 'चं रंगरूप खुलवत राहिला आहे . मनाचा ठाव घेनार्या विलक्षण प्रवाही कथा हे 'मेनका' चं बलस्थान . मराठी भावविश्वाला गेल्या साडेपाच दशकाहून अधिक काळ गुंतवून ठेवणार्या दिगग्ज लेखकांच्या विविधरंगी कथा एकत्रित स्वरूपात आणणार हे पिंपळपान ....
-
Pimpalpan Part 4 (पिंपळपान भाग-४)
आशयसमृद्ध,भावस्पर्शी कथांच्या रूपानं आजवर अनेक सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीचा स्पर्श 'मेनका 'चं रंगरूप खुलवत राहिला आहे . मनाचा ठाव घेनार्या विलक्षण प्रवाही कथा हे 'मेनका' चं बलस्थान . मराठी भावविश्वाला गेल्या साडेपाच दशकाहून अधिक काळ गुंतवून ठेवणार्या दिगग्ज लेखकांच्या विविधरंगी कथा एकत्रित स्वरूपात आणणार हे पिंपळपान ....
-
Pimpalpan Part 3 (पिंपळपान भाग-३)
आशयसमृद्ध,भावस्पर्शी कथांच्या रूपानं आजवर अनेक सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीचा स्पर्श 'मेनका 'चं रंगरूप खुलवत राहिला आहे . मनाचा ठाव घेनार्या विलक्षण प्रवाही कथा हे 'मेनका' चं बलस्थान . मराठी भावविश्वाला गेल्या साडेपाच दशकाहून अधिक काळ गुंतवून ठेवणार्या दिगग्ज लेखकांच्या विविधरंगी कथा एकत्रित स्वरूपात आणणार हे पिंपळपान ....
-
Pimpalpan Part-2 (पिंपळपान भाग-२)
आशयसमृद्ध,भावस्पर्शी कथांच्या रूपानं आजवर अनेक सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीचा स्पर्श 'मेनका 'चं रंगरूप खुलवत राहिला आहे . मनाचा ठाव घेनार्या विलक्षण प्रवाही कथा हे 'मेनका' चं बलस्थान . मराठी भावविश्वाला गेल्या साडेपाच दशकाहून अधिक काळ गुंतवून ठेवणार्या दिगग्ज लेखकांच्या विविधरंगी कथा एकत्रित स्वरूपात आणणार हे पिंपळपान ....
-
Pimpalpan Part-1 (पिंपळपान भाग-१)
आशयसमृद्ध,भावस्पर्शी कथांच्या रूपानं आजवर अनेक सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीचा स्पर्श 'मेनका 'चं रंगरूप खुलवत राहिला आहे . मनाचा ठाव घेनार्या विलक्षण प्रवाही कथा हे 'मेनका' चं बलस्थान . मराठी भावविश्वाला गेल्या साडेपाच दशकाहून अधिक काळ गुंतवून ठेवणार्या दिगग्ज लेखकांच्या विविधरंगी कथा एकत्रित स्वरूपात आणणार हे पिंपळपान ....
-
Ganpat Family In New York (गणपत फॅमिली इन न्यूयार्
पश्चिम महाराष्ट्रात ग्रामीण भागातल समाजजीवन, माणसाचे इरसाल नमुने प्रथितयश लेखक शंकर पाटील विलक्षण पद्धतीने उभे करत त्याच्या शब्दाशब्दातून व्यक्तिरेखा जिवंत होत वाचकासमोर साकारत. त्या मातीचा गंध शब्दांत प्रभावीपणे टिपणातून हे घडत असे. वऱ्हाड-विदर्भातील आणि समाजजीवन अशाच प्रकारे आपल्या विनोदी कथेतून कुणी साकारत असेल तर ते अशोक मानकर. विविध मासिक आणि दिवाळी अंकातून अस्सल वऱ्हाडी बाजाचा लेखन अशोक मानकर करत आले आहेत. 'गणपत फॅमिली इन न्युयोर्क' या मधून अशोक मानकरांनी 'वऱ्हाड एक्स्प्रेस' वाचकांना रंजक सैर करून आणल्याशिवाय राहणार नाही..
-
Yugmudra (युगमुद्रा)
आमचे कुटुंबीयांचे नाव आज घराघरांत पोचले आहे. बाबा आमटे यांनी अंगीकारलेले सेवाव्रत त्यांच्या पुढील पिढीनेही समर्थपणे चालविले आहे. कुष्टरोग्यांची सेवा करण्यासाठी बाबांनी 'महारोगी सेवा समिती'च्या माध्यमातून जे काम केले आहे, त्याने कुष्टरोग्यांना नवे जीवन दिले. समाजालाही नवा दृष्टीकोन दिला. बाबा आमटे यांच्या सामाजिक जीवनाचे अनेकांना अप्रूप होते. त्यातील काहींनी त्यांच्याबद्दलचे विचार विविध ठिकाणी व्यक्त केले आहेत. ते 'युगमुद्रा बाबा आमटे' : साधना, वारसा, प्रेरणा'मधून एकत्र दिले आहे. यात बाबांच्या सहचारिणी साधना आमटे, चिरंजीव विकास आमटे, प्रकाश आमटे, सुना भारती आमटे, मंदा आमटे, नातू दिगंत आमटे, कौस्तुभ आमटे, अनिकेत आमटे, नात डॉ.शीतल आमटे-करजगी; तसेच नातसुना, नातजावई या कुटुंबियांच्या मनातील बाबा व्यक्त होतात. तसेच बाबांचा आदर्श घेऊन सामाजिक कार्य करणारे गिरीश कुलकर्णी, साहित्यिक, कवी वि. वा. शिरवाडकर, बा. भ. बोरकर, गो. नी. दांडेकर, पु. लं. देशपांडे, विश्राम बेडेकर, राम शेवाळकर, यदुनाथ थत्ते, नेते मधू दंडवते, एस. एम. जोशी यांनी आमटे यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
-
Bastarche maovadi (बस्तरचे माओवादी)
दहशतवादाप्रमाणेच देशात नक्षलवादी कारवायांच्या बातम्या वारंवार वाचायला मिळतात. छत्तीसगड, महाराष्ट, बिहार, मध्यप्रदेश अशा अनेक राज्यांमध्ये नक्षलवादाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. भारतात जाणवणारी सामाजिक विषमता, जोडीला दुष्काळ यामुळे गरीब, आदिवासी माओवादाकडे झुकले. हिंसाचारणे क्रांती होते, असे मानणाऱ्या नक्षलवादी नेत्यांना ही ही चळवळ रुजविली. मुळात माओवाद म्हणजे काय, त्याचा इतिहास, त्यात सहभागी लोक, त्यांची भूमिका, ते कुठून व का येतात, त्यांची जीवन पद्धती, त्यांचे बंड संपुष्टात येण्यासाठी सरकार करीत असलेले उपाय, राहुल पंडिता यांनी 'बस्तरचे माओवादी' मधून मीमांसा केली आहे. बस्तर मधील नक्षलवादी भागात त्यांच्याबरोबर राहून, जाणकारांशी चर्चा करून एक पत्रकाराने लिहिलेल्या या पुस्तकातून एका वेगळ्या भारताचे दर्शन होते. याचा मराठी अनुवाद चिन्मय दामले यांनी केला आहे..
-
Baki shunya (बाकी शून्य)
आपल्या जगण्याच्या प्रवाहाचा वेगच एवढा प्रचंड असतो, की आपण सारे एका संमोहनातच जगत असतो, कारण जगण्याच्या अविरत उलथापालथीत मेंदू जणू बधीर होऊन जातो. त्यामुळे ’आपण कोठे चाललो आहोत? कशासाठी चाललो आहोत?’ असे प्रश्न एकतर पडतच नाहीत आणि पडलेच, तर त्याचा मागोवा घेईपर्यंत प्रवाहाने नवीन वळण घेतलेले असते आणि आपण पुन्हा प्रवाहपतित झालेलो असतो. ’बाकी शून्य’ वाचताना आणि वाचल्यानंतर जगण्यासंबंधीचे सारे मूलभूत प्रश्न ठळकपणे मनाच्या पृष्ठभागावर येतात, आपण क्षणभर काठ पकडतो, थांबतो आणि वाहणार्या प्रवाहाकडे नवख्या नजरेने पाहू लागतो. ’गीता विषादयोग सांगते की कर्मयोग?’ या प्रश्नासारखाच हा एक सनातन प्रश्न- ’या कादंबरीत जगण्याला नकार आहे, की होकार?’ अर्थात हा नकार किंवा होकार लेखक आणि वाचक यांच्या मनोमीलनाचे अपत्य असणार यात शंका नाही. आपले आत्ताचे जगणे आणि हा काळ यांचे अनंत अंगांनी विश्लेषण करणारी, एक नवे दर्शन घडवणारी कादंबरी.