Patrancha Album (पत्रांचा अल्बम)
नीला सत्यनारायण यांची ओळख एक आय.ए.एस. अधिकारी म्हणून जशी आहे तशीच एक कवयित्री आणि लेखिका म्हणूनही आहे. त्या राज्य निवडणूक आयुक्त म्हणून कठोर निर्णय घेऊ शकतात आणि त्याच वेळी अत्यंत कोमल व मधुर संगीतरचना करू शकतात. त्यांचे सामर्थ्य खरे तर यातच आहे की त्या ‘वज्रदपि कठोराणि मृदुनि कुसुमादपि’ आहेत. त्यांचे आजवर 9 कविता संग्रह, 5 कादंबर्या आणि विपुल ललित लेखन प्रसिद्ध झाले आहे, तसेच लोकप्रियही झाले आहे. त्यांच्या लिखाणाचा मूळ आशय नेहमीच सामाजिक प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्याचा राहिलेला आहे. त्याचबरोबर त्यांचे साहित्य आशयघन आणि सकस असते.