Hawai Mulukhgiri (हवाई मुलूखगिरी)
अभिनेता असूनही गडकिल्ल्यांच्या निसर्ग वाटा पायी तुडवणारे मिलिंद गुणाजी आणि त्याचे जिवलग मित्र असलेले शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांच्या मैत्रीतून साकारलेलं हे पुस्तक. हवाई छायाचित्रणाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या एतिहसुच ठेव्याच्या 'याचि देही यचि डोळा' घेतलेल्या अदभूत दर्शनाचं हे सचित्र कथन. या हवाई मुलुखगिरीत कधी भोगोलिक ऐतिहासिक ज्ञानाची कसोटी लागलेली दिसते, तर कधी त्यातील मजेशीर प्रसंग हसवून लोटपोट करतात, कधी जीववरं बेतलेलं सहस निश:ब्द करतं तर कधी निसर्गच एक सुंदर काव्यरूप धरण करून समोर आलेला दिसतो! एक कवी मनाचा, संवेदनशील लेखक आणि प्रतिभावंत छायाचित्रकार यांच्या संयुक्त आविष्कारातून साकारलेली हि नितांत सुंदर, विहंगम अशी हवाई मुलूखगिरी!