-
Bhas Abhas (भास आभास)
आकाश दिसतं पण असत नाही .वारा असतो पण दिसत नाही . ज़गताना काही अनुभव येतात ,प्रीतीचे -भीतीचे . अनुभवांना रंग असतात ,गंध असतात ,स्पर्श असतात . रंग दिसतात , गंध जाणवतात , स्पर्श जीवघेणे असतात . अनुभवांना आभा असते ;म्हणून त्यांचे आकाश असते . अनुभवांना आभास असतात ;म्हणून शब्दांना प्रकाश असतो . असेच काही भासमान, काही आभासमान अनुभव ....
-
Aatreya Subhashite (आत्रेय सुभाषिते)
काव्य लिहिण्यापेक्षा किवा वाचण्यापेक्षा काव्य जगण्यातच खरी मौज आहे. आपलेपनाच्या जगात आवडत्या माणसाची गुलामगिरी पत्करूनच स्त्रियांना स्वतंत्र होता येईल हे लक्षात ठेवा. मग तो आवडत्या माणूस पिता असो, पती असो, पुत्र असो किवा मित्र असो! संसारात प्रत्येकाचा नशिबात दुखाचा वाटा येतो! पाठ फिरली कि पुरूषाची नाती तुटतात, दुनिया फिरली तरी स्त्रीयाची माया तुटत नाही! सुखाला सोबत लागते. दुखाला एकटेपनानेच जगावं किवा मरावं लागत! आयुष्य जिवंतपणाने जगलं म्हणजे तत्वज्ञान आपोआप उमगत!