Camp Fire (कॅम्प फायर)
हिमालय, सह्याद्रीपासून सातत्याने युरोप आणि अन्य ठिकाणी गिर्यारोहण अन भटकंती करणारे वसंत लिमये यांचे स्वच्छंद आणि थरारक अनुभव या पुस्तकात वाचायला मिळतात. पहिल्या हाइकच्या नवलाईपासून या लेखनप्रवासाला सुरुवात होते. ते वाचताना आपणही नकळत या प्रवासात सहभागी होतो. सह्याद्रीतील अनेक अनवट वाटांवरचा असो व हिमालयातील अवघड शिखरे सर करण्याची चिकाटी असो वाचकही उत्साहाने ते अनुभवतो. या वाटांवर भेटलेली माणसे, रमणीय निसर्गाचेही दर्शन घडते. शिवाय लहान मुलांसाठी घेतलेली निसर्ग शिबिरे, संबंधित भागाचा भूगोल, परिसर यांचीही ओळख होते. लिमये यांची प्रस्तावनाही वाचनीय. छायाचित्रे आणि चित्रे लेखनास पूरक.