-
Vedhak Vijaya Wad (वेधक विजया वाड)
आपल्या लेखनाचा विशिष्ट दर्जा सांभाळून सातत्याने कथालेखन करणाऱ्यांमध्ये विजया वाड यांचा उल्लेख करायला पाहिजे. दर्जा सांभाळणे आणि लेखनाचे सातत्य टिकवणे या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. सातत्यामुळे एक प्रकारची लेखनमग्नता येते. लेखनाच्या, अभिव्यक्तीच्या, आविष्काराच्या व्यापात मन व्यग्र राहाते. त्याच्याच जोडीला सर्जनवृत्तीला गांभीर्यही येते. विजयाबाईंच्या बऱ्याच कथा स्त्रियांच्या मानसिकतेवर लिहिल्या गेल्या आहेत. एक स्त्री म्हणून पुरुषप्रधान समाजात जीवन व्यतीत करताना स्त्रीच्या मनात कोणती स्पंदने, आंदोलने, चालू असतात याचे सुरेख चित्रण विजयाबाईंनी आपल्या अनेक कथांतून केले आहे.
-
Prasthapitanchya Bailala ( प्रस्थापितांच्या बैssला
लोकेश शेवडे यांच्या या लेखसंग्रहात रोजच्या आयुष्यातील विसंगती आणि काही खटकणाऱ्या गोष्टींवर मार्मिक भाष्य करण्यात आले आहे. राजकारणी मंडळी आणि आपल्या लोकशाहीतील अनेक गमती जमती यावर भाष्य टाकत बोचऱ्या शैलीत शोवडे भाष्य करतात. स्थानिक स्वराज्य संस्था आणि काही व्यवसायावर त्यांनी केलेल्या कोट्या अफलातून. उपरोधिक शैलीत लिहिणं अवघड; पण शेवडे यांना ही किमया साध्य झाली आहे.
-
Annanchi Topi (अण्णांची टोपी )
ज्येष्ठ कथाकार ,कादंबरीकार ,पत्रकार ,संपादक ह. मो .मराठे यांना सुचलेला व्यंगकथा हा नवाच कथाप्रकार. समाजजीवनातील व्यंग ,विसंगती आणि हास्यास्पदता अनुभवता त्यांना हा कथाप्रकार सुचला. खुसखुशीत , बोचर्या शैलीतली मांडणी वाचकाला रंजकही वाटते आणि कथेचा आशयही त्याला पटतो ,भावतो. यामुळेच त्यांचे 'डिंपल'ने प्रकाशित केलेले 'श्रीमंत श्यामची आई','मुंबईचे उंदीर' आणि 'चुनाव रामायण' हे तीनही व्यंगकथासंग्रह वाचकप्रिय ठरले. त्यांच्या नव्या आवृत्या लवकरच प्रसिद्ध होतील. 'अण्णांची टोपी' होमोंचा 'डिंपल' प्रकाशित चौथा व्यंगकथासंग्रह!
-
Jagale Jashi (जगले जशी)
बोलण्यातून एका सहजपणे जी माणसे लिहिण्यास पोचतात त्यांच्या शैलीला एक वेगळाच ओघ, एक सहजता, अकृत्रिम डौल असतो. हाडाच्या लेखिका नसलेल्या लालन सारंग यांच्या लेखनाला एक वाचनीयता प्राप्त झाली आहे त्याचे कारण हे आहे. कोणाच्या बोलण्यात गुंतावे तसे आपण या पुस्तकात गुंततो. एका वेगळ्याच जगात पोचतो. हे जग एका मनाचे जग आहे आणि हे मन एका प्रौढसमजुतीने, निकोपपणे, स्थिरपणे आणि शांतपणे आपल्या गतायुष्याकडे पाहते आहे. एका प्रमाणात चिकित्सेत अधिक बिकट - या पुस्तकात भेटते आणि एका अभिनेत्रीच्या लेखनात असे काही प्रत्ययाला यावे याने आपण चकित होतो
-
Chipad (चिपाड)
आजीच्या प्रोत्साहनाने पोलिस खात्यात प्रवेश करून स्पर्धा परीक्षा पास होऊन पोलिस उपनिरीक्षक झालेल्या तारा या तरुणीचं आयुष्य गवळण कलकत्ते या कांदबरीत मांडतात. कथानायिका तारा पोलिस नोकरीत असताना सामान्यां[...]
-
Disha Andharlya(दिशा अंधारल्या)
असं म्हणतात, आयुष्याची पायवाट चालताना एखादा आशेचा किरण माणसाला अपुरा असतो. तो त्याची उमेद वाढवतो, त्याला चालत ठेवतो परंतु माणसाची आशा विझली तर… चारी बाजूला अंधार दाटून आला आणि भविष्यातही फक्त काळोखाचा हुंकारच ऎकू आला तर … दिशा हरवलेल्या माणसांच्या या कथा...