-
Gharcha Vaidya (घरचा वैद्य )
"फळाची अपेक्षा न करता कर्म करीत राहा" - असं भगवान श्रीकृष्णानी अर्जुनाला भगवदगीतेत सांगितलं. 'फळाची' उपेक्षा न करता आरोग्य वाढवीत राहा - असं नवी आरोग्यगीता सांगते. डॉ. राजेश्री यांनी "घरचा वैद्य या पुस्तकात सध्याच्या काळात फलहार किती आरोग्यवर्धक आहे हे पटवून दिलं आहे. फास्ट फूडच्या जमान्यात, अनेक व्याधीनां निमंत्रण देणार खाद्य टाळून कमी खर्चात रसाळ टॉंनिक म्हणून फळांचा उपयोग कसा होतो, याचं साध्या सोप्या घरगुती भाषेतील मार्गदर्शन या पुस्तकात आहे.